मत समझो
कोई बात नहीं
पर कुछ गलत मत समझो
क्योंकि गलतियां सुधारी जा सकती हैं
पर गलतफैमिया नहीं।।।-
ये जिंदगी एक ही बार मिलती हैं।
कुछ हो रहा हैं बुरा जिंदगी मैं
तो जरूर कुछ अच्छा भी होगा ये तय हैं।
जिंदगी खुल के जियो।
-
बात करने से पेहले,
दिल दुखाने से पेहले,
भरोसा तोडने से पेहले,
क्योंकि शब्द वापस लिए नहीं जाते,
दिल को लगी चोट सही कर नहीं सकते,
और भरोसा जोड़ नहीं सकते।-
सब्र का फल मीठा होता हैं
Success ....
कुछ लोगो को जल्दी मिलता हैं
कुछ लोगो को देर से
पर मिलता जरूर हैं
Be positive.....
-
होत खास खूप काही.....
पण ते तुझ्यासाठी नव्हतच कधी
माझ्यासाठीच होत ते सर्व काही.....-
......आजोबा.....
सात वर्ष झालेत बाबा तुम्हाला जाऊन,
सात वर्ष झालेत बाबा तुम्हाला पाहून,
या सात वर्षात खूप काही बदललंय,
मी माझ्या बाबांना दुर जाताना बघितलंय...!
माझे बाबा म्हणजे अगदी नारळासारखे
बाहेरून टणक आतून गोड..
तुमच्यामुळेच लाभली मला
माणुसकी आणि नात्यांची ओढ..
व्यक्त न करता हृदयात प्रेमाची खान ,
आणि नातवंड म्हणजे त्यांचा जीव की प्राण,
बोबड्या शब्दांनी बोलायला शिकवले
जेव्हा नव्हते मला दंत..
बाबा आज नाही हो तुमचा हात माझ्या
डोक्यावर याची वाटते मला खंत..
आजही खूप आठवण येते तुमची
तुम्हाला येते का हो आठवण आमची..!
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे,
पण तुम्ही नसल्याची उणीव आहे...!
😭Miss you baba 😭
-
शब्द करतात निःशब्द बाबाविषयी लिहितांना,
अश्रूंनी डोळे पाणावतात
बाबांची माया आठवताना....!
कितीही मोठी झाली तरी लेक बापाची लाडकी च असते,
बाप असतो भक्कम आधार म्हणून कधी उणीव नसते...!
मागेल ती वस्तू मुलीला हातात आणून देतो,
कारण लेक त्याची जीव की प्राण असतो....!
तिला उंच भरारी घेण्यासाठी पाठीमागे खंबीर पणे उभा असतो,
लेकीसाठी बाप म्हणजे तीच सर्वस्व असतो....!
कधी थोडा रागावला तर लेकीच्या डोळ्यातून खळखळ पाणी येते,
कारण बाप- लेकीचे नाते हे असेच असते .....!
लेकीचा सहवास थोड्या दिवसांचा असतो,
लाडक्या लेकीला बाप तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो...!!
# # बाप - लेक # #
-
!!!..................बाप.................!!!
आईसाठी खूप लिहल जात,
पण बाबांसाठी व्यक्त होण फार कठीण असतं.....!
सगळे म्हणता आईची वेडी माया,
पण बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया.....!
कुटुंबाच्या सुखासाठी तो राबतो दिनरात,
देह झिजे त्याचा जळती जसे दिव्याची वात...!
भविष्य घडवण्यासाठी मुलांचे तो झटत असतो,
आता थकलो मी असं कधी म्हणत नसतो....!
चुकले काही मुलांचे तर बापाच्या भूमिकेत येऊन रागावतो,
आणि वेळोवेळी चुका पदरात घेऊन समजावूनही तोच सांगतो.....!
!......बाप हा बापच असतो.....!
-