दिल जीतने का हुनर
तुम मे हो ना हो..
तुम पर जान छिडकने का हूनर
हम जरूर आजमाते है ...-
तुम कहीं भी रहो....
हमने तो हमेशा तुम्हे
अपने दिल के धडकन मे सजाया है....
कभी ख्वाबों की खिडकीया तराशी हमने
और तुम्हे अपने नजर की लहर मे पाया हैं....
जितनी दरमिया बढती गयी हर पल...
हमने तुम्हे और भी करीब पाया है...-
Dedicated to पप्पा...तुमचं असणं..
जेव्हा ऐकते की तू अगदी तुझ्या पप्पांसारखी दिसतेस
तेव्हा जाणवते तुमचं असणं...
जेव्हा प्रशंसनीय काम करते
तेव्हा जाणवते तुमचं असणं...
आसवांचे मोती जेव्हा पाणी समजले जातात
तेव्हा जाणवते तुमचं असणं
मनातल्या निर्धारात, अन् निःस्वार्थ कर्तव्यात
नेहमीच जाणवते तुमचं असणं
देवासमोर हात जोडताना ,जाणवते तुमचं हसणं
स्वतःचे नाव पूर्ण ऐकताना जाणवते तुमचं असणं...
DevAshwin
-
सुकून के इंतजार मे दहकते है मेरे अल्फाज
हाथ की लाकिरे भी खोज लेती है कोई साज
दर्द काफी है ले डूबने को हमे...
बस साथ की है उम्मीद , हमदर्दी नही चाहिए
- DevAshwin
-
थकून घेतला विसावा
पण कुठे उसंत आहे
सरता शिशिर जीवनाचा
पुढे तो वसंत आहे..
इतकीच खंत आहे
वाहता मिळेल किनारा
पण क्षितिज अनंत आहे
धावणाऱ्या या युगात
कुठे एक क्षण निवांत आहे..
इतकीच खंत आहे
स्मृतीच्या कुपीमधील
सुगंध दरवळत आहे
हवेहवेसे लाभले तरी
त्यालाही अंत आहे...
इतकीच खंत आहे
- DevAshwin-
पुरे झाले आता चाकोरीबद्ध जीवन
यातून मला बाहेर पडायचंय
संकटांनी सैरभैर झालीय क्षणभर पण
आनंदाच्या क्षणांना अजूनही भुलायचय
नाविन्याचा शोध घेत, चैतन्याच्या पाऊलवाटेने
मुक्तीचा मार्ग धुंडाळत जायचंय
मला पतंग व्हायचंय
आकाशात ऊंच उडायचंय
मला पतंग व्हायचंय
-Devashwin-