।।गांव।।
आओ मेरे गांव कभी,
हरे हरे खेत खलिहान दिखाएंगे ,
बड़े बड़े मैदान दिखाएंगे ....।२
नदी किनारे की शाम दिखाएंगे,
बगीचे का पका हुआ आम दिखाएंगे.....।२
गांव के मंदिर की कीर्तन में ले जायेंगे,
श्री हरि के प्रसाद दिलाएंगे...।२
तुमको धरती पे स्वर्ग दिखाएंगे ,
प्यारे प्यारे लोगो से मिलाएंगे...।२
आओ कभी .......
तुम्हे अपना पूरा गांव घुमाएंगे.....।।२-
त्यागमूर्ती माता रमाई
त्याग करून "हक्काच्या सुखांचा"..
माथी उचलला "डोंगर दुःखाचा"..
त्याग करून "मातृत्वाचा"..
घेतला वसा कर्तृत्वाचा..
युगपुरुष बा भिमाची झाली रमाई "सावली"..
म्हणून तिला लोक म्हणे "९ कोटी लेकरांची माऊली"..!-
जर तु नसतीस तर हे सगळ सुजलाम सुफलाम अगदीच अस काही नसत,
अस म्हणतात जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी,
आणि तुच उध्दार केलाय आमच्या या जगाचा.
हा “भीम” नावचा रथ तुच तर आणलास ओढत ओढत त्या बुध्दाच्या बोधीवृक्षापर्यंत.
फोटोतील तुझी नजर त्यात ममता,वात्सल्य,आमच्या स्वातंत्र्याची आस
पाहुन दिपुन येत.
तुझी कसलीच तक्रार नसन हेच बाबांच्या यशाच गमक आहे.
म्हणुनच त्यागाच दुसर नाव ‘रमाई’ आहे.
-
रमा
संसाराचा गाढा ओढताना कधी तक्रार केली नाही..
पती साहेब असताना..
वायफळ खर्च केला नाही..
मुलांचा मृत्यू डोळ्यासमोर बगीतला..
पण अश्रूंचा पूर डोळ्यातच रोखला..
तुम्ही साहेबाची रामू झाली..
दीन दलितांची आई झाली..
स्रीयांसाठी आदर्श झाली.
त्यागाची तू संगिनी झाली..
कष्टाची तू सखी झाली..
तुझ्या कष्टाची फळ आता यायला लागली..
बग तुझी कित्येक मुले आज
डॉक्टर कलेक्टर आहेत..
काही विसरली तुझ्या त्यागाला..
पण काही ठेवून तुझा आदर्श
पुढे नेत आहेत संसाराचा गाडा जो
समजासेवेपोटी तुटून पडला तरी..
तू येऊन गेली एक वादळा सोबत..
वादळ विझल पण अजून तेवत आहेत
निखारे कधी न विझन्यासाठी....-
रमाई..
"करुणेची कविता तू ,
मातृत्वाचे महाकाव्य तू..
मावत नाहीस कवितेतही,
मातृत्वाच्या मातृमनाची
काळीज कथा तू !"
-
~~~~~~~~~~~~~~~~~
रमाई
~~~~~~~~~~~~~~~~~
बाबासाहेबांच्या कार्याला
रमाईचा लागला हातभार
म्हणून चालवू शकले
भीमराव देशाचा कारभार...
गरिबीच्या संसारात
दिली मोलाची साथ
संयमाने दिली त्यांनी
नेहमी संकटावर मात...
स्वतःच्या लेकरासोबत
माय झाली होती जगाची
पतीच्या पाठी खंबीर उभी
काया झिजवली स्वतःची..
माया, ममता अन् प्रेम
त्यागाची होती ती मूर्ती
कोणीही विसरू नाही
शकणार माऊलीची कीर्ती...
~~~~~~~~~~~~~~~~~
-
सुटली गाठ जीवनाची,आज पसरला अंधार;
शोधू कुठे तुला मी,सांग कुठे तू दिसणार.
दुष्ट काळाने आज,कशी चाळ खेळली;
माझ्या संगिनींची,जीवनज्योती चोरली.
जिने जीवनभर माझी,काळजी वाहिली
का रमा मला तू सोडुनी चालली......
हट्ट ना केला कधी, हवी मला चोळी;
तक्रारिसाठी माझ्यावरी,आली नाही पाळी.
सोसले फार कष्ट,झाली संसारात लीन;
नऊ कोटी जणांसाठी,धरली छाया माऊलीन.
गरीबीतही श्रीमंती,मनाची पाहिली
का रमा मला तू सोडुनी चालली......
संसारात आमच्या खरा,आधाराचा खांब;
कोठुनतरी ऐकू येतील शब्द "अहो ऐकलात का साहेब".
तुझ्याखेरीज माझ्यापाशी,नाही दौलत काही अन्य;
तुझ्या शिवाय जगणे माझे,पुर्णपणे शुन्य.
या भीमाच्या जीवनातील सुरेल तू बासरी
का रमा मला तू सोडुनी चालली......
माता रामाईच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....💐💐-