आभाळापरी मायेचा पाऊस बरसतो
झरा प्रेमाचा ममतेचा चरणाशी पाझरतो
त्याच्या येण्याच्या ओढीनं
श्रावण मास सरतो.......
एका वर्षान थाटा माटान
माझ्या गणाचा दरबार भरतो.... || धृ ||
देहभान सारे हरपून जाई
डोळ्यात भरुनी पाहताना
काय वर्णावा सुखसोहळा
आनंद अश्रू वाहताना
कंठ दाटतो मेघापरी
गुणगान गणाचे गाताना
पडतो विसर या जगताचा
भक्तीत तल्लीन होताना
त्याच्या पद स्पर्शाने घरात भक्तीगंध पसरतो.... ||१||
एकच नाद निनादून जाई
मोरया मोरया जयघोष
सूर सुरांशी तालात बोलती
आला अमुचा स्वराधीश
बाल मुखातही गंपती बाप्पा
बोबड्या बोलाने जल्लोष
मनभावन ही सुंदर मूर्ती
वेड लावी गणाधीश
सारं संपूनी गेल्यावरही माझा गणेश उरतो......|| २ ||-
जा जरा जपूनी राधे मथुरे बाजारी
वाटेत आडवा येईल सावळा मुरारी || धृ ||
रानमाळावरी तो गुरे राखितो
जमवुनी सवंगडी तो खेळ मांडीतो
साडी रंगवील मारुनी पिचकारी || १||
किती समजावूनी सांगू ह्या हरीला
दह्याने भरलेला त्याने माठ फोडीला
वेड लावील गं त्याची बासरी || २ ||
जरी खट्याळ कान्हा घालितो धिंगाणा
त्याच्यावीण बाई गोकुळात जरा करमेना
राधे भाळू नको असा हा श्रीहरी ||३||-
'इथे गायन शिकवलं जाईल'
'इथे संगीत वाद्ये शिकवली जातील'
असे फलक जागोजागी बघायला मिळतील
पण,
'इथे गाण्याची चाल लावायला शिकवलं जाईल'
असा फलक मिळाला तर सांगा...-
काय सांगू मी तुला काळजाच्या यातना
जीव व्याकुळ झाला तुला आठवताना
तुझ्याविना प्रिये मला राहावेना
परत ये ना प्रिये परत ये ना ... || धृ ||
तुझ्या संगतीत घालवलेला एक एक क्षण आठवतो
तुझी वाट बघुनी वेडे सूर्य असा हा मावळतो
अजुनी तशाच ओल्या आपुल्या प्रेमाच्या खुणा
सागराचा तो किनारा खुणवितो पुन्हा पुन्हा
परत ये ना प्रिये परत ये ना ||१||
बंधन जोडून आयुष्याचे दूर अशी का झालीस तू
जीव जसा शरीरातून जावा तशीच निघून गेलीस तू
दुरावा हा कशाला काय केला मी गुन्हा
तुझ्याविना गं वेडे झालो मी सुना सुना
परत ये ना प्रिये परत ये ना || २||
-
गुरु तुमच्यातला वेगळेपणा ओळखून त्याला अजून आकार देण्याचा प्रयत्न करत असतो...
-
हाच तो सण वेगळ्याप्रकारे अनुभवला होता,
खिशात वडापाव खायला पैसे नव्हते,
अन आजूबाजूला पुरणपोळीचा घमघमाट सुटला होता...-
गीतकार आपल्या भावना शब्दांत मांडून मोकळा होतो...
शब्दांना चाल लावताना संगीतकार त्या भावना जगून घेतो....
त्यात असलेली कमी भरण्यासाठी गायक अजून जीव ओततो...
पुन्हा त्या गाण्यात रंग भरताना संगीतकाराच्या भावनांना मात्र महापूर येतो...-
तू भेटलीस ज्या वळणावर
आज तिथे तू भेटून जा
गीत तराणे प्रेमाचे अपुल्या
आज जरा तू गाऊन जा...
तू किनारा तू सहारा
आज जरा तू भेटून जा
तुझ्याविना मन लागे कुठे ना
आज जरा तू बिलगून जा... || ध्रु ||
फुलपाखरू हे माझ्या मनाचे
तुझ्या भोवताली फिरे
विश्व जणू तू माझं बनुनी
तुझ्यात जीव रमे
तू श्वास ध्यास आभास तू
अन माझ्या स्वरातील आवाज तू
तू सुरेल धून बासरीची
तार छेडली तू माझ्या हृदयाची... ||१||-
जिथे आपल्या शब्दांना किंमत नसते,
तिथे आपलं मत मांडून
आपली किंमत कमी करायची नसते...-
फुले कोमेजून जाती
ठेऊन मागे गंध
कधी उरातून कधी डोळ्यातून
दरवळतो हा सुगंध...-