सांग तू अशी का करतेस
माझ्या कडे बघतेस
आणि गालातल्या गालात हसतेस..!
सांग तू अशी का करतेस
माझ्या कडे टक्क लाऊन बघतेस
आणि आपल्या कातील नजरेने
माझ्या हृदयाला घायाळ करतेस...!
सांग तू अशी का करतेस
डोळ्यांच्या इशाऱ्याने
लक्ष वेधून मोहित करतेस,
साध्या भोळ्या माझ्या मनाला
लुभाळण्याचा प्रयत्न तू का करतेस...!
सांग तू अशी का करतेस..?
-
अजून खूप काही चांगला आणि तुमच्या आवडीचा विषय मला लिहायला आवडेल मल... read more
काँटे फूल के साथ
नही चल सकते हैं..
बुजदिल खुल के साथ
नही चल सकते हैं..
अरे रास्ते में जो छोड़ गया
उसे जाने दो,
अकेले के राहों में
हमसफ़र शेकडो मिलते है..
-
अंतरंगाचे रंग
काही लपलेले,
काही लपवलेले
काही दिसलेले,
काही दाखवलेले..!
अंतरंगाचे रंग
दिसत नाही कुणाला,
आगळे-वेगळे रूप त्याचे
बघतांना ही दिसत नाही
निसर्ग चित्ररंग डोळ्याला..!
दिसले जरी रंग बदलते
न बघण्यासारखे झाले डोळ्याला,
गहिवरलेल्या रंग भावना
भासते खंत माझ्या मनाला..!
अंतरंगाच्या निसर्गा
तुही रोज रोज बदलू लागलास,
हळू हळू माणसांसारखा
तुही आता वागू लागलास...!-
तुझे शब्द
माझे अक्षर,
लेखणीच्या मनातुन
तयार झाले स्वप्नातले
कागदावरचे घर..!
चूकलेलं मिटणार नाही
उमटून बसली आहे
रक्त साही,
काळजाची ही झाली आहे
लाहीलाही...!
शब्द पण तुझेच
तूच विसरली,
ओठातून बोलले शब्द
मनाच्या कागदावरचे
अक्षर खोडून गेली...!
ना राहिले आता
शब्द आणि अक्षर..
तुटली मनाची ती लेखणी
जळले स्वप्नातले कागदावरचे ते घर..!-
धर्माच्या अहंकाराने
केला त्याने बलात्कार,
शरीराच्या वासाने संगे
जातीचा हा अत्याचार...!
निवस्त्र करुनी लाचारीला
प्रताळणेचे चटके दिला,
अन, मी वीर मर्दाची जात
म्हणे तो आपली साला...!
माणुसकीच्या मर्दांगिला
हिजड्याची औलादीपेक्षा
खालचा तो झाला..,
तिघा-चौघांच्या समूहाने
एका निष्पाप मुलीवर
शक्तीचा जोर दाखवला...!
एवढा सगळा होऊन ही
पाखंडी सरकार म्हणते
बलात्कार नाही झाला..,
पुरावे नष्ट करू द्या
आधी पीडितेचा शव जाळा...!
किती सोसावे अजून तिने
अन्याय-अत्याचाराचे चटके,
तिच्या मेल्यावर पण कमी नाही
बलात्कारी यातने चे झटके...!-
कोणाच्या पाठीमागे बोलून
काही मिळत नाही..
मन मोकळ्यापणाने बोलून ही
मनाला आनंद काही वाटत नाही...!
छोटे-मोठे
कारणे पण असे मनातल्या
वेड्या-वाकड्या विचारांचे,
कुणाकडे बोलायचे शब्द
विसरभोळ झालेल्या मनाचे...!-
जाता उन्हा ची सावली पाहिजे..
नुसते काटेरी झुळक नको,
आपुलकीची कुंफन पाहिजे...!
वाट दाखवणारे हजार भेटतील
वाट लावणारे नकोच पाहिजे...!
काळजाला भावणारे शब्द पाहिजे
काळजाला ठेस लावणारे
कटु शब्द नकोच पाहिजे...!
आहे जोवर मी माझाच आहे
मी गेल्यावर तुझाच आहे,
प्रॉपर्टी ची गरज नाही रे...
बापाची सावली पाहिजे......!-
का वाटावे असे काही..
तुफान वाऱ्याच्या समान
मन माझे वाहून जाई...!
का वाटावे असे काही
पावसाच्या त्या सारी समान
आठवणींचे अश्रू वाही...!
का वाटावे असे काही…
मंद झुळूक वाहणाऱ्या,
झऱ्या समान
मनाला सांत्वना देणारा
सोबती कुणीच नाही...!
का वाटावे असे काही
दुखावलेल्या मनाला
पर्याय काही समजत नाही...!-
सांग न ग..
का तू अशी रुसलीस..
अन अशी एकटी का बसलीस..
कालच तर तू हसलीस..
अन माझ्या प्रेमात फसलीस..
आता सोडून जाईल मी हे जग..
अन बस तू रडत मग..
नाहीतर दुसरा प्रियकर शोध.
अन शांत कर तुझा क्रोध.
काय बी असो माझा गुन्हा..
आता करणार नाही मी पुन्हा..
आता एकदा तरी गोड हास.
आणि पूर्ण कर माझी आस...
का ग सखे रुसलीस..
अशी एकटी का बसलीस..
कालच तर तू हसलीस
अन माझ्या प्रेमात फसलीस..-
प्रेम हे प्रेम असतं
मनाच्या जुळवाजुळवीतून
एकमेकांच्या हृदयात same असतं..!
प्रेम हे प्रेम असतं
पारदर्शक असेल तेवढाच वेळ
Sweet असतं,
अपारदर्शकता आली की
प्रेमाचा Game होत असतं...!
प्रेम हे प्रेम असतं
प्रेम आहे तेवढाच zoom होत असतं,
एक चूक असली की,
zoom out होण्यास पुरेशा असतं...!
शेवटी कितीही आक्षेप
असले तरी प्रेम हे प्रेम असतं...!-