QUOTES ON #हीगुलाबीहवा

#हीगुलाबीहवा quotes

Trending | Latest
7 NOV 2018 AT 0:40

ही गुलाबी हवा, स्पर्श करते जेव्हा मला.
आभास होतो तेव्हा तिचा मला.
घेऊन जाते स्वप्नातील महालाकडे मला.,
जिथे जपुनी ठेवल्या सार्‍या तिच्या आठवणी.

ही गुलाबी हवा, स्पर्श करते जेव्हा मला.
घेउन जाते,
आठवणीत माझ्या घरासमोरील अंगणाच्या,
मांडीवरती डोके ठेवुनी आईच्या ऐकताना गोष्टी रामायनाच्या,
मोजताना आकाशातील तारे निजुन अंगणात माझ्या.

ही गुलाबी हवा स्पर्श करते जेव्हा मला.
घेऊन जाते,
बालपणीच्या आठवणीत मला,
पहाटे सोबत घेउन सार्‍या, सवंगड्यांना पळायला.,
डोंगरातील ओढे पाहायला, मनसोक्त फिरायला....

-


7 NOV 2018 AT 7:12

ही गुलाबी हवा
हूर हूर लावते जीवा.....
कोवळे प्रेम हे
कोवळ्या जाणीवा...
ही गुलाबी हवा
हूर हूर लावते जीवा....

श्वास बदलतात लय
सुरात सूर मिळवतो मारवा...
ही गुलाबी हवा
हूर हूर लावते जीवा...

तुझ्याच चाहुली हवेत
सारे शब्द नशेत....
सुरात मुक्त सुरमय पावा
ही गुलाबी हवा
हूर हूर लावते जीवा....
-योगेश.

-


6 NOV 2018 AT 23:04

ही गुलाबी हवा
अंगावरी उठवी एक शहारा,
बेधुंद करी त्या क्षणाला जणू
वाटे हवासा ऊब घेण्या निखारा.

गुलाबी हवेच्या जादूने
गुलाबी प्रेम बहरते,
तुझ्या माझ्या भेटीने
अजुनी ते मोहरते.

हवीहवीशी वाटे मज
थंडीची ही गुलाबी हवा,
तुझ्या मिठीची ऊब
भरी त्यात आणखी गोडवा.

-


6 NOV 2018 AT 22:14

श्वासात ही साठवा
निसर्गाचा रंग हिरवा
हा गंध मातीचा कधी न सरावा
रुणी ह्या मातीचे व्हा
अमुल्य हा असा ठेवा

-


28 OCT 2024 AT 7:58

ही गुलाबी हवा
बेभान करी वेड्या जीवा
पहाटेचा मंद मंद गारवा
फुलवते ह्दयीचा गोडवा

ही गुलाबी हवा
डोळ्यांत आठवांचा थवा
जिवलगाच्या आर्त विरहात
देते विश्वासाचा सार्थ पुरावा.

-


6 NOV 2018 AT 21:49

ही गुलाबी हवा

गार गार गारवा
मनास देई धिरावा
न सहवी हा दुरावा
गोड भेटीचा गोडवा
लागे मनास हळवा
वेड लावी जीवा
मिळे भेटीत विसावा
तूच गं स्पंदनाचा ठावा


-


28 OCT 2024 AT 6:50

ही गुलाबी हवा, तुझ्या आठवणीची छटा,
मनाच्या गाभाऱ्यात दरवळते सदा।
निळ्या आकाशात एक रंग भरते,
तुझ्या स्पर्शाची गोड साद घेऊन येते।

-


11 NOV 2018 AT 19:57

हिरवा ऋतू अन
ही गुलाबी हवा

सोबतीस तू हवा
चल फुलवू क्षण नवा

-


7 NOV 2018 AT 13:45

तुझ्या भेटीची चाहुल लागल्यासारखी खुणावतेय मला आणि म्हणतेय की आता प्रतिक्षा संपली , विरली ती विरहाची कहाणी तळमळ ती जीवघेणी पूरानी , आता सुरू झाली आहे गुलाबी थंडी ही प्रेमाची .....

-


6 NOV 2018 AT 22:50

ही बेधुंद गुलाबी हवा छळते मला,
गाऊनी प्रेमगीत समोर घेऊन येते तुला;
तुझ्या डोळ्यात हरवते मी पुन्हा,
मिठीत घेऊन गायब होतोस तू पुन्हा!
स्पर्ष करुनी तुझ्या भेटी,
तो आनंद त्या आठवणी;
वाटे वर बघतिये तुझी वाट,
लवकरच भेटू फक्त ही एक आस!

-