प्यार का मौसम
सुबह आया शाम को चला गया...🤷
— % &-
तिर गुंतला हृदयात माझ्या
भाव खट्याळ डोळ्यातला
ऋतू रंगला पावसाचा,
कोवळी, कोमल कळी मी
सांजवेळी आज फुलली.....
भाव खट्याळ डोळ्यातला
छेडून, कुरुळ्या केसा -
गजरा रातराणीपरी फुलला...
सजले रंग सारे तरी हृदय रंगहीन माझे,
कोवळ्या या कळीला,
आज फुलपाखरू सांगून गेले,
भाव खट्याळ डोळ्यातला,
हृदय हृदयाचे न राहिले......
तिर गुंतला हृदयात माझ्या
पाहून सांजेचा हा वेडापिसा पसारा,
भाव खट्याळ डोळ्यातला,
ऋतू रंगला पावसाचा........
✍️ पल्लवी वाळे ✨
— % &-
पापण्यांना अश्रूंच ओझं होतं
आतल्या आत हृदयाच रान मात्र भिजून जातं...
रडता येत नाही मन भरून आल्यावर,
मग व्यक्त होतात शब्द कोऱ्या कागदावर....
विचारांना भेदून,
हृदयाला स्पर्श करून,
पुढे अश्रूंना धक्का देऊन,
ते थेट जातात प्रत्येकाच्या मनामधून......
— % &-
तू पिंपळाचं पान, मी झुळूक वाऱ्याची सख्या
कडकडीत ऊन, अन् त्यात सावलीशी मी छाया...
छंद लागे तुझा,
छंद लागे तुझा......
तु तर गंधाळलेल्या स्वप्नात माझ्या,
मी कळी कोवळी जाईची, तू खट्याळ किरण सांजेचा
छंद लागे तुझा,
छंद लागे तुझा......
तू मधाळ राजा, दवबिंदूपरि सजला,
मी मधराणी मधमाशांची,
दवबिंदू चोरून आणला.....
तू पिंपळाचं पान, मी झुळूक वाऱ्याची सख्या
कडकडीत ऊन, अन् त्यात सावलीशी मी छाया...
✍️ पल्लवी वाळे 🍂
— % &-
अंधारलेली रात्र ही
रातराणी इथे उमलली...
कोवळ्या या पाकळ्यांना
पाहून कळी माझीही फुलली.....
गंध तुझ्या श्वासात माझ्या
आवडे तोही स्पंदनाला,
मोहित मन आज मनमोहिणी झाले
वाऱ्या सवे गंध सारे,
मी गंधात तुझ्या दरवळू लागले....
पाहून वाळवंट, हृदयात तुझ्या
ढग हृदयात माझ्या, दाटून आले
बरसता पाऊस धारा,
गंधाळले मन....
तू खट्याळ वारा, चोरून पाहे
माझ्यातले, तुझे हे सारे क्षण.....
✍️ पल्लवी वाळे🍁
— % &-
हृदयातल गुलाब घेऊन स्वप्न रात्रीच थांबलं होतं
चांदण्यांच्या छताखाली मन खुळ्यागत वागलं होतं
तुझ्याच प्रेमाच्या आडोश्याला,
मन माझं ते रमलं होत....
अता येईल वारा, पडतील पाऊसाच्या धारा
सांग तूच एक होशील का माझ्या दर्याचा राजा.
हृदयातल गुलाब घेऊन स्वप्न रात्रीच थांबलं होतं
चांदण्यांच्या छताखाली मन खुळ्यागत वागलं होतं.
तुझं माझं प्रेम-तुझं माझं प्रेम,
आता गुलाबाच्या पाकळीलाही ठाऊक होतं
सांग तूच,
होशील का माझ्या हृदयात रातराणीची बाग एक.
हृदयातल गुलाब घेऊन स्वप्न रात्रीच थांबलं होतं
चांदण्यांच्या छताखाली मन माझं-तुझं झालं होतं.
प्रेम चांदण्या गुलाब-प्रेम चांदण्या गुलाब
शब्द मैफिल रंगली बघ....
तुझ्याच प्रेमाच्या आडोशाला
हृदयातल गुलाब घेऊन,
स्वप्न चालून आल मग.....
✍️ पल्लवी वाळे
— % &-
पुन्हा तुला शोधावं, तुझ्याच सोबत जगावं
भरकटलेल्या मनाला, तुझ्या हृदयाशी बांधवं
हातात हात घेऊन, मी पुन्हा शब्दांना जोडवं
अधुऱ्या माझ्या कवितेला मी पुन्हा तुझ नाव द्यावं..
होशील का माझा, मी हक्काने विचारावं,
सांग आपल्या नात्याला पतंग कधी बनवावं...
दोरी बांधेन हृदयाला मी, फक्त सोबत मला दे
तुटलेल्या तूझ्या मनाला सावरेल मी,
माझ्या हृदयाला, संजीवनी आणण्याचा हक्क दे..
रडलं असेल मन तुझं, पण मन माझही हसल नव्हतं,
एकदा डोकावून बघ, तूझ्याच साठी बनलेल हृदय
काचेच कस असेल....
डोळ्यात बघ फक्त, ढग नसलेल्या आकाशातूनही
पाऊस पडेल,
मन सांगतं माझ...या फुलपाखरासाठी
हृदयात तूझ्या नक्की जागा असलं.....
✍️ पल्लवी वाळे.
-
एक पान मैत्रीचं एक पान प्रेमाचं
गुंफलेल्या नात्यांना कुंपण माझ्या डायरीचं.
उमललेल फुल तिथे, मैत्रीच्या चेहऱ्यावर सजलेलं.
हसलेलं-गाजलेले नात मैत्रीचं,
त्याच डायरीच्या पानावर लिहिलेलं...
एक पान मैत्रीचं एक पान प्रेमाचं
गुंफलेल्या नात्यांना कुंपण माझ्या डायरीचं
कोऱ्या पानावर कोऱ्या प्रेमाला
रंग भरले मैत्रीचे
हातातल्या पेनाने, माझेच मला कळू ना
दिले भाव प्रेमाचे....
एक पान मैत्रीचं एक पान प्रेमाचं
गुंफलेल्या नात्यांना कुंपण माझ्या डायरीचं.
लिहून ठेवले सगळेच नाते
एक आठवण आहे माझ्याकडे,
जे डायरीत आहे तेच मनात आहे,
पण मनातले नव्या नात्यांच्या शोधत गेले...
एक पान मैत्रीचं एक पान प्रेमाचं
गुंफलेल्या नात्यांना कुंपण माझ्या डायरीचं
✍️ पल्लवी वाळे
-
कि,
आंखों ने अकसर
मोहब्बत को झुकते देखा हैं,
एक बेटी ने पिता के लिए
मोहब्बत तोड़ते देखा हैं।
-