QUOTES ON #बापलेक

#बापलेक quotes

Trending | Latest
20 JUN 2021 AT 11:58

बाप
लेकीच
नातंच
जगावेगळं
लेक
बापाच्या
काळजाचा
तुकडा
तर
बाप
लेकीच्या
हृदयातला
हळवा कोपरा

-


8 NOV 2019 AT 21:38


आजचा दिवसच खास होता त्याच्यासाठी,
एकाच वेळी ओठांवर हसू आणणारा आणि डोळ्यांतून पाणी आणणारा,
चिमुकली मोठी झाली म्हणून तो खुश होता,
पण ही लवकर मोठी झाली म्हणून काळजीत होता,
स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवतांना त्याचं हृदय जरा धडधडत होतं,
आज सगळे पोटभरून जेवत होते,
पण तो मात्र उपाशी होता,
सर्व पाहुण्यांची व्यवस्था करण्यातच तो व्यस्त होता,
कधी त्याच्या डोळ्यातून पाणी आले नाही,
पण आज मात्र त्याच्या सोनूलीने त्याला रडवलेच,
आज कन्यादानाने त्याने त्याच्या
लाडकीला नव्या घरी सुपूर्त केले,
दोन्ही घरांचा उद्धार करायला
त्याने तिला मुक्त केले.....

-


20 APR 2024 AT 0:35

शब्द करतात निःशब्द बाबाविषयी लिहितांना,
अश्रूंनी डोळे पाणावतात
बाबांची माया आठवताना....!
कितीही मोठी झाली तरी लेक बापाची लाडकी च असते,
बाप असतो भक्कम आधार म्हणून कधी उणीव नसते...!
मागेल ती वस्तू मुलीला हातात आणून देतो,
कारण लेक त्याची जीव की प्राण असतो....!
तिला उंच भरारी घेण्यासाठी पाठीमागे खंबीर पणे उभा असतो,
लेकीसाठी बाप म्हणजे तीच सर्वस्व असतो....!
कधी थोडा रागावला तर लेकीच्या डोळ्यातून खळखळ पाणी येते,
कारण बाप- लेकीचे नाते हे असेच असते .....!
लेकीचा सहवास थोड्या दिवसांचा असतो,
लाडक्या लेकीला बाप तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो...!!
# # बाप - लेक # #

-


2 MAY 2021 AT 1:22

असे कसे समजते बाबा,
                         तुम्हा मी शब्दांवाचून बोललेले....
                         कधी हासू तर कधी आसुही,
                         डोळ्यात माझ्या दडलेले....

-


11 DEC 2020 AT 22:24

बाप लेक-
शब्द करतात निःशब्द
बाबांन विषयी लिहिताना
डोळे अश्रूंनी पाणवतात
सासरी सोडून जाताना

चिऊ काऊच्या गोष्टी
परत कधी ऐकनार
बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी
कधी पुन्हा लहान होणारं

बाबांचा हात पकडून
हे सुंदर जग पाहिले
प्रेमाचा अथांग सागर
बाबांच्या मायेत अनुभवले

बाबांच्या मायेची छाया
लाडक्या परीलाच कळणार
हे बाप लेकीच नात
या सृष्टीत सुंदर असणार

-


20 JUN 2022 AT 1:26

सैलसर वाटणारी मिठी...
घट्ट हृदयाशी बिलगली होती.

स्पर्शाची चाहूल त्यानेही...
मिटल्या पापणीने ओळखली होती.

हुरहूर वाढवणारी भीती...
कुशीत शिरताच निवळली होती.

भेदरलेली हळवी ती चाहूल...
बापाच्या कुशीत विसावली होती.

लेक आयुष्याचं धन ज्याने गोकुळ वाटते घर...
भरून येतं मन जेव्हा तिची सासरी होते पाठवण.

लिहीताना कमी पडेल अक्षराचं पोतं...
असं "बापलेकीच" हे नातं.

-


6 MAY 2023 AT 10:05

# बापलेक ..

पारावर बसलेल्या मंडळींना साखर वाटत होता
ती जन्माला आल्याचा आनंद त्याच्या डोळ्यातून वाहत होता.
म्हणे मी राजा झालो,या जन्माच सार्थक झाल्याची जणू दवंडी गावभर पेटवित होता.
इवल्या इवल्या पावलांना आपल्या खरबड हातांचा आधार देत होता स्वतःचा खांदा झुकवून तिला मात्र जग दाखवत होता .
चिमणी बघता बघता एवढी मोठी झाली,
घरभर रांगताना उमटलेल्या खुणा पुसटश्या करत गेली
या घराचा उंबरठा आता कायमचा परका होणार, ढसाढसा रडला तो या विचाराने माझी चिमणी आता भुर्रकन उडणार.
बघता बघता शेवटी तो क्षण आला
स्वतःच्या पोटचा गोळा कोणा परक्याच्या हाती सोपवला,
म्हणे कन्यादाना इतक भाग्य कुठे नाही, कुणास ठाऊक पण का अभाळा इतक दुःख लेक त्या क्षणी फक्त बापाच्या च डोळ्यात पाही.
इवल्याश्या ओठांमधे भरवलेल्या घासापासून कण्यादाणापर्यंतचा तीचा प्रवास डोळ्यांसमोर त्याच्या तरळत होता.
आठवणीने भरलेल्या प्रत्येक थेंबातून बापाच्या पोरीचा खांदा चिंब भिजत होता.......

_ अर्पिता.

-


27 OCT 2019 AT 23:57

प्रिय बाबा,

तुमच्या सारखा 'बापमाणूस' लाभायला
देखील भाग्य लागतं..!!

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

-तुमचीच लेक

-