आयुष्यात "मीपणा" सांभाळलेल्या व्यक्तींची कामं कधीही सार्थकी लागत नाहीत.
-
Hobbies-Reading,Trekking,Watching Movies Photography, Collecting old coins,
Jung... read more
शब्दांची रांगोळी
प्रत्येकाने सजवावी
अर्थपूर्ण रंग भरून मग
नित्यांतरी जोपासावी
छटा भरून त्यात अक्षरांची
शब्दार्थांची जुळणी करावी
यमक,अलंकारांनी सजवूनी तिला
संग गुणांची पारख करावी
म्हणी, वाक्प्रचार गुंफून कधी
आशेची माळ गुंफावी
कधी कधी सुविचारांनी त्या
शब्दांची शोभा वाढवावी
शब्दांची सांगड घालून मग
सुंदरशी बोली वदावी
शब्दांमध्ये गुंतून त्या
उत्तुंग यशाची शिखरे गाठावी
शब्दरूपी रांगोळीला तडा जाणार नाही
याची सदोदित काळजी घ्यावी
योग्य ठिकाणी तिचा मेळ बसवून
जन्मांतरी सार्थकी लावावी-
नारी शक्तीला समर्पित
नऊ दिवसांचे नऊ रंग
प्रत्येक दिवसाचे नवे अवतार
असतात नवनवीन ढंग
आदिमाया आदिशक्ती
किती तुझी नावे
तो प्रत्येक जण पूजतो तुला
ज्याला नाव तुझे ठावे
नऊ दिवस नऊ रात्र
जागर असतो भक्तीचा
प्रत्येक स्त्रीत वावरणाऱ्या
आदिमाया आदिशक्तीचा
आजची नारीशक्ती म्हणजे
जणू छत्तीस हत्तींचे बळ
जिला पाहताच वाईट प्रवृत्तींच्या
छातीत येते कळ
नारीशक्ती पुन्हा घेईल
उंच उंच भरारी
स्वतःस पुन्हा सिद्ध करण्यास
दुनियाही विसरेल सारी
-
संघर्ष असावा भाल्यासारखा
उंच आभाळी भिडणारा,
आव्हानांना कवेत घेऊन
संकटांना भेदनारा.-
फुलपाखरू स्वैर मनाचे
बागडावे चोहीकडे,
नव्या आशेच्या,नव्या फुलांवर
जैसे शोभती सूर्यकिरणांचे सडे.
-
मनाच्या एका कोपऱ्यात
तू आजही कुठेतरी वसतेस,
कितीही विसरायचं म्हणलं तरीही
का स्वप्नामध्ये दिसतेस ?
-
नसेल प्रकाश प्रभाकराचा
नसे लकाकी चंद्र-ताऱ्यांची,
परि तरुवरती नक्षत्र दाटते
जेव्हा भरे शाळा काजव्यांची.
-
लागले मन परतीच्या वाटेवरती
घेऊनी तुझ्या आठवणींना,
आजही असशील का त्या वाटेवरती
देशील का उजाळा त्या आठवणींना.
-
चाफा मजला लावूनी जातो
तुझी वेडीशी ओढ,
ओंजळीत घेऊनी त्या चाफ्याला
आता तरी रुसवा सोड.-
काजळ तुझ्या मृगनयनांतले
व्हावे का मी ?
अश्रू बनूनी त्या काजळासवे
वहावे का मी ?-