QUOTES ON #शिवबा

#शिवबा quotes

Trending | Latest
18 JUL 2019 AT 8:14

रात्रीचा प्रहर अन
नीरव शांतता चोहिकडे
अंधारातुनी तो
तेज पुरुष लखलखला..

हातात समशेर
अन मुठभर मावळे
केले आक्रमण त्या
गनिमांवर...

तुटून पडले जशे
ना भिती न कसलीही चिंता
फक्त एकच विचार मनी
देह अर्पण या स्वराज्यासाठी..

किती कठोर असतील ते
अन किती पराक्रमी
फक्त मुठभर मावळ्यांनी
हलविले दिल्लीचे तख्तही..

-


11 JUL 2021 AT 18:09

एक व्यक्ति म्हणाले: तू आहेस पप्पा ची फुलां सारखी नाजूक परी तर तू हे काम कसं काय करशील?
मला माझ्या पप्पा आणी शिवबाने शिकवले आहेस" बाळा तू एक निर्भय वाघीण सारखे जगशील"

-


6 JUN 2019 AT 7:59

आज माझ्या देवाचा राज्याभिषेक सोहळा
आजही नाव घेतल की सळसळतं हे रक्त

देव असा एकच जो
माणसांच्या रुपात येऊनही आहे अमर...

कठोर शिस्त आणि प्रखर अशी वाणी
मुखात जणू होती आई भवानी...

मुठभर सवंगडी अन पाठीशी आईसाहेब होत्या
म्हणून तर शत्रु थरथर कापे बघुन शिवबा ला माझ्या...

राजनितीचे जनक प्रजेचे रक्षक
ना जिवाची भिती ना मनी कोणताही लोभ...

रायरेश्वरात घडले स्वराज्य
होते मावळे काही सोबत...

राजे तुम्ही नसता तर आजही गुलाम असतो
तुमचा आदर्श ठेवून तर जगतो ताठ मान करुन..

-


17 JUN 2019 AT 19:06

345 वर्षानंंतर पुजा आजही होते,
आजही तेच संस्कार करण्या,
तुमचे गोडवे ही जनता आज ही गाते,
आदर्श तुमचा आहे तोच मां साहेब,
आजही स्वराज्य तुमच्या सारखी आई मागते..
त्या काळी तलवार घेतली हाती,
आजपण कोणी ती हिम्मत नाही केली,
कठिण प्रसंग खुप होते तेव्हा,
आयालेकींची अब्रू ही शून्य होती..
जनावरं सारखी होती गुलामी तेव्हा,
भिती वाटायची लोकांना,
निर्धार होता तुमचा गुलामी नष्ट करण्याचा,
अवतरला तो देव या भू वरी तुमच्या पोटी...
शिकविले,वाढविले तया केले मोठे हिंमती,
स्वराज्याचे बालकडू पाजले तयांना,
राजनितीचे धडे ही दिले सोबती...
अलौकिक महती माते तुमची
आजही पाहुन तुम्हा मां साहेब
सर्व जनता मुजरा घालते....🐅

-



शिवबा तुझा मावळा फक्त आता
झेंडे फडकवण्यापुरता उरलाय
थंड पडलंय सळसळतं रक्त कधीच
राजद्रोह आता नसानसांत भिनलाय

नको घेऊस पुन्हा जन्म इथं
तुझा उगाच होईल हिरमोड
भ्रष्ट माणसांचा सुळसुळाट पाहून
तुझं अंतःकरण होईल जड

-



काय सांगू मी माझ्या
शिवबाची नीती कशी होती
कधी शत्रूनां ही शंका
नाही पडली
असी आमच्या
महाराजांची कीर्ती होती
कधी चुकून ही चुक
घडत नव्हती
प्रत्येकाचा मनात
एक आदर निर्माण करणारी
माझ्या शिवबा ची भीती होती

-


3 APR 2021 AT 22:14

"तुझी कीर्ती रे आम्ही कशी विसरावी
तुझ्या शिकवनींने आम्हां दिशा नवी दिसावी..

तुजला नमन करतो रे हे 'शिवबा'
तुझ्या नावानं रे आम्हांस ऊर्जा मिळावी"

-


24 MAY 2020 AT 17:13

ह्या मातीला सुगंध येई
शिवबाच्या पराक्रमाचा
अजुनि कडाडतो आहे
आवाज त्या तोफांचा...

-


12 JAN 2021 AT 11:02

सौंदर्यवती... होती... जिजाऊ
कणखर तिचा बाणा होता
शिवबाला सुसंस्कारीत केले
रयतेचा जाणता राजा होता
सह्याद्रीच्या कडेकपारी घुमतो
शिवबाचा पोवाडा शौर्याचा
हिंदवी स्वराज्य स्थापन केले
जिजाऊचा बाळ तो धैर्याचा....

-


8 JUN 2021 AT 12:23

राजे आमचे...

होते शिव छत्रपती
सारं जग त्यांचे नाव घेती

धन्य झाली ती जिजाऊ
शिवबास जन्म देऊनी
नव्हते ध्यानी-मनी इतके
पराक्रम गाजविल बालपणी

केले स्थापन आर मार
तलवारीस त्यांच्या विजेची धार

शुर, विर, धाडसी व पराक्रमी
राजे आम्हा लाभले
त्यांनी तर शाहीस्ते खानाचे
बोटे ही कापले

शिवकाली सर्व सुखी होती प्रजा
कारण जागी होता जनतेचा राजा

शिवप्रेमी बसतात हो रडत
मीच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्र
म्हणतो राजे
तुम्ही या परत
तुम्ही या परत...

-