QUOTES ON #JANIV

#janiv quotes

Trending | Latest
27 APR 2019 AT 9:09

जाणीव असुद्या

छोट्याश्या या आयुष्यात दुसर्‍याचाही विचार असुद्या
आयुष्य मिळालय याची थोडी तरी जाणीव असुद्या

धैर्याच्या शिखरावर चढताना माणुसकीची जाणीव असुद्या
खुप काही मिळाले तरी शुन्याचीही जाणीव असुद्या

सुखाच्या रात्री हास्य चेहर्‍यावर असुद्या
ही रात्र सुद्धा जाणार याचीही जाणीव असुद्या

पाहिजे ते मिळाले नाही तरी आशा जवळ असुद्या
ठेच खाल्या शिवाय यश मिळत नाही याचीही जाणीव असुद्या

जन्माला आलोय आपण विचार जरासा असुद्या
म्रुत्यु सुद्धा एक दिवस येणार याचीही जाणीव असुद्या

-


25 APR 2021 AT 17:06

दोन ओळींची गोष्ट,
खूप काही शिकवून गेली,
सगळ्यांकडून झालेल्या चुकीची जाणीव करून,
सगळ्यांचे डोळे ओले करून संपली!

-© बालकवी अनुज शिंत्रे.

-


1 AUG 2022 AT 17:12

मी का असं करतो?
मी धुंद होतो तुझ्या विचारात,
जगाचा काय स्वतःचाही विसर पडतो,
मला अशा भावना कधीचं नव्हत्या,
मी आताशी प्रेमात पडलोय का?
प्रेमात वेडं लागतं, अस का म्हणायचे आताशी कळतयं,
हे चूकं की बरोबरं, मला नाही माहीत,
जे काही आहे, हवहवसं वाटतं,
तुझं असणं, तुझं नसनंही,
कारणं तु असतेस तेव्हा तुझा सहवास,
तु नसतेस तेव्हा तुझा आठवण,
तुझ्या असण्याच्या सुखात,
तुझ्या नसण्याच्या दुःखात,
तु आणि फक्त तु,
आणि यासाठी तुझी देखील गरज नाही.
प्रेमात आणि भक्तित काय फरक ?
अतिव भक्ति म्हणजेच प्रेम
की
अतिव प्रेम म्हणजेच भक्ति...

(भाग- जाणिव )

-


8 JUL 2020 AT 21:44

जाणीव नाही प्रेमाची
मग कशाला उरात ज्योत पेटवली प्रितीची

-


14 APR 2021 AT 1:12

काही माणसं,
पैसा, प्रतिष्ठा, संपत्तीने, समृद्ध होतात,
तर काही,
अनुभव, शहाणपण,
आणि,
शाश्वत सत्याची जाणीव,
याने समृद्ध होतात....

-


9 SEP 2018 AT 9:36

एखादी चूक होत असताना
स्वतःला जाणीव होत नाही,
पण लोकांना लवकरच होते.
आणि तेच चांगले कार्य केल्यास
त्याची जाणीव स्वतःला असते,
पण लोकांना नसते.

-


12 JUL 2021 AT 18:06

जबाबदारीची जाणीवं झाली की
माणसाला शहाणपणं येतं.
🤗

-


2 SEP 2020 AT 23:22

If u committee some1........something
U better make it on time .......or before it......
Coz
If u r late for a moment u may  jus lose the momentum

-


22 SEP 2022 AT 13:29

आपल्या अडचणीच्या काळात ज्यांनी मागचा पुढचा
कसलाही विचार न करता आपल्या घासातला घास
काढून देऊन तुम्हाला मदत केली त्यांना विसरू नका.
किमान त्यांच्या अडचणीच्या काळात तरी तुम्ही
त्यांच्या पाठीशी उभे राहून माणुसकीचा परिचय द्या.

यातच सगळं भरून पावलं!

-


30 OCT 2020 AT 11:17

अधुऱ्या जीवनात मी अधुरा राहिलो,
तू माझं थोडं दे मी तूझं थोडं घ्यायलो..
अपूर्ण होऊनी पूर्ण कर मला,
तुझा ओठांवर नाम होऊ दे मला..
शब्दाची गरज नाही जो साथीला तू माझा..
जाणले तुझे मन मी डोळ्यातुनी तुझा...
❤️

-