कौतुकाने तू हद्द ओलांडावी,
तेथे तू अगदी भरुन सांडावी,
प्रेयसीसारखी तू सतत भांडावी,
मराठी भाषे, तुझी सूक्त अजरामर व्हावीत..!
#satya
-
इन आंखो ने तुम्हे देखा
तो मंजुर रोजे हो गए
कभी मिल भी जा ओ
तो कहीं ईद भी मिंल जाए.
-
Satya
-
मी स्वताला बंदिस्त करुन पाहिलं
कान बंद केले,
डोळे मिटून टाकले,
सळसळनारी बोटांची मुठ बंद केली,
पोटात पाय घेउन झोपी गेलो.
सिलेक्टिव्ह वागावं म्हंटलं
पण नाही जमत ,
कोणीतरी लाथा घालुन उठ म्हणल्याचा सतत भास होतो.
कोणी तरी आपल्यावर नजर रोखून आहे सतत वाटत.
तो बोट दाखवत उभा आसलेला चौकातला पुतळा स्वप्नात येतो.
त्याने दाखवलेल बोट ती दिशा मला झोपु देत नाही अता स्वस्थ
परंतु त्या दिशेला जाताना लक्षात आल
आपली नाकाबंदी झाली आहे.
एखादा बायपास बांधुन पार करावा का ?
‘संविधान’ नावाचा उड्डाणपूल मला सर करावाच लागेल,
तरच ‘माणुसकीचा मार्ग’ सापडेल नाहीतर मलाच एखादी पाटी गिरवावी लागेल त्या रस्त्यावर ,
“नजर हटी दुर्घटना घटी”
-
Satya
-
वर्तमान आन् भुतकाळापासुन
सावध पवित्रा घेताना होते गोची ,
आत्मभान हरपे पर्यंत सुसाट सुटायचो ,
निर्मनुष्य रस्ते,निरव शांतता ,निसर्गाच भुत ,
किलबिल पक्ष्यांची ,धडधड छातीत ,
आतला आवाज आतच बाहेर तरी खिन्न
घामाच्या धारा , हवेतील आर्द्रता
चष्म्यावर बाष्पाचा लेप
धुसर भविष्य-
क्वारनटाईन
शहरे होत चाल्ली आहेत ‘लाॅक डाउन’
तशी माणसं पण व्हावीत बंदिस्त आतल्या आत
फतवे निघत आहेत स्वताला बंदीस्त करण्याचे
करुन घ्यावं माणसान ‘क्वारनटाईन’
या समाजापासुन
या जमिनी पासुन
या पृथ्वी पासुन
संपुर्ण पृथ्वी व्हावी ‘क्वारनटाईन’
या ग्रह मालेतून
या सुर्यापासुन
या आकाशगंगेपासुन
सर्व नष्ट व्हाव सर्व काही नव जन्माव
नवी पृथ्वी नवी माणसं नव
सर्व काही नव...
-
तु शिकवल उपर्या शब्दांचे पालकत्व स्वीकारायला,
तुच सांगीतल स्वताचा ऱ्हास सुंदर आसतो,
अर्धवट कवितेच अस्तित्व ही तुच दाखवलय
म्हणुनच मलाही वाटत काय हरकत आहे
‘विघटन’ होत असेल तर...
-
चुकत नसतानाही किती चुकतो आपण
आणि
चुकल्यावरही वाटत आपण चुकलोय कुठ ?
शेवटी माणुस हा ‘चुकीचा पुतळा’ आहे.-
ठेवणीतल्या वस्तुंची अडगळ वाटायली
की समज़ुन जायच,
त्या वस्तुंची गरज संपलीय.
-satya-
‘मोकळीक’
आता कोंडूण गेलाय श्वास यार हो
असह्य अपेक्षांचा भार हा,
हसूनीच झेलले कित्येक वार ते
मन मारूनी स्वार मी फरार हो,
ठरवून नव्हता मांडलेला मी पसारा हा
सरते शेवटी आठवणींचा अजन्म करार हा.
#satya-