प्रस्ताव
देत आहे प्रेमाच्या
माझा आज प्रस्ताव
माझ्या हृदयी वसला
तुझ्या प्रीतीचा गाव...
तुला जीवनात मला
आणायचे आहे आज
मागणी घालत आहे
तुझ्या जवळ खास...
पहिल्या वहिल्या प्रेमाचा
वेगळा वाटतो आनंद
तुझ्या स्वप्नात रंगायचा
लागला मज छंद....
होकार अन् नकार
काहीही असो तुझा
तुझ्यातच आता जीव
गुंतून पडलाय माझा....
-
वर्षा भोळे
16 Followers · 47 Following
Joined 23 December 2019
10 FEB 2022 AT 17:13
18 DEC 2021 AT 14:27
प्रश्न पडतात मनाला
घोर लावते तुझे वागणे
तुझ्यासाठी माझे असे
दिवसरात्र वाट पाहत जगणे.....-
18 DEC 2021 AT 14:25
एका वेगळ्याच वळणावर
येऊन ठेपलय माझ आयुष्य
असेच घडत राहिले तर वाटते
चिंता कसे असेल माझे भविष्य.....-
18 DEC 2021 AT 14:24
अभिव्यक्त होतेय मी
त्रास होत असेल तर सांग
समजावूनही उतरत नाही
मनावर तुझ्या प्रेमाचा भांग...
-
18 DEC 2021 AT 14:11
वेळ जात नाही माझा
काढल्याशिवाय आठवण
एक तुझीच आता झालीय
माझ्या मनात साठवण....
-
18 DEC 2021 AT 14:09
दुरावा आता आपला
नाही होत सख्या सहन
तुझ्यासाठी माझा विषय
का झालाय आता गहन...
-
18 DEC 2021 AT 10:37
सांग ना सख्या मजला
कसा घालू मनाला आवर
हृदयाचा बांध तुटण्या आधी
येऊन तू मला नीट सावर.....-
18 DEC 2021 AT 10:28
पार बुडाले सजना
मी प्रितीच्या डोहात
सांग ना कसे तरू
पाडलेस मज मोहात...
-