मजहब की शपथ लेकर
क्यूं नफ़रत आपस में करते हैं...
सभी का ख़ून शामिल
यहां की मिट्टी में हैं...
विभिन्नता के इन चालो में
पर ढंग हमारे अपने हैं
तीन रंगोसे सुसज्जित तिरंगा
हमको सबसे प्यारा हैं ।-
बदलले वागणे
बदलल्या दिशा
भावनांच्या भरात
कोलमडून गेल्या आशा...!!
बदलली माणसं
बदलले स्वभाव
मनाच्या कोपऱ्याशी
हा कसला लपंडाव...??
बदलले जगणे
बदलल्या रिती
नव्याने स्विकारायची
हीच आयुष्याची नीती...!!-
मनातलं ते वादळ जरा शांत कर...
गच्च भरलेल्या डोळ्यांत अश्रूंची वाट मोकळी कर...
भावनांच्या दाटलेल्या ढीगाला जरा कोणासोबत हलकं कर..
नको रे कोसू स्वतःला...अवक्त न राहता ते वक्त कर...!!-
गिरटी घालत पुन्हा स्वच्छंदी उडायचे आहे..
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवायची आहे...
फार काही नको...थोडा विसावा दे...
परत एकदा आत्मविश्वासाने उंच भरारी घ्यायची आहे...!!!
-
अजुन किती सोसायच्या घाणेरड्या नजरा या
जगणे अशक्य करून टाकले कूविचारी जगाने या...
जो पर्यंत माणसातला खरा माणूस होत नाही जागा
तो पर्यंत कित्येक निर्भयाला मिळणार नाही न्याय,
नराधमाच्या वासनेला बळी पडलेल्या...!!-
मोजू तरी कशी उंची
तुझ्या कर्तृत्वाची
तू जगाला शिकविली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची....
तू देव नव्हतास
तू देवदुतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा 'महामानव' होतास...!!
-
हसतोय चंद्र लख्ख प्रकाशात
मिठीत घेऊन शीतल छाया...
बनुनी चंद्राची शुभ्र चांदणे
मनातील प्रतिबिंबाला साद घालूया...!!-
गेलेले क्षण आणि येणारी वेळ
दोघांचा न जुळणारा मेळ...
विचारांचा चालतो असाच खेळ
होईल कसे भविष्याचे या विचारात
निघून जाते ही सांजवेळ...!!
-
कधी उगाच हुंदके देत खूप रडावसं वाटतं
दाटून आलेल्या भावनांना वाट करून द्यावस वाटतं..!!
कधी उगाच उघड्या डोळ्यांनी स्वप्ने रंगवावी वाटतं
नकळतच पडलेली स्वप्न सत्यात जगावस वाटतं..!!
कधी उगाच मनातील असंख्य प्रश्नांना सामोरे जावं वाटतं
त्याची उत्तरे शोधण्याच्या नादात हळूच हरवून जावसं वाटतं..!!-
जीवनाच्या कॅनव्हास वर
रंग उधळावे आठवणींच्या कुंचल्यानी
करून टाकावे कॅनव्हासला पोर्ट्रेट
जीवनाच्या रंगीबेरंगी छटांनी...-