तुझ्या आठवणींचा गोडवा संपतच नाही
प्रेमाचे पत्र नको पाठवू
कागद एक आहे वही एक आहे
तुझी आठवण येवढी कुठे साठवू
कपिल पेंडसे,मुर्डी
-
दसरा
माणसा माणसात आनंदी रहा
सोनं घ्या सोन्या सारखे रहा
कपिल पेंडसे,मुर्डी
-
#सुचू लागले... #
कागद दिसु लागला
विचार करीत बसलो
पेन दिसु लागले
शब्द सुचू लागले
ओळी दिसु लागल्या
यमक जुळू लागले
कवितेच्या वळणावरी
कविता सुचुलागली माझ्यामनी
येऊन ठेपली माझ्या ओठावरी
उतरू लागली माझ्या कागदावरी
@कपिल पेंडसे, मुर्डी
-
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेशा हवेत काढी
ओसाड राने पाहुया
ऑक्सिजन आणायला जाऊया.... (१)
भारत आमचा खुप मोठा
नाही लोकसंख्येला तोटा
परिस्थिती ही पाहुया
ऑक्सिजन आणायला जाऊया.... (२)
राजकारणी हे दमदार
गाड्या धावती भरदार
गरीबा lockdown सांगूया
ऑक्सिजन आणायला जाऊया.... (३)
सामान्यांची ही परवड
अन्नाविना होते तडफड
थोडीशी मदत करूया
ऑक्सिजन आणायला जाऊया.... (४)
मंत्री मोठे तालेवार
Live येती हजार वार
कोट्यावधी रुपये घेऊया
ऑक्सिजन आणायला जाऊया.... (५)
धुरांच्या रेषा हवेत काढी,
प्रदुषणाने हिरवळ मेली ना ,
नवीन रोपे लावु या,
आॅक्सिजन पुरवठा सुरळीत करु या.... (६)
@कपिल पेंडसे, मुर्डी
-
*झुक झुक अगीनगाडी...*
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेशा हवेत काढी
ओसाड राने पाहुया
ऑक्सिझन आणायला जाऊया.... (१)
भारत आमचा खुप मोठा
नाही लोकसंख्येला तोटा
परिस्थिती ही पाहुया
ऑक्सिझन आणायला जाऊया.... (२)
राजकारणी हे दमदार
गाड्या धावती भरदार
गरीबा lockdown सांगूया
ऑक्सिझन आणायला जाऊया.... (३)
सामान्यांची ही परवड
अन्नाविना होते तडफड
थोडीशी मदत करूया
ऑक्सिझन आणायला जाऊया.... (४)
मंत्री मोठे तालेवार
Live येती हजार वार
कोट्यावधी रुपये घेऊया
ऑक्सिझन आणायला जाऊया.... (५)
धुरांच्या रेषा हवेत काढी,
प्रदुषणाने हिरवळ मेली ना ,
नवीन रोपे लावु या,
आॅक्सिजन पुरवठा सुरळीत करु या...(६)
@कपिल पेंडसे, मुर्डी-
माझ्या माती वरचे प्रेम
हळूहळू विसरत चालले
आहेत हो...
माझा जन्म मुळी झाला
माझ्या गावा मध्ये...
त्या गावा मधल्या माती वरी
माझे किती प्रेम आहे...हो
हे जेव्हा लोकांना कळेल
तो पर्यंत माझ्या माती वरचे प्रेम
हळूहळू विसरत चालले आहेत हो...
माती वरच्या प्रेमा मुळे आपण
रोज धान्यं पिकवून खातो तीलाच मुळी
तुम्ही हळूहळू विसरत चालले आहेत हो...
जिच्या मुळे आपण पाऊल ठेवू लागलो,
चालायला लागलो, धडपडलो
त्या माझ्या माती वरचे प्रेम
हळूहळू विसरत चालले आहेत हो...
भारताच्या माती वरी आमचे प्रेम आहे हो...
जेवढ शेतकऱ्याच प्रेम माती वरी आहे हो...
तेवढ माती वरी आमच प्रेम नाही हो...
कारण माझ्या माती वरचे प्रेम
हळूहळू विसरत चालले आहेत हो...
माती वरी पिकवलेल पिक शेतकरी
बाजारा मध्ये विकायला येतात हो...
त्याच बाजायामध्ये मातीतल्या
पिकाला भाव मिळत नाही हो...
म्हणून लगेच शेतकरी रस्तावर येऊन
लगेच आंदोलन ही करतात हो...
कारण जेवढे प्रेम शेतकऱ्याच माती
वरी आहे हो...
त्याच आपल्या माती वरचे प्रेम आपण
हळूहळू विसरत चालले आहेत हो...
@कपिल पेंडसे, मुर्डी
-
आज पुन्हा वर्तमानपत्र आले बरका....
तुम्हाला आचर्य वाटल असेल ना?
सहाजिकच आहे...
तुमच पण तस बरोबरच आहे...
हो!कारण सध्याच्या घडीला
एकंदरीत वातावरण पाहता
कोरोना आणि लाॅगडाऊनच्या
काळात वर्तमान पत्रालाही बंदी आली आहे...
येवढे वर्ष वर्तमानपत्र प्रत्येकाच्या
दारी येयचे...
सकाळ झाली की लोक
दारा समोर वाट बघ
बसायची कारण प्रत्येकाच्या
घरी वर्तमानपत्र यायचे ना?
ते आता सध्याच्या घडीला
प्रत्येकाच्या घरी येणे बंद झाले आहे ना?
पण नवीन युगात ते
काम WhatsApp, Facebook
या माध्यमान द्वारे वर्तमानपत्र प्रत्येकाच्या
घरी जात आहे....!
येवढाच कायतो फरक
तरी...पण! हा आहेच
हो कारण येवढे वर्ष
वर्तमानपत्र हातात घेऊन
वाचायची सवय आणि ती मजा वेगळीच
मोबाईल वर वाचायच
म्हणजे डोळे फुटताट
आणि मोबाईल वर
झुम करून येवढ कुण
वाचायला सांगीतले आहे.
अजु डोळ्याला त्रास
पण काळ अचानक सायकळची
बेल वाजली मी म्हटलं
नेहमी प्रमाणे दुढ वाला
आला असेल...म्हणून मी
बघायला गेलो तर बाहेरच्या
झोपाळ्यावर वघतो तर काय ?चक्क
आज पुन्हा वर्तमानपत्र आले दारी...!
@ कपिल पेंडसे, मुर्डी
-
#भिकारी... #
हो मी भिकारी आहे
पण मी माणूसच आहे ना..?
प्राणी किंवा जनावर नव्हे
कारण आमच्या कडे
बघण्याचा दृष्टीकोनच मुळी
तसा असतो म्हणून आम्हाला
बोलाव लागत...
तुम्ही पण देखील माणूसच
आहात येवढ मात्र विसरू ना..?
कुणाच्या नशिबी श्रीमंती,
मध्यमवर्गीय जिवन, तर
गरीबी असते आमच्या
नशीबी ते काही नाही
म्हणून आम्ही भिकारी
येवठच काय ते आहे..?
म्हणून आम्ही वाईट
तुम्ही चांगले अस
काही नसत आमच्या
तले देखील सुधा वाईद
असतील पण ते हातावर
मोजण्या ईत केच..!
बघण्याचा दृष्टीकोन चांगला
असेल तर त्याला ही
भिकारी कसा आहे तो
समजतो..! बर का..?
तरी बर आम्ही शिकले
सवर्लेले नाही, कारण
तुम्हाला भ्रष्टाचार, काळा
बाजर करता येतो आम्हाला ते
करता येत नाही
येवढच काय ते कारण तुम्ही
शिकले सवर्लेले असुन तरी
देरील मुर्ख पणा करता मग
आमच्या नशिबी भिकारीच
बर ना..?
तुम्ही घरी बसून चागल
चमचमीत खाता एसी मध्ये
बसून..?
आम्ही मात्र रस्ता वर पडलेल
किंवा कुणा कडे भिक मागून
आम्ही पोट भागवत असतो
येवठाच काय?...तो फरक
तुमच्या त आणि आमच्या त
@कपिल पेंडसे, मुर्डी
-
#नाखवा... #
समुद्राच्या लाटे बरोबर
दौलत रात्रंन दिवस काम
करतात ते म्हणजे नाखवा....
चक्रिवादळ येऊ दे किंवा
कमी दाबाचा पद्टा निर्माण
होऊदे तरी जिवाची पर्वा न
करता आपली कामे जोमाने
करतात
ते म्हणजे नाखवा....
सन आयलाय गो नारली
पुनवेचा म्हणत सण साजरा
करतात आणि नव्या जोमाने
पुन्हा कामाला लागतात
ते म्हणजे नाखवा....
एक आठवडा असो किंवा
एक महिना असो खोल
समुद्रा मध्ये जाऊन मासे
मारी करतात
ते म्हणजे नाखवा....
जसे सैनीक सिमेवर रांत्रंन दिवस
पाहरा देत देशाचे रक्षण करतात
तसच
जीवाची पर्वा न करता खोल
समुद्रामध्ये जाऊन मासे मारी
करतात
ते म्हणजे नाखवा....
त्यांचा व्यवसायच मुळी
जणू मासे मारी त्यावर त्यांच
रोजच पोट भरत असतात
ते म्हणजे नाखवा....
पक्षी कसे आभाळात उंच
भलारी घेतात त्याच्या कडे
पाहिल्यावर आनंद मिळतो
तसच नाखवा मासे मारी
करतात तेव्हा उंच आभाळात
जाळ फेकताट तेव्हा ते
आपोआप समुद्राला वंदन
करतात तेव्हा वेगळाच
आनंद जणू आपल्याला
पाहायला मिळतो तो
आनंद आपल्याला देतात
ते म्हणजे नाखवा...
@ कपिल पेंडसे, मुर्डी-
#आयुष्याच्या वळणावर #
आयुष्याच्या वळणावर
वादळ येतच राहतात
उद्याच्या आशेवर आपण
म्हणत जगतच असतो
ते म्हणे पर्यंत दिवस
सरता सरले जातात
तिच संध्याकाळ
तिच रात्र म्हणीत
नवा दिवस उजाडतो
आयुष्याच्या वळणावर
वादळ येतच राहतात
आयुष्य हे कोऱ्या
कागदा सारखे आहे
कोऱ्या कागदा कडे
पाहिल्यावर काय
लिहायचे सुचत नाही
तसच आयुष्या मध्ये
पाहताना आपल्याला काय
करायचे ते सुचत नाही
त्या विचारां मध्ये
दिवस सरता सरले जातात
नव्या उमेदीने पुढे
मार्ग काधीत आपण
जातच राहीच...
यश,अपयश ,चठ, उतार
आपल्या बरोबर
येतच राहणार.....त्याना
मात करत आपण पुढे
जातच राहीच...
जिद्द आणि मेहनद
आपल्या बरोबर असेल
तर नव्या उमेदीने
आपण वाट काधीत
पुढे जातच राहीच....
आयुष्याच्या वळणावर
वादळ येतच राहतात
@कपिल पेंडसे, मुर्डी-