आयुष्य ही एक कथा आहे
आयुष्य ही एक व्यथा आहे
रोजच नवा अध्याय आहे
रोजचा नवा स्वाध्याय आहे
आयुष्य ही एक गाथा आहे
आयुष्य ही एक व्यवस्था आहे
रोजचा संघर्ष धडा आहे
रोजच जगणं ही जणू कडा आहे-
भिम भिमराव एक🕵🏼
भिम भिमराव एक
झाले असतील समाजात पुढारी अनेक
पण भिम भिमराव एक
होता भिम दलिताचा लेक
रोवली समाजात न्यायाची मेख
भिम भिमराव एक
शिकुन बैयरिस्टर झाला भिम प्रेमाने बाबासाहेब म्हणत लोक
पण दाखवली नाही कधी टेक
भिम भिमराव एक
राज्यघटनेची आधारशिला ठेवून केलं नावलौकिक
शिका ,संघटित व्हा,संघर्ष करा दिली समाजाला शिक
म्हणून भिम भिमराव माझा एक
अन्याय ,अत्याराचाला दावला लेखनीचा धाक
दीन दलिंताचा कैवारी घटनेचा शिल्पकार असे भिमाचे उपकार कैक
म्हणून भिम भिमराव एक
अन्याय ,अत्याचाराची भिंत तोडली या महामानवाचे गुणगान गावे लाख लाख्
अहो म्हणा भिम भिमराव एक
🌞-
लाचारी नको,
विचारी बना
अहंकरी नको,
सहकारी बना
अभिमानी नको,
स्वाभिमानी बना
स्वार्थी नको,
निःस्वार्थी बना
नायक नको,
लायक बना
हुशार नको,
समजदार बना
स्वभावी नको,
प्रभावी बना
मजेदार नको,
चवदार बना
मालदार नको,
मदतगार बना
स्वाभाविक नको,
प्रासंगिक बना
राजकीय नको,
सामाजिक बना
धैर्यशील नको,
कृतिशील बना
उपकारी नको,
परोपकारी बना
विकृत नको ,
सुसंस्कृत बना
अन्यायी नको,
न्यायी बना
अकर्तव्यनिष्ठ नको
कर्तव्यनिष्ठ बना
-
ज्ञान का उजाला जब होता है
असत्य की ओर से सत्य की ओर
अन्याय की ओर से न्याय की ओर
छल,कपट की ओर से निश्चल की ओर
अहंकार,घमंड की ओर से मार्दव की ओर
अत्याचार की ओर से दया या करुणा की ओर
बिभातासा की ओर से चारुता ओर
वासना की ओर से शीतलता की ओर
स्वार्थ की ओर से निस्वार्थ सेवा की ओर
ये भाव मन में तब आते है
ज्ञान का उजाला जब होता है-
माझी पहिली कविता नवखी होती
प्रेमात पडली स्वप्नात रमली
शब्दांची दामछाक होती
थोडी हळवी होती ,अल्लड ही होती
नकळत शब्दांची बांधणी होती
सुरेख सरल भावाची होती
अगदी तारुण्याची पहिल्या डावातली होती
सुखावली विसावली होती...
-
फ़रेब से दिल लगा बैठे थे
ख़्वाब भी खूब संजोए थे
जब पता लगा असलियत का
तब ज़ख्मों का घाव गहरा था-
झाली पूरे आता पानगळ
आगमन वसंताचे होईल थोडा पळ
गळून पडली जीर्ण पिवळी पाने
फुटेल पालवी नव्या नवलाईने
एक नवी आशा नवी स्फुर्ती घेवूनी
धुवून सारी मनाची मरगळ साज नवा लावुनी
पालवी फुटावी अशी मनातही
शल्य,दुःख,क्लेश,राग,अहंकार,द्वेष,मत्सर,गर्व व्हावे जीर्ण हेही
नवा उत्साह नवाच साज शृंगार उन्मेद नवी
नवा आनंद नवे स्वप्ने पालवी मनाला फुटावी...-
बे इंतहा इस मोहब्बत में कैसे ढूंढें वो रात की अंधेरी को परछाई को...?
-
नको अटी, बंधने आणिक काहीं शर्थी
हा विश्वास भरवसा आहे ज्या अर्थी
कायम असू दे मनात प्रेमाची पुर्ती
भावनेचा ओलावा देत रहा आपसूक स्फूर्ती
तुला वाचताना भाव मनाचे मलाच विसरती
धुंद होई मन काहीसं रंगून तुझ्यात रमती
एकेक किस्सा तुझ्याशी जणू मजेदार गमती
तू असावीस अशी सदा माझी सह सोबती
वेड लागले मना भुरळ तुझी अदा घालती
तुला वाचताना शब्द ही अपुरे पडती......-