नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
गाते तुला मी अंगाई
झोपल्या गोठ्यातल्या गाई
पावसाचा आवाज ही थांबला आता, थांबला रे
फुलांच्या पाकळ्या मिटल्या
चांदण्याही ढगाआड लपल्या
रातराणीचा गंध पसरु लागला आता, लागला रे
पक्ष्यांची किलबिल थांबली
माझी अंगाई ही लांबली
रातकिड्यांची किरकिर बंद झाली, बंद झाली रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
-
निघाले आज तिकडच्या घरी
वाटेत लागल्या पावसाच्या सरी
मनात असला जरी गोंधळ
तरी वाटतंय एकदम भारी
उद्या आहे सत्यनारायणाची पूजा
तोरण्याच्या माळा लावल्या दारी
घरची मंडळी सगळी हसरी
पूजेला बसणार मी व कारभारी
वचन दिले तुला जीवलगा
राहशील सदा माझ्या अंतरी
हरी चा आशीर्वाद घेण्यास
करू आपण पंढरीची वारी
-
नाही कशी म्हणू तुला, येते रे तुझ्या घरा
दोघे मिळून घर छान लावू जरा
नाही कशी म्हणू तुला, सोबत करते तुला
हिरव्या गवतावर थोड चालुदे मला
नाही कशी म्हणू तुला, मनीचे कसे सांगू तुला
सांगताना लाज वाटे माझ्या फुला
नाही कशी म्हणू तुला, जोडीने जाऊ जरा
पाऊस येईल आता चालू जरा भरा भरा
नाही कशी म्हणू तुला, जाऊ चल प्रवासाला
व्यस्त कामातून, मस्त वाटेल मनाला
-
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने दिंडीत आज चालते जरा रे
डोईवर घेउनी तुळस पंढरपुरी घेते धाव रे
टाळ मृद्युंगात निघाली पालखी
दिंड्या,पताका,घेऊन वैष्णव नाचती
नटले सजले आज, विठ्ठलाचे गाव रे
विठ्ठला विठ्ठला साक्षात विठ्ठला
येते दारी तुझ्या दर्शन घेण्या
माझी ही वेडी भक्ती तुलाच ठाव रे
माझ्या मनाला भक्तीचा किनारा लाभू दे
तुझ्याशिवाय माझे लाड कोण करी
श्वास अडकता विठ्ठला घेई तुझे नावं रे
-
काय सांगू सखे
नयन तुझे जादुगार
त्यास नको काजळाचा भार
रेखीव तुझे हे नयन
त्याची वाटे भीती
सखे बघता तु रोखून
तुझ्या नयनातील पाणी
मज वाटे अळवावरील
जणू तो शुभ्र मोती
नयन तुझे जादुगार
त्यात सखे मी
गुंतून गेलो फार
-
होती आपली जुनी मैत्री
मैत्रीच्या पलीकडचं होत जग
स्वतःमधे तुझ्यासाठी खूप बदल केले
नेहेमीच जीव लावला तुला
दिली तुला वेळोवेळी साथ
पण आपल्यातील प्रेम कुठे तरी गडबडले
निभावलं नाहीस तु नातं
रेशीम गाठी झाल्या सैल
आपल्यातील मैत्रीचे धागे फिस्कटले
होतीस माझा श्वास
नकळत सारे घडले
विश्वास ठेवला मैत्रीवर अन् तोंडावर आपटले
-
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
काय झाले मुक्या भावनांना
तुच निसर्गाचे रूप गोजिरे
तुला नव्याने आज पाहते
रंग अनोखे धरती वरती
मीच तुझी व्यथा जाणते
तुझेच सारे कौतुक चाले
गोड गुलाबी तुझे हासणे
केली कविता आज तुझ्यावर
ऐक आता माझे गाणे
भरभरून दिला आम्हा आनंद
तुझ्या फुलण्याने होई सकाळ
देवा चरणी हीच प्रार्थना
सुखात राहा तिन्ही त्रिकाळ
-