||पत्र||
'श्री' निघाले परतीचा प्रवासा ला
मूषक राज सोबतीला
मोदक लाडू पाठवतो सोबत न्याहारीला
कृपा असू द्यावी प्रेम असू द्यावे थोडे मला
निरोप द्यावा आई भवानी ला
यावे आपणही नवरात्री ला
पाठवावे गणराया पुढल्या वर्षी भेटीला।
गणपती बाप्पा मोरया-
निरोप
जगी यातना भोगल्या कितीही...
सोडली साथ नियतीने जरी ..
सुखात दु:खात होतो सोबती..
का घेतला निरोप सोडून गेले एकटी...
-
हातावर आता मेंदी रंगली
नि मनात सारी स्वप्न सजली
नव्या नवरीचा शोभतो चुडा हाती
सगळे दुरावणार आता सोबती
माया हदयात पाझरली
आसवे दोन डोळयांत तरळली
दोन मनांच्या संगमाचा
क्षण आज आला भाग्याचा
हिरव्या शालूने काया नटली
सौभाग्याकुंकू कपाळी लाविली
वाटा शोधायच्या आता नव्या
गाते माय ओल्या मनाने ओव्या
लाली लाजेची गाली चढली
फुले सारी उमलू लागली
मायपित्याचा हात फिरला डोईवर
पर पाउल पुढे पडेना भुईवर
निरोप देताना वेढले तिच्या सयांनी
मग गाल भिजले आसवांनि
पालखी आता पुढे पुढे चालली
बालपणीची खेळणी आता मागे उरली-
आठवणीतल्या एका कप्प्याला, आशीर्वाद, सुख, समाधान, ज्ञान देणाऱ्या बप्पाला....
-
थांबवण्याचा घाट त्याने,
पुर्ण पणे आज घातला होता.
तिच्या पाठमोऱ्या आकृतीपुढे,
याच्या हाताचा पिसारा फुलला होता.
लागाबंधा नसलेलं मन तिचं,
डोळे मिटून तिने आवरलं होतं.
डोळ्यांत साठवलेलं अनामीक दुःख,
क्षणात गालावरती कोसळलं होतं.
शेवटच्या भेटीचा सांगावा घेऊनि,
वळण मनाचंच भरकटलं होतं.
अर्धमेल्या होऊन राहिल्या अपेक्षांनी,
घुसमटण्या आतुर केलं होतं.-
एक आर्त किंकाळी बोलू पाहत आहे
तुझे गहिवर मोती पुसू पाहत आहे
असा खिन्न आवंढा का वाहत आहे
निरोप तुझा असा का दाहक आहे
पोळलेली स्वप्नं तुलाच मागत आहे
होरपळत कर्तव्यात तू नाहत आहे
असूनही नसणारी कसली ही चाहत आहे
समजूनही छळणारी सल तू नाहक आहे
घुटमळत श्वास माझा परका वागत आहे
मेंदीच सौभाग्य तुझं देवाशी मागत आहे
अखेर निरोप तुझं देता मन हे सांगत आहे
स्मरणात राहशील बोलत काळीज हे फाटत आहे
हिरमुसलेली कळी सोडून गधं वळत आहे
गंध एकला तिच्या विना तिच्या साठी जगत आहे-
निरोप बाप्पाला देणं
नेहमीच दुःख देतं
पण तो सदैव जवळच आहे
त्याचा चेहरा पाहून मन आनंदी होतं-
जाताजाता निरोप देण्याचं सुखही माझं हिरावलंस
आकंठ वेदनांन्ना आभाळात का नी कसं विसावलंस??-