जोडता जोडता, तोडता येत नाही
पण सोडायला शिकलं पाहिजे..!-
विखुरलेला आनंद शब्दाने सांधते मी...!
पुसून सारा मळभ मनाचा
वृष्टी तोषाची व्हावी
कातरवेळी स्पर्श धुक्यांचा
सांज सावळी उजळून जावी..!
काळे सावट अंतरात
असे कसे हे अनामिक भय
मरूत येऊन जळून जावे
तयाचे विलय..!-
पुसून सारा मळभ मनाचा
वृष्टी तोषाची व्हावी
कातरवेळी स्पर्श धुक्यांचा
सांज सावळी उजळून जावी..!
काळे सावट अंतरात
असे कसे हे अनामिक भय
मरूत येऊन जळून जावे
तयाचे विलय..!-
परिस्थितीशी समजुतीचा
'गुणाकार '
जमला नाही की
बाकी फक्त उरते
'पश्चाताप'...!-
काही प्रश्नांची उत्तरं मिळाली की आयुष्य स्पष्ट व सुखकर होत. पण, प्रश्न प्रश्नच राहिले की घुसमटलेलं मन शरीराने जिवंत राहत..!
-
Root of sorrow is
Expectations from others.
such Expectations that
can't be complete from
their side always,
everyone's life is different,
and everyone's hopes
and aspirations about
life are also different,
no one can live up to
our expectations.-
सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो
चंद्रोदय होतो, चंद्रास्त होतो
ऋतुही बदलत राहतात
काळही थांबत नाही
निसर्गात सर्वच गोष्टी
घडतात आणि संपून जातात
फक्त माणसाच्या आयुष्यातलं दुःख संपत नाही,
करण तो त्याला नकळत गोंजारून चिटकून राहतो..!-
माणसाला कितीही भूक लागलेली असली
तरीही माणूस विषारी अन्न ग्रहण करत नाही
अगदी तसंच,
मानसिक आरोग्यास घातक असणाऱ्या
व्यक्तींच्या सहवासापेक्षा एकटेपणा कधीही चांगला..!-