मराठी असे अमुची मायबोली,
तिच्यातच रुजे मनाची खोली,
मराठी जागवते आमचा मान-सन्मान,
तिच्या शब्दांनी गाजतो आमचा स्वाभिमान,
मराठी शिकवे आम्हां संस्कारांची शिदोरी,
तिचे ज्ञान दाखवे आम्हां यशाची पायरी,
मराठीस अभिजात दर्जा मिळो हीच सदिच्छा,
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....🙏🏻-
संगीत शांत झाले, स्वर स्तब्ध झाले,
सुर निरस झाले, गीत बेसूर झाले,
ताल बेताल झाला, आवाज निस्पष्ट झाला,
संगीताच्या एका युगाचा अंत झाला,
आज परमेश्वराला मंत्रमुग्ध करायला गानकोकिळा अनंतात विलीन झाली.....
भावपुर्ण श्रद्धांजली स्वरसम्राज्ञी लता दीदी....🙏🏻-
खूप काही साठवून ठेवतो तो त्याच्यात,
प्रेम, राग, दुःख, क्रोध, द्वेष, माया, मत्सर.....
कित्येकांची कितीतरी गुपिते दडवतो,
एकाकी कोपऱ्यात आठवणींचा पसारा मांडतो,
विविध वेळी विविध भावनांचा मेळ घालतो,
कठीण प्रसंगी मेंदूशी स्पर्धा करतो,
योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतो,
साऱ्या शरीराचं संतुलन राखतो,
कसं जमतं त्याला हे सारं करणं.....?
जागतिक हृदय दिन.....❣️
- प्रगती✍🏻-
स्वप्नांची धुसर वाट जरा स्पष्ट होऊ पाहते,
जबाबदारीच्या जाणिवेने लवकर गवसु लागते,
नागमोडी वाटेवर आलेत कितीही खाचखळगे,
जिद्दीने पार करू त्या वळणातील अडथळे,
अंतिम ध्येयपूर्तीसाठी मनी आहे सार्थ आत्मविश्वास,
पराभवाच्या भितीने मुळीच नाही थांबणार श्वास,
या चंचल मनी असावा एकच स्थिर ध्यास,
ध्येयप्राप्तीच्या दिशेने सुखकर व्हावा हा प्रवास,
सतत पुढे चालण्यासाठी करूया पाठीचा कणा ताठ,
कारण आता मनी साद घालते स्वप्नांची धुसर वाट.....
- प्रगती✍🏻
-
या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही,
प्रत्येक गोष्टीत किंवा माणसांत बदल होतच असतात,
काहीतरी वेगळेपण अथवा नावीन्य हवे असेल तर बदल हवाच,
बदलाशिवाय प्रगतीची वाट नाहीच.....
बदलत्या वेळेनुसार आपणही बदलणं गरजेचं असतं,
समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेण्याची तयारी हवी,
असेल ती परिस्तिथी स्वीकारता यायला हवी,
मग ती वाईट असो वा चांगली, आपल्या मनासारखी असो वा नसो,
ती जशी आहे तशी स्वीकारणे यातच शहाणपण.....
तसेच विचारही.....काळानुसार विचारही बदलणारच....
आधुनिक युगाशी जुळवून घ्यायचं असेल तर आपल्यालाही मॉडर्न व्हावं लागेल, पण फक्त वागण्याबोलण्यात किंवा दिसण्यात मॉडर्न होण्यापेक्षा जरा विचार पण मॉडर्न पद्धतीने करून पाहुया,
नव्या युगाची नवी method समजून घेऊया, कदाचित यामुळे जनरेशन गॅप कमी होऊन आपलं एकमेकांशी छान tuning जमेल.....
बदलत्या विचारांसोबत बदलत्या जीवनाची गोडी अनुभवूया.....
- प्रगती✍️-
You break, We build,
You disconnect, We connect,
You imagine, We create,
You draw, We design,
You write, We code,
You dream, We do,
If you have problems, then we have solutions,
We are the fusion of Imagination, Innovation, Creativity, Skills, Passion, Patience, knowledge, Ambitions,
Yes we are engineers.....
Happy Engineer's Day.....!
👷🏻♂️👷🏻♀️👨🏻🔬👩🏻🔬👨🏻🔧👩🏻🔧👨🏻🏭👩🏻🏭👨🏻💻👩🏻💻-
स्वातंत्र्यासाठी झटलेल्या थोर विचारवंत पुढाऱ्यांचा,
वर्षानुवर्षे जपलेल्या पुरोगामी रूढी-परंपरांचा,
जिजाऊ-मुक्ताईच्या प्रेमळ आणि आदर्श संस्कारांचा,
शिवरायांच्या पराक्रमाचा व शंभूराजांच्या शौर्याचा,
सत्य,अहिंसा,दया,क्षमा,शीलता,न्यायाच्या मार्गाचा,
माणुसकीने आणि बंधुभावाने जपलेल्या सौजन्याचा,
ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंग-ओवीने पावन झालेला,
मनमोहक निसर्गदेवतेच्या सौंदर्याने नटलेला,
जिथे नांदतात विविध भाषा-धर्म-जाती-वेष,
असा सर्वगुणसंपन्न व समृद्ध माझा भारत देश.....
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या निरोगी
हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳-
आठवणींचे मोरपंख मनाला अलगद स्पर्शून जाते,
अंतरंगातल्या हिंदोळ्यावर हलकेच झुलवून जाते,
कधी सुंदर रंगीबेरंगी रंगात न्हावून नेते,
तर कधी चुरगळलेल्या पिसांनी झडून जाते,
कधी गोड मायेची ऊब देऊन जाते,
तर कधी सहवासाचा गारवा देऊन जाते,
कधी हसता हसता डोळ्यांतून पाणी काढते,
तर कधी रडता रडता गालावर हसू आणते,
कधी विस्मरणातले क्षण स्मृतीत परतवते,
तर कधी स्मरणातले क्षण विस्मृतीत घालवते,
नटवुन येते सुंदर मनमोहक विविध रंग,
असे हे आठवणींचे नाजूक मोरपंख.....-
येऊ दे कितीही संकटे तुझ्या जीवनात,
तू घाबरू नकोस.....खंबीर रहा,
येऊ दे कितीही अडथळे तुझ्या मार्गात,
तू थांबू नकोस.....पुढे चालत रहा.....
येऊ दे कितीही आव्हाने या ध्येयप्राप्तीत,
तू खचू नकोस.....जिद्दीने प्रयत्न करत रहा,
तू तयार हो पुन्हा नव्याने नवे रंग घेऊन,नवे तंत्र शिकून,
नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने,
दोन पावले मागे येऊन पुन्हा एकदा आकाशात उंच झेप घ्यायला,
तुझ्या पंखात बळ असुदे रम्य गगनभरारीसाठी,
डोळ्यांत उमेद असुदे नवचैतन्यासाठी,
हातात शक्ती असुदे सदैव साथ देण्यासाठी,
पायात ताकद असुदे दीर्घ भ्रमंतीसाठी,
तु फक्त हार मानु नकोस पुन्हा जिंकण्यासाठी,
तू तुझी ऊर्जा तशीच राखून ठेव.....
कारण आता वेळ आहे नाविन्याच्या तयारीची.....-
To remember those who have taken efforts for us,
To accept the situation whatever it is,
Never loosing hopes in bad time,
Making best things from the worst,
Becoming more better person than yesterday,
Believing in yourself and your efforts,
Waiting for the right time and be prepare for it,
Having patience and faith in yourself,
Converting negativity into positive vibes,
Forgetting about the past and starting where you stand,
Always looking forward towards your dream.....
-