काल सारं गाव जिंकलेलं,
पैश्यांवर नाव जे कमवलेलं...
पैश्यांनी स्वार्थी जग वाहवत नेलं
आणि आज सगळच गाव खूप दूर गेलं...
काल खोटा विश्वास आपलासा वाटला,
आज खरा अविश्वासु मुखवटा उलगडून पाहिला...
काल खोटी ममता हक्काची वाटली,
आज मायेचा ओलावा खऱ्या अर्थाने अनुभवला...
काल माणूसघाणी वृत्तीनेच 'माणुसकी' म्हणून झेप घेतली
आणि आज गगनी अनपेक्षित पक्ष्यांची किलबिल निदर्शनास आली...
काल खोट्या भावनांच्या अंधाराआड अयोग्यतेला आधार दिला,
आज खऱ्या भावनांची गर्दी पाहता मनमोरही गहिवरला...
पण खरंच आज खूप आनंद झाला,
जगाला वेडं करणारा पैसाच खूप काही शिकवून गेला...
अनुभव द्यायला माणसं तर असतातच
पण आज पैसाही अनुभव देऊन गेला...-
भांडलीस तरी चालेल,
खोटं खोटं वागणं नको.
डोळ्यांनी खरं, ओठांनी,
खोटं खोटं सांगणं नको.-
अविर्भाव हा खोट्याचा आज मनाला छळत होता,
न सांगितलेल्या सत्याचा त्याला खडा पहारा होता..
खोटंच सारं जीवन याचा संभ्रम आज फोल ठरला होता,
सत्याचा प्रत्येक उलघडा मनाला आज कळला होता...
खोट्याच्या आड दडला चेहरा छद्मीपणाने हसत होता,
सत्याचा उलगडलेला चेहरा मात्र लख्ख प्रकाशित होता..
खोट्याच्या त्या कपटी नजरा शापित सत्य भासवत होत्या
सत्याच्या त्या अमोघ नजरा त्या शापालाही भेदत होत्या..
खऱ्या खोट्याच्या नजरा साऱ्या क्षणात विलीन झाल्या होत्या.
जन्माचं सारं कपट उमजून मृत्यूपुढे त्याही मुकल्या होत्या...-
या जगाच्या पाठीवर वावरताना
बोलावं लागतं खोटं खोटं
घरच्यांसमोर असताना
दाखवावं लागतं खोटं खोटं
ऑफिस मध्ये असताना
काम करावं लागतं खोटं खोटं
बस स्टॉप वर उभा असताना
वाट बघायाला लागतं खोटं खोटं
मुलीला पटवताना
आश्वासनं द्यावं लागतं खोटं खोटं
बायकोने खर्च विचारल्यावर
हिशोब द्यावा लागतो खोटं खोटं
मंदिरात असताना
देवाशी बोलावं लागतं खोटं खोटं
डिव्होर्स घेताना
कोर्टात सांगावं लागतं खोटं खोटं
तू मला सोडताना
आधीच सर्व होतं खोटं खोटं
पण शेवटी एकच सांगतो
नवीन नातं जोडताना
वागू नको खोटं खोटं-
लोकांच्या मतावर आपल आयुष्य ठरवायचं नसत.
लाख प्रयत्न करु दे शत्रूला स्वतःच स्वतःला हरवायचं नसत.-
खोटं बोलणं मला कधी जमलंच नाही
आणि माझं खरं कुणाला कधी पचलचं नाही अर्थात जिंकूनही मी कधीच जिंकलो नाही..-
खूप झालीत आता
फुकटची आश्वासन,,
जर नाही आलास तर
करेल कडक शासन.......-
मी माझ्या शब्दांत, तुझंच मन मांडत होतो..
अन् तू वेडी त्यालाच खोटं ठरवीत होतीस..!!-