QUOTES ON #MULGI

#mulgi quotes

Trending | Latest
21 APR 2020 AT 16:16

मी मराठी...माझी शान मराठी
अभिमान माझा मराठी
छत्रपतींच्या पाई नतमस्तक मी
लाऊन चंद्रकोर कपाळी......
मी मराठी.... माझी शान मराठी
दैवत माझे राजे.......
नजर झुकलेली नसेल, कना पाठीचा ताठ असेल
नकात नथ..अन् अभिमान महाराष्ट्रीयन असेल..
डोळ्यात छत्रपतींच तेज, चेहऱ्यावर भगवा फडकत असेल....लाख वेळा विचार करायचा,
जेव्हा नजरेत खोट, न मुलीच्या चारित्र्याशी खेळत तू असेल, जरा घाबर ...या महाराष्ट्रात माझ्या भगवा,
अन् वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा इतिहास
डोळ्यात असेल
मी मराठी...माझी शान मराठी
अभिमान माझा मराठी.
🚩Pallavi Wale 🚩

-



Choti hai pr pyaari hai
Sb ki bohot dulari hai
Chocolate ki ye deewani hai
Nakhro me sab ki nani hai
Aai baba ki laadli hai
Kaka Mavshi ki raajkumari hai
Expression iske laajawab hai
Baatein iske aise jaise koi khwab hai
Aankho me ajab sa nasha hai
Kyuki naam iska Tisha hai

-


27 SEP 2020 AT 17:45

मातृत्व साजरं केलं तिने झाले मी जननी,
इवलेसे तिचे पाऊल पडले अंगणी,
दुःख तिचे पाहून काळीज हेलावते,
तिच्या सुखासाठी काहीही करावे वाटते..!!

परीचा फ्रॉक घालून घरभर फिरते,
रुणझुणत्या पैंजनसोबत तुरुतुरु चालते,
लटकेच रुसणे आणि खळखळून हसणे,
निर्भेळ ते सुख आनंद देऊन जाते..!!

रागावून तिच्यावर कधी डोळे मी मोठे करते,
असं का ग आई?शोनपापडी मी तुझी लाडच कर म्हणते,
मी तुला कुठे कुठे सोडून जाणार नाही!
असे म्हणून मला बिलागते,
मधाळ तिच्या बोलण्याने मी रागच विसरून जाते..!!

मायेच्या ओलाव्याने सर्वांचे मन जिंकते,
लहान असो वा मोठे सर्वांना जीव लावते,
'राजकुमारी आहे मी' म्हणून हलकेच लाजते,
होकाराचा दाखला मिळताच आनंदून जाते..!!

-


28 NOV 2020 AT 16:37

तु साधी सरळ अवचित
शब्दांच्या वेढ्यात बोलते क्वचित
तु अवखळ वाहणारा झरा नियमित
भासते गुणगुणनारे मधुर गीत
तुझे प्रामाणिक हास्य निखळ मनमीत
लपवू न शके जसे राधा प्रीत
तु मनमोहिनी मनास करते मोहित
वेड लावते नृत्य हरवते चीत
तु स्वछंदी प्रेम वाटते नित
तहानलेला जणू पाणी पि नदीत
तु उत्तम कलेचे उदाहरण नवनीत
भासते जसे रहस्य कोणते विघटीत...!!
-smriti

-


18 OCT 2020 AT 0:22

तिचे बोबडे बोल
तुम्हाला हसवतात,
आणि सासरी गेल्यावर
तिच्या आठवणी रडवतात.

कधी आई बनून
ती मायेनं जवळ घेते,
तर कधी ताई बनून
मैत्रीचं नविन नातं शिकवते .

चालती बोलती लक्ष्मी
आहे तुमच्या घरात,
तिचा आदर करा
ती सुख आणेल तुमच्या दारात.

तिला तुमचा पैसा नको
करायला हवाय तिचा सन्मान,
तिला डिझाईनर साडी नको
पण हवंय तिला सुरक्षित स्थान.

-


3 JAN 2021 AT 16:36

आमच्या स्वप्नांचा झुला
उंच आकाशी गेला,
देवाने जणू तुझ्या
रूपात आशीर्वाद दिला,
स्वच्छंदी प्रेम तुझे
मनास लावते वेड,
प्रामाणिक ते हास्य
भासते किती तरी गोड..!!

-


4 JAN 2021 AT 16:44

Single मुलाचं काम......
मुलींची Request अली की
त्याची Profile Check करणे
आवडला तर Accept करणे
आणि नाही आवडला तर Delete करणे
😂😅😛

-


27 SEP 2020 AT 19:23

साजरे दिसते अंगण जेव्हा शोभे तिथे तुळशी वृंदावन,
खळखळून हसते घरदार वाजता लेकीचे पैंजण,
लेक म्हणजे देवाकडून आलेली आनंदाची खेप,
भळभळत्या जखमेवरचा जणू चंदनाचा लेप..!!
मनात असतात तिच्या असंख्य आशा,
आई वडिलांच्या मनाची तिलाच कळते भाषा,
अबोध,निःस्वार्थ,निष्पाप जीव तिचा,
वंशवृक्ष नाही पण वंशवेल आहे ती तुमचा..!!
प्रेम,माया अन काळजीचे
शब्द असतात तिच्या ओठी,
लेक,सून,आई भूमिकेतून
जाताना असते तिची कसोटी,
धन्य ती हर एक माऊली
जन्म घेतला तू जिच्या पोटी,
प्रत्यय यावा सर्वां कारण
बेटी असते धनाची पेटी..!!

-


10 JUL 2022 AT 12:20

*दारा समोर अंगणा मधे*
*सुबक रांगोळी दिसावी..*
*प्रत्येक घरात कमीतकमी*
*एक तरी मुलगी असावी..🌷*
*मुलगी म्हणजे घरासाठी*
*जीव की प्राण..*
*तिला पाहून हरपून जातं*
*सारं देहभान..*🌹
*मुलगी घरात असली म्हणजे घर कसं फुलून जातं..*
*तिचं असणं घरासाठी*
*चंदनाचा लेप होतं..🌹*
*का बरं तिचेच नाव तोंडी असतं.*
*चोवीस तास येते ओठी..🌷त्याग,प्रेम,माया,काळजी*
*शब्द फक्त तिच्यासाठी..🌹
*आई वडिलांचं मन वाचण्याची भाषा कुठून शिकते ती
*सारं दुःख कुशीत घेऊन* *इतरांसाठीच जगते ती ?🌹
*असो अथवा नसो काही* *मन कसं भरून जातं..🌹
*आई-बाबांच्या म्हातारपणी* *मुलगीच होते त्यांची आई.
*घर कितीही मोठं असो**"मुली" शिवाय श्रीमंती नाही🌹
*मुलीसाठी देवा समोर**हात जोडून बसलं पाहिजे..🌷
*प्रत्येकाच्या अंगणा मधे* *"तुळशीचं रोप "असलं पाहिजे..🌷🌱🌷*

-


16 APR 2020 AT 22:27

कन्यादान सारखं पुण्यकाम
सर्वांच्या नशिबी
Nast

" कारण "

घरात "मुलगी" असायला
ही नशीब लागत
Asst

😍 सुनील

-