भांडणं घरातली असो वा समाजातली
त्याचा परिणाम इतर लोकांवर सुद्धा होतो, त्यामुळे
दोन जणांची आपापसातील भांडण थांबवायची असेल तर
दोघातून एकाला तरी शांत व्हायला पाहिजे तर भांडण आपोआप कमी होईल
आणि समोरचा शांत होईल याची वाट बघू नका, स्वतः माघार घ्या.....-
आई आहे तोपर्यंत
बिलगून घ्या तिच्या कुशीत
ती गेल्यावर फक्त भास होतात
रडावं लागतं तोंड लपवून
आपल्याच प्राक्तनाच्या उशीत......!
वडील आहेत तोपर्यंत
मिरवून घ्या स्वतःला
जसा जग जिंकल्याचा आव सिकंदराला
ते गेल्यावर त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला
अन् बघत बसावे लागते फोटोवरच्या हाराला.....!
अपेक्षा नसतेस काही त्या दोघांचीही
त्यांना आधार हवा असतो शरीराला
कारण जन्म दिलेला असतो
आपल्या काळजाला......!-
कळी होती आधी
तिच्या इवल्या इवल्या पावलाने
घरालाही बालपण मिळे,
तिचे ते भातुकलीचे घर
त्या कुंपणाच्या घरापेक्षा गोड भासे,
तिच स्वच्छंद बेधुंदपणे वावर
फुलपाखरा परी बागेत रंग उधळे,
तिचे ते बोबडे बोल तोऱ्यातील
बाबांनाही हुषारपण शिकवी,
तिचे ते खट्याळ नाटकं
आईच्या डोळ्यात आणतात आनंदाश्रु,
पण उमलाता कळी
कन्यादान क्षणी कणखर मनाला हळवं करी...
@तेजस-
माणूस जन्माला येतो तेव्हा सगळ्यात मोठ्ठं दुःख सोबत घेऊनच अवतरतो...👇
आपल्या जन्मदात्या आई - बापाला कायमचा निरोप देण्याचं...😖-
तुमचं बालपण ज्यांनी सुंदर केलं त्यांच म्हातारपण
सुखकर आणि सुकर करण्याची जबाबदारी अता आपली आहे;
तेंव्हा कुठे तुम्हाला तुमचं बालपण सुंदर होत हे म्हणण्याचा हक्क आहे...!-
जन्म देतात आई वडील,
जगण्याला अर्थ देतात आई वडील.
स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता,
आपल्याला सुखी जीवन देतात आई वडील.
कुंभाराच्या मातीसमान असतो आपण,
योग्य तो आपल्याला आकार देतात आई वडील.
आणुनी मग संसाराच्या बाजारात
काय आहोत आपण,
ह्याची जाणीव करून देतात आईवडील.-
आई बापाचे झडत चाललेले सफेद केस बघितले की, बालपणीचा तो काळ डोळ्यासमोरून तरळून जातो, जेव्हा आईच्या कुशीत आणि वडीलांच्या कडेवर असायचो, किती सुंदर होत ते बालपण., दिवस कीती भराभर निघून जातात नाही.,
लहानपणी आईवडिलांनी आपल्याला सांभाळलेल जपलेल असत, म्हातारपणी त्यांची साथ देणं, आपल परमकर्तव्यच असतं ..🙏-
जसे तुमचे तसेच माझे आई बाबा
एकाच माळेचे की हे मणी जणू
वात्सल्य दया माया करुणा ममता
कणा कणात रुजलाय प्रेमांकुर जणू
रंजल्या गांजल्यांचा कळवळा सेवा
माणुसकीचा पाझरणारा झरा जणू
स्वत:चे आसू पुसून हासू फुलवणारे
सुखद सावलीचे आनंदाचे झाड जणू
लेकरांचे लाड हट्ट पुरवणारे त्यागमूर्ती जरी
शिस्तप्रिय आचरणाचे संस्कारांचे पाईक जणू
ब-या वाईट प्रसंगात पाठबळ मार्गदर्शन
प्रापंचिक जीवन नौकेचे सुकाणू जणू
संयोगाने ज्यांच्या आज आपलं अस्तित्व
जन्मदाते आपल्या आयुष्याचे श्वास जणू
ब्रह्मांडनायक जगतपालक ठाऊक नाही
भूतलावर सगुण साकार मानवी देव जणू
- © श्रीरुप
- Dr. Rupali
-
दहा गुंठ्याचा बंगला फिका पडतो
त्या झोपडी पुढं ज्यात आई-वडीलांचा
वास असतो ...
-