हां अब हम खुलकर लड़ेंगे।
सेना पे उठने वाले हर एक
सवाल का जवाब अब हम देंगे।
वह हमारे लिए लड़ते हैं
अब हम उनके लिए लड़ेंगे।
हर बुद्धिजीवी की अब हम
बुद्धि भ्रष्ट कर देंगे,
हथियारों से नहीं, अपने शब्दों से,
हां अब हम खुलकर लड़ेंगे।
जो देश को बदनाम करेगा,
उसको हम नंगा करेंगे।
हां अब हम खुलकर लड़ेंगे।-
माझे धन ही माती,अभिमान माझा तिरंगा
सांभाळेल देश माझ्या आईला,विश्वास शहीद होताना वीराला
१६५२ भाषा,होतात जातीवरून दंगे
उधळतो एकीचे रंग-गरजेत मदतीला,दर सनाला
सहभाग दर शोधात-प्रयोगात,अखंड विश्वात विस्तार सारा
सप्तसुर इथे वास करती,गनितास शुन्य इथुनच मिळाला
पाहुना अवतार देवाचा,जाता त्यास शिजोरी
ओढ इथल्या संस्कृतिची परदेशी,दिले आयुर्वेदाचे ज्ञान जगाला
पाउल हरएक क्षेत्रात,इतिहास अशक्य प्रयत्नांचा
निरोगी जीवनाचे रहस्य,योगाचा उदय इथुनच झाला
असा माझा देश,देने आमची परंपरा
जैश्यास तसे उत्तर शत्रुराष्ट्रास...,
झेलतो त्यांच्या संकटाला
काही मिटले मातीत,काही नदीतून वाहले
मानवंदना त्यांस देऊन आज..,
सलाम देशाच्या जवानाला-अस्तित्व राखणाऱ्या प्रत्येकाला-
माझा देश डिजिटल झालाय्...
कष्टकरी उपाशी मरतोय्
माझा देश महासत्ता झालाय्...
कित्येकांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नाहिये
माझा देश संपन्न झालाय्...
बेकारांचा महासागर होतोय
माझा देश लोकशाही जगतोय...
काही लोक शासक होतायेत
माझा देश कोरोनाशी लढतोय्...
मी सुद्धा त्याला साथ देतोय्
माझा देश स्वातंत्र्य दिन साजरा करतोय्...
मी त्याला अगदी मनापासून वंदन करतोय्.-
भाग्योदय एकात्मिक विजयश्रीचा
स्वतंत्र भारत भवितव्याचा
शुभोदय संकल्प सिद्धांताचा
श्रेष्ठ माझा देश शोभिवंत
उजळत राहो असेच तेजोमय दाहीदिशा
तिरंगा तुझे शान आमुचे आहे
जीव नि प्राण
जे जीवन अर्पण केले
त्यांना कोटीकोटी प्रणाम
🌹🙏🇮🇳🙏🌹
सर्वाना स्वातंत्र्य पर्वदिनाचा
हार्दिक शुभेच्छा-
असा देश आहे जेथे प्रत्येक धर्म, जाती आणि समुदायातील लोक कोणत्याही भेदभावाशिवाय स्वतंत्रपणे जगू शकतात आणि सर्व संस्कृती एकत्रितपणे एक सुंदर वातावरण तयार करतात.
-
अनेक क्रांतिविरांच्या आत्म्याला
आजच्या दिवशी खरया अर्थाने शांती मिळते...
15 ऑगस्ट-
माझा देश
सप्तसागराचा, गगनचुंबी हिमालयाचा
झरझर निर्मळ सिंधुचा, जीवनदायी गंगेचा
माझा देश
अजिंक्य वीर योध्याच्या पराक्रमाचा
जगाला ज्ञान देणाऱ्या थोर ऋषीमुनींचा
माझा देश
प्रभू रामचंद्राचा, भगवान श्रीकृष्णाचा
समाधिस्त कैलासी भोळ्या शंकराचा
माझा देश
सनातन वैदिक संस्कृतीचा, अध्यात्माचा
चार वेद, अठरा पुराण, उपनिषदांचा
माझा देश
विविधतेने नटलेला, अनेक भाषांनी सजलेला
विश्व संस्कृतिचा उगम जिथे, महाभारत अन रामायणाचा..!-