आठवणी....त्या सगळ्या पुन्हा,©®MDK
का आठवाव्याशा वाटतात काेण जाणे ?
शिंपल्यातला माेती जणू तू माझा,©®MDK
आठवणींचे काेंदण लावून तुला राेज बघणे !
नकळत हाती आलेला माेगरा तू,©®MDK
आठवणींचा सुगंध घेताना तुला राेज स्मरणे !
मला जपणारा ह्रदयीचा श्वास तू,©®MDK
आठवणींची धडधड तुझ्यासवे अनुभवणे !
आठवणी नि प्रेमाने भरलेला कलश माझा,©®MDK
आठवणींना अपुल्या त्या कसं जीवापाड जपणे !-
आठवणींनी मन मोहून घेतले
नकळतच पाय मग तिकडे वळले
आठवणींच्या गाभाऱ्यात शिरता
नयन रक्ताश्रूनी का मग वाहू लागले
फूल होते की निखारे
मला माझे ना कळले
जितके कोमल भासले
तितकेच पोळून मी निघाले
त्या वाटेवरून नयन कधी ना फिरले
मन त्यासाठीच व्याकुळले
प्रेमात तुझ्या पवसापरी
चांदणे बरसले
आठवणीत तुझ्या तेही सारे
दगडाचेच झाले
चांदणे सारे नभी या दाटले
तू दिलेल्या हाराचे
जणू मोती ते तुटलेले
...दिपा-
*आठवणींचे पक्षी*
आठवणींचे पक्षी
घेती स्वप्नांचे उंच
गगन भरारी,
गोड आठवणींना
माझे मन न्याहारी...!
करती आठवणी
मनात घरटे..,
आठवणी ची
दडपण मनात दाटे.,
रात्री-दिवसाच्या पाहरी...!
भूक नाही, तहान नाही
आठवणींच्या पायी..,
तरी पण राणा-वनात
भटकत रहायची आठवण
पाही पाही...!
कितीही चालत असती
आठवणी,
जिवंत आहे तोपर्यंत
आहेत ताज्या आठवणी...!
मरणा नंतर पण,
राहून जातील त्या आठवणी..
सांगून जातात ते
आठवणींचे पक्षी...!-
आठवणींचे पसारे
मांडले होते मनात
तुला बघताच जुन्या
आठवणी समोर येतात क्षणात
-
मृगाच्या पहिल्या सरीत
मृत्तिकागंध दरवळतो ऊरी
आठवणींचे तरंग ऊठती मनी
अन् भास, तूझेच घरीदारी-
तुझ्या आठवणींचे ठसे,
ह्रदयात माझ्या उमटत गेले...
गुंतले हे मन तुझ्यात कसे,
ना मला कधी उमजत गेले...
दुरावे ह्या अंतरिचे कधी मिटले,
ना मज हे समजत गेले...
स्नेहबंधाचे नाते आपुले,
न कळताच कधी जुळत गेले...
-प्रतिभा...😊
-
आठवणींचे धागे ज्या त्या वेळीच मनात घट्ट बांधावेत.
कोण जाणे,
तेच क्षण, व्यक्ती-प्रकृती-परिस्थिती पुन्हा जुळून येतील न येतील...-
आठवणींचा वारा वाहे अलवार
घेई सर्वांना कवेत हळुवार
फिरे मोरपीस मनावर मऊशार
अधिकच गहिरे होती मग नेत्र पाणीदार...-
आठवणींचे गाव....
जसे मोठे झालो
दूर आम्ही गेलो
गाव पाठी राहिले
आम्ही पुढे निघालो
छोटेसे कौलारू घर
त्याला बांबूचे दार
नेहमी सणासुदीला,
सडा-रांगोळी दारोदार
बहरली फुलझाडे
दारी सजली तुळस
प्रात:भक्तीचा प्रहर
पाहता मंदिराचा कळस
गाव आठवणींचे गाठोडे
घट्ट पाठीवर घेतलेले
व्याकुळ परतीच्या ओढीने,
क्षण अंतरी गुंतलेले...
© प्रयाग पवार
-