"शब्द"
शब्दांची ताकद नाही या विश्वात
मनातच नाही तर ओठांतुन हळूच
बाहेर येऊन वहीच्या पानावर उतरावं
आणि आठवणीत ठेऊन कायम जपावं....-
नवरात्रीत नऊ दिवस येता
देवीचे जागरण गोंधळ होऊनी
संबळ देवीच्या देवळात वाजता
देवी नाचत येई अंगणी
दसऱ्या दिवशी तीचे विसर्जन होता
राग , द्वेष , वाईट विचार , दुःख
दारिद्र्य सर्व काही विसर्जित करून
हा दसरा आनंदाने साजरा करूया...
तुम्हाला व तुमच्या परिवारास
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏-
आयुष्यात आपण खूप काही शिकत असतो,
पण शिकत असताना आपण ज्या वाटेवर
चालतोय ती वाट किती खडतर आहे
याची सतत आपल्याला आठवण करून देते
पण ती वाट कितीही खडतर असली तरी
त्या वाटेवर चालण्याची हिम्मत ठेवली पाहिजे.👍-
तुझी आठवण येता
मन वेडे पिसे होई
पावसाची पहिली सर
तुझी आठवण देऊन जाई
तू सोबत असलीस की
जीव तुझ्यात गुंतून जाई
पण तू नसताना हा पाऊस
मज सांगतो तुझ्या आठवणी...-
तुमसे दूर होने का ख्याल
आता है तब दिल की
धडकन तुम्हे पास बुलती है-
बाप्पा तुझ्या आगमनाने
मन कसे हरपून जाते
तुझे सुंदर निरागस रूप
पाहून भान हरपुनी जाते
तुझा आशीर्वाद सदैव राहू दे
हीच मनोकामना तुझ्या चरणी🙏
-
गाढ झोप लागली होती
स्वप्न दिसू लागले होते
ती कशी असेल याची
हळूच अशी चाहूल लागली
तिचा विश्वास तिची साथ
असेल आयुष्य भराची
पण झोपेतून जाग आली
परत कधी त्या स्वप्नात जाणार
याची आस लागू लागली
स्वप्न वेडे पाहिले आता....
-
प्रेम हे प्रेम असतं
कधीच न तुटणार
अतूट बंधन असतं
आयुष्याच्या वाटेवर
सतत साथ देऊन
चालणार नात असतं
या जीवात जीव आहे
तो पर्यंत प्रेम देत राहणं
हे जीवनातलं मोठं सुख असतं.
प्रेम हे प्रेम असतं.
-
समुद्राच्या लाटांवर
होडी चालावी जणू
आयुष्यांच्या लाटांवर
सुखाची ओंजळ भरावी जणू
ध्येयाच्या लाटांवर
जिद्द , चिकाटी, धैर्य यावे जणू
आणि स्वप्नाच्या लाटांवर
यशाची किनार यावी जणू
अन मग स्वप्न बहरून यावे...-
आयुष्याचा रस्ता आहे खडतर
पण तुझी साथ आहे सोबत
सुख दुःखात माझ्या बरोबर असतेस
पण संकटाच्या वेळी माझी
ढाल बनून उभी असतेस तू
अशीच साथ आयुष्यभर असणारी
श्री सखी राज्ञी जयति तू-