आनंद ढमाले देशमुख   (आनंद)
255 Followers · 201 Following

read more
Joined 20 May 2019


read more
Joined 20 May 2019

त्याने कुणालाच रिक्तहस्ते पाठवलेलं नाही.प्रत्तेकाच्या ओंजळीत त्याने काही ना काही आनंदक्षण दिलेलेच असतात.
येरव्ही अंगभर काटे वागवणारा आणि त्यामुळे उपेक्षेचा विषय ठरलेला निवडूंग जेव्हा लालसर फुलांनी बहरून येतो ना तेंव्हा त्याचं सौंदर्य पहात रहावंस वाटतं.

त्यावेळी तो कसा दिसतो माहितीये का, तर अतिशय खोडकर, व्रात्य मुलगा ज्याने सर्वांनाच जेरीस आणलं आहे पण ज्या वेळेस तो निरागस, मोहक हसतो ना,तेंव्हा त्या हसण्याने समोरच्याला भूली पडावी...तसा...

-



अमृताला सारेच वाटेकरी असतात, हलाहल मात्र एकट्या महादेवालाच स्विकारावं लागतं. आणि स्विकारण्याहून अधीक महत्वाचं म्हणजे ते पचवून शांतही रहावं लागतं...

-



व्यवहार नात्यांमधे दुरावा आणतो हे खोटं आहे...व्यवहार बरेचदा अपरिहार्यच असतो. फक्त त्यात मलाच जास्त हवं हा जो "हव्यास" असतो ना, तो नात्यातील दुराव्याला कारणीभूत ठरतो..

-



बस प्यार से छुने भर से उतर आती है आँखों में,
सुकून की नींद किसी तख्त-ओ-ताज की मोहताज़ नहीं होती...

-



काय तपस्या केलीस राधे
व्रत कोणते आचरणात,
त्रैलोक्याचा स्वामी जो
तो तव अर्ध्या वचनात...

-



प्राजक्त की चांदणे नभीचे
माझ्या अंगणातून पसरले,
हरवला का चंद्र तयांचा...?
शोधण्यास भूवरी अवतरले...

-



एक काळ होता जेंव्हा माणसांप्रमाणेच दारं ही एकमेकांना उराउरी भेटायची,आता तर आपण त्यांनाही एकटं पाडलंय..

-



कॅलिडोस्कोप..
काचेच्या तीन पट्ट्या,पेपर,चिकटपट्टी आणि रंगीत मणी किंवा बांगड्यांचे तुकडे अशा मोजक्या साधनांनी तयार होणारं खेळणं...लहान असताना बरेचदा स्वत: तयार केलेलं.त्या त्रिकोणाला थोडासा धक्का लागताच त्याच्या आतील बदलत जाणारे आकार पाहून अगदी मोहित व्हायला व्हायचं..
काल बरेच दिवसांनी कॅलिडोस्कोप पुन्हा पाहण्यात आला आणि त्यात आयुष्याचं थोडंसं साम्य जाणवलं.शरीर,माणसं,विचार,वेळ ही सारी माध्यमं परिस्थितीचा किंवा एखाद्या लहानशा घटनेचा जरी धक्का लागला तरी आपापले आकार बदलतात..फरक इतकाच की कॅलिडोस्कोप मधिल सारे आकार सुंदर असतात,पण आयुष्यातले बदलणारे हे सारेच आकार सुखावणारे असतीलच असं नाही,बरेचदा ते अनपेक्षितच असतात.पण मती-निती-कृती यांचा त्रिकोण विशुध्द असेल आणि विश्वासाचा पाया भक्कम असेल तर या सा-या बदलणा-या गोष्टींचाही आनंद घेता येतो..

-



जरी तारा एक निखळता
ना रिते नभांगण होते,
परी सर त्याच्या तेजाची
ना दुस-या कोणा येते..

-



अवघड प्रवास हा आयुष्याचा
अन् वळणा वळणाचे रस्ते,
हात धरूनी चाल माझा
अशी साद देती पुस्तके...

-


Fetching आनंद ढमाले देशमुख Quotes