ज्ञान की तृष्णा है,
तो
ज्ञान भी तृष्णा है,
अगर
तृष्णा है तो ज्ञान कैसे हो?-
इसे सुन कर कोई वाह करता है, कोई आह,
हिम्मत सच कहने की... read more
तुका माझा झाला असा विठ्ठल विठ्ठल,
केलिया आळवण भक्ता मंदी ,
आणिक सांगतसे राम कृष्ण हरी,
देवा, तु माऊली जगताची..-
तुका माझा झाला असा मुक्त संसारी,
केलिया उधळण धनाचीया,
आणिक देवाची म्हणे ही काया
देवा, तु सावकार म्हणतसे..-
Men cannot understand the heart' of a woman,
So no women can of men-
N again i realize,
one person who knew me very well was
My Father
Miss You Papa
-miravi-
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही...
का नाही होणार, असा हा समाज,
कुठे गुरु राहीले, कुठे शिष्य राहीले आज,
धर्म म्हणतो आपण, पण कुठे पाळतो,
सहजच आपण माणसे, घरासकट जाळतो,
न्यायाधीश आता, न्याय नाही देत,
पक्षप्रवेश करुन, सर्व शुद्ध झालेत,
संसदेत विषय आता भाकरीचा,
कसा कधी निघत नाही,
कारण,
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही...-
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही,
शनिवार नाही होत कवायत कोवळ्या उन्हात,
नाही नाचत मोर आता आंब्याच्या वनात,
आता शाळेच्या परसात, नाही रोपवाटिका,
नाही सोडवत आता विद्यार्थ्यांची शंका,
आता कंपल्सरी असते बरका ट्युशन,
जास्तीत जास्त टक्केवारी एवढंच मिशन,
बॅगा वाहणारी, पीढी गुलामांची,
आपणचं बनवतोय, कुणासच दिसत नाही,
कारण,
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही...-