आज पूरे चन्द्रमा की रात है।
शरद् ऋतु की शुरुआत है।
आज शबनम की बूदों में भी।
देखो अमृतमयी बरसात है
रजतरश्मियां शीतलता बिखेर रही।
टेसू और झिझिया की परिणय की बेला में
सबके होठों में आज खुशियों की बात है।
मुबारक हो सबको आज शरद पूर्णिमा की रात है
-
निळ्या नभी सोनेरी कळा चंद्राची,
तेजोमय रात्र भरल्या पौर्णिमेची ।
फुल पुष्प दारी प्रतीक्षा लक्ष्मीची,
सजल्या बतकम्मा शोभा कोजागीरीची ।
-
हसतोय चंद्र लख्ख प्रकाशात
मिठीत घेऊन शीतल छाया...
बनुनी चंद्राची शुभ्र चांदणे
मनातील प्रतिबिंबाला साद घालूया...!!-
मनमोहक पुर्ण रुप तुझे पहातच रहावे असे
कोजागिरी चा चंद्र तर जिवा लावी पिसे...
शांत शितल प्रकाश तुझा अंगावर ल्यावा
केशरी सुगंधित दुधाचा प्याला असावा
ओंजळीत ही प्रियेचा मुखचंद्र असावा
पाहू कोणता चंद्र,गुंता कसा सोडवावा ...
-
जितकी शीतलता प्रदान केली जाते
तितकंच प्रतिबिंब देखील स्पष्ट उतरते
म्हणूनच काही नाती ही दुर्लक्षित असली तरी
खास असतात कारण ती स्थिर असतात...
उगाच ढवळा ढवळ नसते त्यात
तेंव्हा तर कुठे स्वच्छ प्रतिमा मिळते
जी नेहमीच तुम्हाला चैतन्य प्रदान करते
अन् कायम सोबती बनून बळ पुरवत राहते...
-
उगवला नभी शरद पौर्णिमेचा चंद्र
जागरात फुलवू भक्तीरसाचा मळा
आस्वाद घेऊ केशर आटीव दुधाचा
जागवू कोजागिरीचा रम्य सोहळा-
शास्त्राने ज्या चार रात्रींचं जागरण करायला सांगितलंय त्या पैकी एक शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा.
अशी मान्यता आहे की आजची रात्र श्री लक्ष्मी "कोण जागं आहे..?" असं विचारत भ्रमण करत असते आणि ज्याच्या कडून "मी जागा आहे" हे उत्तर येतं त्याच्यावर आपला वरदहस्त ठेवते. पण जागं असणं ते कसं, फक्त शरीराने,डिजेच्या तालावर बिभित्स नाच करत,पत्ते पिसत जागं असणं अपेक्षित नाही. तर विवेकाने,स्मरणातून "जागृत" असणं अपेक्षित आहे...
लक्ष्मीचा निवास हा श्री विष्णूच्या चरण कमलाजवळ आहे आणि जो श्री विष्णू चरणांचं स्मरण करत जागृत राहील मग भलेही तो देह निद्राधिन असेल तरी त्यावर श्री लक्ष्मी कृपा केल्याशिवाय राहणार नाही...
सर्व सन्मित्र-मैत्रिणींना श्री कोजागिरी पौर्णिमेच्या स्नेहगंधीत शुभेच्छा...😊🙏💐-
कोजागिरीचा चंद्र
पाहायचा होता दुधात...
निर्दयी काळ आला
नि गाई वासारच
वाहून नेली पुरात....-
शब्दचांदण्या सोबतीला घेऊन
शोधताना मी भाकरीचा चंद्र
दिसलीस शरदाच्या चांदण्यात
घरीच माझ्या कोजागिरीचा चंद्र-
शरद पोर्णिमीची रात्र ही
चंद्र धुंद,चांदण्या टिपूर
आसमंत उजळून आला
प्रकाश मंद,सौंदर्य निपूर
कुंद गारव्याच्या झुळकीत
रात्र कोजागरीची सजली
न्हाऊन शीतल प्रकाशात
अवनी ही दवात भिजली
खमंग केशर मिश्रीत दुधाचा
परिमळ सर्वत्र दरवळला
जमुनी सर्व सखे,सवंगडी
आस्वाद घेण्यास रमला
माणिकेथारी पौर्णिमेला
आभार पोशिंदाचे मानू
सुख,समृद्धी लाभो त्यान्हा
ईश्वर चरणी अशिष मागू-