गुलाबी रंग की दुनिया है
इसमें कई सारी कहानियां है
उजाला ना करो साहब!
जिसम पर कई सारी निशानियां है-
बस तुम पीछे से वार मत करना
हमे तो छोड़ दिया आपने
बेहया किसीसे तो प्यार जरूर कर... read more
का आहे उभा उन्हात? कुणास ठाऊक
पाऊस कुणाला भिजवून राहिला
त्याच त्यालाच ठाऊक!
पडतील भिंतीलही आता भोके फार
पाण्याने केला आमच्यावर ओला वार
सुखानं जगत होतो आम्ही चार
सरकारनं उगीच केला पंचनामे फार
टीव्हीवर तर लोकांना फार मदत देऊन राहीले
पण दुर्दैव आमच, आमचे खिसें फाटून राहिले
राहूदे आम्हाला, आम्ही निसर्गाला पाहून घेऊ
पण तू नेता आमच्या गावचा म्हणून
उगीच डोळ्यात पाण्याच्या नदया नको वाहू
सवय झाली आम्हला संकटाची फार
आमदार साहेब तुम्ही नक्की मदत कुठं दिली राव
काय आमचं दुखणं सगळं तुम्हाला ठाव
तरीही तुम्ही आम्हला पाच हजार देता काव
मदत कुठाय आमची म्हणून अधिकाऱ्याला पुसले
तो म्हणे, पूर आता ओसरला ना मग का रडून राहिले
सरकारचं जाऊ दे देवानं तरी आमच्याकडं पहावं
तो मदत करील म्हणून त्यालापन कोंडले ना राव
भारी आहे ना सरकार त्यांना नाही भीती
मतं दिली यांना पण यांनी केली अपोजिशनशी युती
कुठं पडलंय ऊन अन कुठं पडलाय पाऊस
शेतकऱ्याला सोडा, सरकार म्हणे आम्हाला आहे ठाऊक
ठीक आहे मंग, आता तर सर्व भोगायच हाय
आता आमचा मतदानावर पण विश्वास उरला नाय-
कॉन्ट्रास्ट
वितळला सूर्य, पसरली रात्र
उजेडाचे उपकार तू विसरला मात्र
जाई जुई ची रोषणाई, झगमगती तरुणाई
घरी निजली आई,
अन बाहेर खुणावते अंधारतली बाई
रात्रीची सुरुवात सकाळचा अंत
इथं सापडतात दिवसात स्वताला म्हणवणारे संत
अजब आहे दुनिया, आमचं सगळं आहे मस्त
रात्रीचा अंधार....हा अंधार नाही स्वस्त
भली मोठी दुनिया छोट्याश्या ग्लासात फस्त
उद्याच रडणं आज जगायचं नसत
ओळखीचा दिवस अन अनोळखी रात्र
गर्द काळोखात दिसतील रंगीबेरंगी पात्रं
काय सांगू तुम्हाला
संसार करायला हफ्ता लागतो जास्त
पण बाहेरच्या बाईवर उडवायला जिगर लागतो मस्त
नाही तुम्हाला परवडणार संसारातील भाजी
खूप महाग असली तरी तूच फुलराणी माझी
समजलं असेल तुम्हाला आयुष्य दिसतं तसं नसतं
सूर्य जरी मावळला तरी चन्द्र घालत असतो गस्त!!!-
मला हवंय सगळं
पण द्यायचं काहीच नाही
प्रेम तर आज आहे
उद्याचं माहीत नाही
सुगन्ध दरवळतोय
पण बागेत फुलेच नाही
मी तर कधीच उमललोय
माळणारं कुणीच नाही
दलाल बसलाय बाजारात
तरीही प्रेम मिळत नाही
देहाच्या भेटीगाठी खूप झाल्या
पण मन अजूनही भरलं नाही
चल असुदे मला एकट्याला
जगण्याला गंमत नाही
दिसतो मला रोज चंद्र
पण तो मधुचंद्र नाही-
भेटूया पुन्हा कधीतरी
आता मी झालो निवांत
गोष्ट राहिली अपुरी इथं
आहे मन अशांत
उठतील का पुन्हा
भेटीगाठीच्या उत्सवांचे वारे
का उरतील फक्त
आठवणींचे किनारे
यावे आम्हा पुन्हा एकदा मरण
भेटायचे, सांगायचे राहून गेले
करशील का ग माझे स्मरण
सम्पवून टाक देवा आत्ता तू
जगण्याचे किरण
नको हवा आहे असा जन्म
नको पुनर्जन्माचे ग्रहण-
दूरवर जाता आलं असतं तर बरं झालं असतं
तुला एकदा पाहता असलं असतं तर बरं झालं असतं
फुलं झालो असतं तर बरं झालं असतं
तुझ्या केसात माळता आलं असतं तर बरं झालं असतं
पंख झालो असतो तर बरं झालं असतं
तुला घेऊन उडता आलं असतं तर बरं झालं असतं
रात्र झालो असतं तर बरं झालं असतं
चंद्राला जवळून बघता आलं असतं तर बरं झालं असतं
मावळताना उगवता आलं असतं तर बरं झालं असतं
तुझ्यासोबत जगता आलं असतं तर बरं झालं असतं-
मी निजले होते माझ्यापाशी
तरी सारी दुःखे माझ्या उराशी
नितळ वारा बोले मनाशी
गर्दीतल्या माझ्या खोल तळाशी
उमलून गेले सारी जराशी
कुणी बोलेल का माझे माझ्याशी
आयुष्य तुझ्याविना उपाशी
प्रेम केले मी फक्त तुझ्याशी
-
ये तुफानो का सहर है यहां जरा संभल के चलो
होते होंगे बोहोत वादे आपके साथ
आप बस इन तुफानो से कुछ सीखते चलो-
काश ये कहानियां अधूरी ना होती
आपके बिना ये जिंदगी पूरी नही होती
टूट चुकी है कश्तियां दोनों के जिंदगी की,
आज आप हमारे साथ होती तो
हमारी कहानी भी किसी दिन पूरी होती-