कीचड़ से उठकर,
कमल बनना चाहता हूं...!-
त्यांनी धर्म म्हणावं,
आपण कर्म म्हणावं।
त्यांनी लढ म्हणावं
आपण काम मागावं।।
त्यांनी हत्यार द्यावं
आपण पेन घ्यावं।
त्यांनी परंपरा सांगावं
आपण पुस्तक वाचावं।।
त्यांनी भांड म्हणावं
आपण एकोप्याने राहावं।
त्यांनी फसवत राहावं
आपण योग्यवेळी उत्तर द्यावं।।-
जब खादी का काम खाकी नहीं कर पाता तब उसे कॉटन याद आ जाता हैं...!!
-
खुशफहमी में हो यार, के
आज़ाद हो तुम,,
भेडियों के बीच फंसे जिंदा
लाश से हो तुम-
मंदिर हवे तर महापुरुषांचे हवे, आपुल्या छत्रपतींचे हवे आणि या स्वराज्य निर्मात्याचे हवे त्यातही त्यांच्या विचारांचे, आचरणाचे कीर्तन हवे व महाराजांची आरती आणि प्रसादात गनिमी काव्याचे धडे हवे.
|| केले अनंत उपकार आम्हावरी, म्हणून पाहतो हे दिवस सुखाचे ||
|| शिवराय तुम्ही नसता तर आजही जीवन जगलो असतो गुलामीचे ||
-
कुठे मागू दाद
कुठे मिळेल न्याय।
भ्रष्ट नीती चहूकडे
खोलवर रुतले पाय।
जनतेचे सेवक म्हणी
तोच पक्का राजकारणी।
करितो माज जनतेवरी
लोकशाहीच मुंडक दाबूनी।।
प्रलोभने, खोटी आश्वासने
विश्वास तोडण्यात एक नंबर।
गुळगुळीत रस्ते म्हणून
खडकावर फासतात डांबर।।-
फेकणाऱ्याने फेकत जावे,
ऐकणाऱ्याने ऐकत जावे,
एक दिवस फेकता फेकता,
फेकणाऱ्याने,
ऐकणाऱ्यालाच फेकून द्यावे
#अराजकीय-
जगण्याचा आणि भुकेचा प्रश्न एवढा गहन बनवा की मूलभूत हक्क लोकांना ध्यानातही आले नाही पाहिजेत...!!
-
ऐक ना माझ्या प्रियकरा,
किती दिवस राहायचं फक्त मित्र पक्ष
करुनि युती, काढू ना एकच पक्ष।
करू ना संसाराची स्थापन सत्ता
सात जन्म सोबतीने उपभोगू ना सत्ता।।
तू मुखमंत्री, मी गृहमंत्री
कालांतराने, आपल्या पिल्लांचे
होऊ ना आपण पालकमंत्री।।
पंढरी च्या नाही तर, देव्हाऱ्यातील
विठ्ठलाची जोडीने करू ना पूजा
वारकरी म्हणून, आपणच घेऊ ना मान पहिला।।
जरा बंड तू कर ना,
पाठिंबा द्यायला मी आहेच ना
माझ्या हायकमांड ला, खोके देऊन तरी पटव ना।।-