Sejal Bagve   (Sejal bagve)
15 Followers · 9 Following

Joined 13 October 2020


Joined 13 October 2020
11 OCT AT 13:03

The greatest gift of life is your own heart.Your ability to love, to feel deeply, and to see beauty even in the smallest moments. Every laugh you share, every kindness you give, every dream you chase.It all makes your life a precious, one-of-a-kind gift.

-


19 DEC 2021 AT 17:53


विचार करताना त्या स्वप्नाचा,
पूर्ण करायचे ते राहून गेले,.
विचारच करतं बसले मी,.
ते क्षण हातातून निसटून गेले...

-


19 DEC 2021 AT 17:48

वेळ...


कधी येते कधी जाते,
कधीकधी खूप काही शिकवते...
कधी चटके परिस्थितीचे,
कधी देते अनुभव ते राजयोगाचे....

-


7 DEC 2021 AT 23:42

वासना ती रे तुझी...

वासना ती रे तुझी पण,
      जीव मात्र माझा जाई...
      कितीदा ओरडून सांगू तुला,
      मी तुझी रे आई अन ताई...

-


30 NOV 2021 AT 13:50

बोबड्या बोबड्या बोलाची,
मला जिजा व्हायचंय...
छुमछुम पैंजनाच्या चालीची,
मला जिजा व्हायचंय...

परकर पोलक्यातली साजिरी,
मला जिजा व्हायचंय...
सह्याद्रीची रणरागिणी ,
मला जिजा व्हायचंय...

तलवारीची सखी ती,
मला जिजा व्हायचंय...
स्वराज्याची लक्ष्मी ती,
मला जिजा व्हायचय...

सूर्यासम तेजस ती,
मला जिजा व्हायचंय...
फुलासम ओजस ती,
मला जिजा व्हायचंय...

कधी आई कधी ताई,
मला जिजा व्हायचंय...
पत्नी सखी महाराणी ती,
मला जिजा व्हायचंय...

कधी अश्रू कधी हास्य ती,
मला जिजा व्हायचंय...
स्वराज्याच स्वप्न ती,
मला जिजा व्हायचंय...

शिवशंभु घडवण्या गं,
मला जिजा व्हायचंय...
पुन्हा स्वराज्य निर्मिण्या गं,
मला जिजा व्हायचंय...

दे ग आशीर्वाद आईभवानी,
मला जिजा व्हायचंय...
महाराष्ट्राची तू कुलस्वामिनी,
मला जिजा व्हायचंय...
         - सेजल बागवे "जल 😘"

-


23 NOV 2021 AT 11:14

जीव तुटतो रे देवा जेव्हा,
स्वप्नांची धूळमाती होते...
अपेक्षांची गर्दी मात्र सारे,
बघण्यासाठी थांबते...
                     

-


23 NOV 2021 AT 1:09

               आकाशीची ती चांदणी,
               आज मातीत मिसळली...
               कोणाचेतरी स्वप्न पूर्ण करण्या,
               ती धुळमाती होऊन गेली...

-


19 NOV 2021 AT 21:13

कोण म्हणतं तो रडत नसतो...

कोण म्हणतं तो रडत नसतो,.
एकटाच मनात कुढत असतो...
स्वप्ना स्वतःच्या देऊन अग्नी,
कर्तव्याच्या फेऱ्यात फिरत असतो...

कोण म्हणतं तो रडत नसतो,
अश्रू लपवून फिरत असतो...
मनास करून खंबीर पुरुष,
हसू चेहऱ्यावर ठेवत असतो...

कोण म्हणतं तो रडत नसतो,
खरंतर तोही घाबरत असतो...
झळ न लागो संकटाची कुटुंबा म्हणुनी,
संकटा परतवून लावत असतो...

कोण म्हणतं तो रडत नसतो,
तोही कधीकधी तुटतं असतो...
पाहता सरनावरी आईबापा,.
तोही तुटून पडत असतो...

कोण म्हणतं तो रडत नसतो,
तोही आतून कुढत असतो...
फरक फक्त इतकाच असतो,
तो रडताना दिसतं नसतो...
             - सेजल बागवे "जल 😘"

-


15 NOV 2021 AT 17:39

आज पुन्हा ते काव्य वाचले,
सारे काही पुन्हा आठवले....
शब्दरूपात आलेल्या आसवानी,
पुन्हा माझे मनं दाटवले...

-


15 NOV 2021 AT 8:35

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
पहिल्या भेटीचे क्षण आठवले...
पहिल्या भेटीचे क्षण रे मला,
पुन्हा तुझपाशी  घेऊन गेले...

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
मैत्रीचे हात पुन्हा दिसलें...
सुंदर त्या आठवणीने सख्या,.
मुखी माझ्या हसू उमटले...

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
तुझे लोभस रूपं दिसलें....
तुझ्या त्या रूपावरी सख्या,
पुन्हा मी रे भाळून गेले...

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
वाचता वाचता स्वतःशीच हसले...
चेहऱ्यावरील हास्याने मला,
अलगद तुझीच करून टाकले...

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
हातातील गुलाब मला आठवले...
आठवणीतल्या त्या गुलाबाने सख्या,
गाल लालेलाल करून टाकले...

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
हलकेच डोळ्यात पाणी दाटले...
तु माझा नाहीस कळताच,
नकळत तूझ्यापासून दूर मज नेले...

आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
एकटेपणाचे क्षण आठवले...
आठवणीत जगताना सख्या तुझ्या,
मीही लेखणीत मनं गुंतवले...


आज पुन्हा मी ते काव्य वाचले,
तुझ्यामाझ्या त्या प्रीतीचे...
मनात असूनही न मिळालेल्या,
तुझ्यामाझ्या अपूर्ण साथीचे...

             - सेजल बागवे "जल 😘"

-


Fetching Sejal Bagve Quotes