बदल तेव्हा घडला...!
एकटाच भीम जेव्हा,हजारोंच्या विरोधात लढला
शृंखला तोडण्या गुलामीच्या,तोच रुढीला भिडला
बदल तेव्हा घडला...!
ज्ञानाच्या सागरात, उसळी तयाने घेतली
पोहताना लाटांची, आव्हाने ती पेलली
ह्या भवसागरात जेव्हा एकटाच तो बुडला
बदल तेव्हा घडला...!
क्रांतीची चिंगारी, पेटवली बा भीमाने
तेवते आहे अजुनी, हृदयात नियमाने
अस्पृश्यतेचा कलंक समतेने जेव्हा खोडला
बदल तेव्हा घडला...!
नव्हतीच मुभा मुळीच, येथे बोलण्याची
सत्याच्या मार्गाने, येथे चालण्याची
संविधानाच्या साजाने,अवघा देश मढला
बदल तेव्हा घडला...!-
रास्तें कितनें भी कठिन क्यूँ ना हो जाएं,
बुलंद हौसलों के आगे पस्त हो ही जातें है।-
सर तो हमारा यंही पर झुकेगा ,
जिसने हमें सर उठाके जिना सिखाया।
-शामत राजवंशी-
कळले का ओ तुम्हाला नि आम्हाला शिवाजी महाराज आणि आंबेडकर
वळले का खऱ्या अर्थाने त्यांच्यातले माणूसपण
भक्तीचे आपण सोंग करत फिरतो
खऱ्या अर्थाने त्यांना न आपण जाणतो
खरच महाराजांची शिकवण डोक्यात शिरते का
आंबेडकरांची समजाप्रतिची तड़फड़ काळजला भिड़ते का
महाराज श्रेष्ठ की आंबेडकर श्रेष्ठ यातच वेळ वाया घालवतो
दुष्मनाना आपणच वाईट कृत्य करण्याची संधी देतो
अन्याय रोखण्यासाठी महाराजांनी तलवार उठवली
आणि अन्याय रोखण्यासाठीच आंबेडकरांनी लेखणी चालवली
जातिभेद पुन्हा आपणच उकरून काढतो
त्यांनी केलेले महान कार्य मातीत मिसळतो
महाराजांनी कधीच जातिभेद नाही मानला
आपल्या गुरुचा तोच वारसा आंबेडकरांनी पुढे नेला
त्यांचे महान कार्य आपल्याला न अजुन कळले
त्यांच्यासाठी माणूसपण होते मोठे हे ना आपल्याला वळले
महाराजांनी झटून स्वराज्य निर्माण केले
आंबेडकरांनी तेच स्वराज्य समोर ठेवून संविधान लिहले
दोघांचे कार्यही अतुलनीय होते
आपल्या हितासाठीच सारे केले हेच दिसते
त्यांनी काम करताना कधीच भेदभावाला नाही मानले
खर तर तुम्ही आम्हीच त्यांना जातीजातीमध्ये वाटले...-
डॉ भीमराव रामजी आंबेडकर ने जो दिया,
वो विरासत नही, जिम्मेदारी है।
सच्ची श्रंद्धाजलि तब होगी,
जब उनके विचारों को आगे बढ़ाया जाएगा।-
हो तू वाघीण शिवबाची,
फुले, शाहू, आंबेडकरांची❤️
हे निळाक्षार सागर,
निळ निळ आकाश....
हा देश, देशातील माती तुझीच आहे....
क्षितिज गाठण्यासाठी...
क्षितिजापलीकडे भरारी घेण्यासाठी.....
कारण....
तू आहेच वाघीण शिवबाची,
फुले, शाहू, आंबेडकरांची❤️
शाई आहेस भगतसिंगांच्या विद्रोहाची.....-
शापित रात्र
वैर्याने घालावा घाला
तसाच घातला काळाने घाला तुजवरती
युगायुगांच्या शापितांना तू मुक्त केलेस
एक एक थेंब तुझ्या रक्ताचा जाळून
पण, कोटी लेकरांच्या आईला घेऊन गेली बा भीमा
६ डिसेंबर ची शापित रात्र...!-
कलम कि ताकत बाबा आपसे मिली..
समाज में सम्मान..
बाबा आपसे मिला...
आप ना होते बाबा..
तो हम...
इन्सान होकर भी...
जानवरों की कतार में जीतें..
आपसे हि मनुष्यत्व मिला...
आपसे हि जीने कि राह मिली...
जय - भीम , जय - भीम कहते ..
थकते नहीं है हम...
गर्व से कहते हैं हरदम...
जय - भीम जय - भीम...
-Prabha Dhale
-