तू माझा मांजा होशील का..?
मला उंच उंच उडायचंय
तू मला ढील देशील का..?
उडताना भान हरवेल
तू मला सावरून घेशील का..?
मला जग जिंकायचंय
तू मला जिंकवशील का..?
-
आकाशात उडण्याची सुरुवात हळूहळू व्हावी
उंच भरारी घेत दिसेनासे व्हावे
कोणी दिसले की शर्यत व्हावी
पण मांजाचा डोर कुणाच्या हाती नसावा
झेप घेत ध्येयापर्यंत पोचायचंय
कुणी सोबत असो वा नसो पण
माझे स्वप्न मला पूर्ण करायचंय
मला पतंग व्हायचंय...-
उंचच उंच उडायचंय
आभाळालाही छेदायचय
उंच इमल्यानंवरून
हळूच खाली डोकावून
नजरेलाही भेदायचय
लहानग्यांना सोबत
थोरामोठ्यांच्याही
आनंदाच कारण व्हायचंय-
माना कि तुझसे दूरियां....
कुछ जायदा बढ़ गई हैं..!
पर तेरे हिस्से का बक्त...
आज भी तन्हा गुजरता है...!!-
पुरे झाले आता चाकोरीबद्ध जीवन
यातून मला बाहेर पडायचंय
संकटांनी सैरभैर झालीय क्षणभर पण
आनंदाच्या क्षणांना अजूनही भुलायचय
नाविन्याचा शोध घेत, चैतन्याच्या पाऊलवाटेने
मुक्तीचा मार्ग धुंडाळत जायचंय
मला पतंग व्हायचंय
आकाशात ऊंच उडायचंय
मला पतंग व्हायचंय
-Devashwin-
परंपरांच्या बेड्या तोडून
मला मोकळं व्हायचंय..
मोकळा श्वास घेण्यासाठी
उंच आकाशात उडायचंय..
इतरांच्या सूचनांवर
मला नाही नाचायचंय..
मनाचा राजा होऊन
स्वतःचंच ऐकायचंय..
-
कैसे कहे यारा की तुम याद बहुत आते हो अहसास तुम समझते नहीं और अदाएं हमें आती नहीं ।
-