शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
"छत्रपती शिवराय" हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!!🚩
"अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा...🙏"
🙏🌷सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!🌷🙏
-
विचारांचे धन | साठवावे मनी |
आठवावे ध्यानी | जन्मांतरी ||
मुखी देवाजीचे | घ्यावे सदा नाव |
मनी भक्तीभाव | ठेवोनिया ||
आईविन नाही | मायेला पाझर |
जग हे निष्ठूर | आईविना ||
नातं हे मैत्रीचे | आठवांचा गाव |
नसे दुजाभाव | मनोमनी ||
संसाराचा गाडा | दोघांनी हाकावा |
पूर्णत्वास न्यावा | जन्मोजन्मी ||
होऊनी सबळ | आयुष्य उदंड |
चालावे अखंड | भूमंडळी ||
पांग समाजाचे | रहावे फेडत |
दृष्टांशी झुंजत | सदोदित ||
-
सायंकाळच्या प्रहर, थोडासा धीर धर
येईल रे आपल्या जीवनात ही बहार
कष्ट करतात मायबाप शेतात दिनरात
चार पैशे जमले की, दिवस जातील सुखात
पोरांना नवीन कपडे मिळतील
खायला आपल्याला पोटभर मिळेल
मुल चांगली शिकतील की रे
आपले पण दिवस बदलतील रे
आता आपला भगवंतच सहारा.
कष्ट करून वाट बघत आहे सारे
उद्या सुंदर जीवन असेलच
पण आज तरी या सायंकाळच्या प्रहरी धीर धर-
सायंकाळचा प्रहर होता, होकार तिन दिल होता.
पहाटेच स्पप्न माझ साकार तीनं केल होत.
गमवलेल खुप काही, त्याच दुखः होत नव्हत
स्पप्नातल्या परीने होकार जो दिला होता.
हातात माझ्या प्रेमान हात तीनं दिला होता.
सोबत ती चालत होती, आनंदान ती गात होती.
ऐकुन तिचे गाण, मन प्रसन्न होत होत.
पावलांनी ही ठेका धरायला सुरु केल होत.
मावळत्या सुर्यप्रकाशाने आभाळ लालसर झाल होत,
प्रकाशाने त्या रुप तिच उठुन दिसत.
वार्याची मंद झुळुक येत होती,
केस तिचे हळुवार उडत होते.
निसर्गाच वर्णन ती करत होती,
मी मात्र तिचेच वर्णन करण्यात व्यस्त होतो.
ती बोलतच होती, काय बोलते काही कळत नव्हत,
शब्द तिचे अमृतासम वाटत होते.
चेहर्यावरचे हास्य अतुलनीय होत,
क्षणांना ह्यदयात कैद करण्याचा हट्ट मनान धरला होता.
वेळेच ही भान उरल नव्हत,
सायंकाळचा हा प्रहर आयुष्यभर असाच असावा मनाला वाटत होत.-
जब लोग पूछते हैं कि हमारे बीच क्या हुआ, तो मैं इसे टाल देती हूँ और एक साधारण सा जवाब देती हूँ –
'हम बस साथ नहीं रह पाए। हम बड़े हुए और अलग हो गए।'
यह समझाने से आसान है कि
"कैसे एक दिन मैंने अपनी हथेलियों में पूरी दुनिया थामी हुई थी, और अगले ही दिन उसे अपनी उंगलियों के बीच जलते हुए देखा।"
हम बड़े हुए और अलग हो गए, और शायद अगर मैंने तुम्हें थोड़ा सा भी कम प्यार किया होता, तो मैं शब्द खोज पाती। लेकिन तुम्हें प्यार करना कभी आसान नहीं था, और तुम्हें खो देना वह कहानी है, जिसे मैं कभी बयां नहीं कर पाऊँगी।
-
मंगलाष्टकात हसते ती
सगळ्यांना आनंदात बघुन
मग मात्र पाठवणीत
ढसा-ढसा रडते ती
आई-बाबांना बिलगून-
तू स्वप्णात येण्यापेक्ष्या तू माज़्या
सोबत असण्यात एक वेगळीच मज्जा असते .
-
मला तुला फक्त एकदा भेटायचं होत😕
मनातलं सगळं सांगायचं होत 😑
डोळे भरून तुला पाहायचं होत❤️
मला तुला फक्त एकदा भेटायचं होत😕
मनसोक्त मिठी मारून रडायचं होत😭
खूप काही बोलायचं होत😢
खूप काही तुझ्याकडून ऐकायचं होत ☹️
मला तुला फक्त एकदा भेटायचं होत😕
तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन निवांत बसायचं होत😌
तुझा हात हातात घेऊन नदीकाठी फिरायचं होत😇
मला तुला फक्त एकदा भेटायचं होत😕
-बोल मनाचे😊
-रोहिणी कुरळे.
-
सायंकाळचा प्रहर जेव्हा
परतती पक्ष्यांचे थवे
सारे आभाळ व्यापून जाते
वाटून जाते नवे
सागरात त्या तरंगती लाटा
धडकती किनाऱ्यावरती
'सूर्यास्त' तो बघा जाहला
क्षितिजाच्या माथ्यावरती
कातरवेळी शुभंकरोती
मनी घडतो भक्तीभाव
घरात साऱ्या सुख नांदते
घेता "देवाजीचे" नाव
वाफाळलेला चहा तृप्त
त्याचा अधरी होता स्पर्श
तनामनात चढते धुंदी
प्रेमाचा तव ढळतो दर्प
धुंद अशी संध्याकाळ
नयनरम्य ते देखावे
निसर्गाचे ते भावचित्र
तव हृदयी रेखाटावे
-