त्वेषाने लढेल मी असू दे परिणाम काही
नजरेने होकार दे नको देऊ प्रमाण काही
पेन हाती घ्यायचा अन् तुला आठवायच
प्रेमात नाही आठवत दुसरे काम काही-
एका नजरेत उडाली धावपळ शब्दांची
लिहिलं गजल तिने पुन्हा जर पाहिले की-
पुन्हा नवी आस देऊनी सूर्य उजाडतो
तुटलेले स्वप्न मी पुन्हा पुन्हा सावडतो-
बसावे होऊनी शंड की पुकारावे बंड
जिंकण्या लढाई स्वाभिमानाची
तोडून टाकावे निष्ठेचे सोनेरी साखळदंड
करावी सोय आपल्या जगण्याची-
अगर चलने का हौसला हो तो रास्ते हज़ार मिलेंगे
कश्तियां डूब गई तो हम तिनकों पर संवार मिलेंगे-
जशी नाळ फुलाशी, रे भवऱ्याची
तशी तू डोर माझ्या ग आयुष्याची
सखे ज्वानीचा या झोंबतो गारवा
कुस ऊब मागते तुझिया स्पर्शाची-
मृत देहाचा भार उचली खांदेकरी चार
मिळाला नाही एकाचा जिते पणी आधार-
वादळे स्थिरावल्या वर
उन्मळून पडलेलं घर
पुन्हा उभारण्याची आस
मनी जन्म घेऊच लागते की
अचानक कुठून तरी
एक वणवा पेट घेतो
उरलेले अवशेष
जाळण्यासाठी...!-
जमलेच तर नवी सुरुवात अन्यथा अंत आहे
मिळाले प्रेम ज्याला तो खरा भाग्यवंत आहे-