"अरे,काही नाही राहत रे कुणाचं कुणावाचून",
हा माझा, तो माझा
ही उगाच मनाची आगळ आपण आयुष्यभर घालत बसतो....
आपण मानलं तरी आणि नाही मानलं तरी नेहमी एकटे असतो आणि स्वतःसोबतच असतो...
लोकं आपल्या सोबत त्यांच्या सोयीनुसार येतात आणि जातात.. मग ते जगात असो किंवा आपल्या आयुष्यात.. हें आधीपासून पृथ्वीवर चालू होतं आणि पुढेही चालूच राहील..
म्हणून,
आपल्या मस्तीत आणि आपल्या जीवनात आपणचं राहायचं... 🌿आपण दुसऱ्याच्या जीवनात गेलो काय, आणि कुणी आपल्या जीवनात आला काय तोही जाणार आणि आपणही जाणार 🌿हें जेव्हडं लवकर समजलं..तर..जीवन, जीवन नाही राहत... आनंदाचं आणि समाधानाचं दुसरं नावं होऊन जातं.... 🌿-
जीवनातले खुप सारे पराभवचं,
आपल्याला यशाकडे नेतात....
विजयातून आणखी काय करावं
याचे "अनुभव"मिळतात,
तर,
पराभवातून काय करू नये
याचे "धडे".-
हमारी जिंदगी में,
कुछ "लोग नही रहते",
बस,
उनकी "बाते" रह जाती हैं |
और,
कुछ "लोग तो रहते हैं",
पर,
पहले जैसी उनकी बाते "नही" रहती.......-
आपली वेळ नसतांना,
"वेळ " देणारी माणसं असावीत...
"वेळ "आल्यावर,
आपली नसणारी माणसंही वेळ देतात....-
किसीने घरदार बदला...
किसीने किरदार...
बदली किसीने हालात..
किसीने कायनात...
बदलने वाले ने ये सब तब बदला..
"जब उसने खुद को बदला.......... "-
वक्त की ही तो बात हैं |
वक्त पर ही सही होगी |
ना हुई,
तो डर कैसा...
आखिर..
बुरा हो
या
अच्छा हो...
सच्चाई तो यही हैं |
"ये वक्त भी चला जायेगा ".......-
आपल्यांमध्ये "आपलेपणा "असेलचं असं नाही..
पण..
"आपलेपणा "असणारे आपले नसले,
तरी आपुलकी असल्यामुळे आपलेच राहतात आजन्म.....-
कुणीतरीआपल्या जीवनात,
एक असतोच..
ज्याला आपण नेहमी बरोबर आहोत.,
असा भास होतो...
आणि,
कुणीतरी आपल्या जीवनात, असाही एक असतोच....
ज्याला आपण नेहमीच चुकीचे वाटतो,
पण तो त्याचा अनुभवहीन भ्रम असू शकतो ...
म्हणून,
आपण मात्र दोन्हीही भ्रम आणि भास आहेत..
हें लक्षात ठेवून आपल्यालाही "शहाणपण" येण्यागोदर असे भ्रम, भास होत होते,
हें लक्षात घेऊन आपण सुधारलो,
तोही सुधारेल असा विचार करून त्याचा विचार सोडून द्यावा......-
जर आपलें कोण आणि परके कोण,
हें ओळखायचं असेल तर फक्त..
तुम्हाला त्यांच्याविषयी नक्की काय वाटतं ते सांगा,
मग ते वाईट असो वा चांगलं...
ऐकून जर सोडून गेलेत ते आपले नाहीत...
आणि
ऐकूनही जे सोबत राहतील तेच आपुले...
खोटं पचवनं सोपं आहे...
खरं मान्य करणं,
जरा जिकिरीचं......
-
स्वतःच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्याशी बोलणारे आपले असतात....
त्यांचा वेळ जावा..म्हणून आपल्याकडून
"आपला वेळ "काढून घेणारे कदाचित आपले नसतात.....-