हव्या असलेल्या बहुतेक गोष्टी
आपल्या कधीच नसतात..
त्या फक्त रात्री पडलेल्या
स्वप्नांसारख्या क्षणभंगूर असतात...-
नऊ महिने नऊ दिवसांसाठी मिळालेली
होती खोली छोटीशी
अंधारच होता सोबतीला होते थोडेसे पाणी
नाळ होती पोटाशी जी सार काही पुरवत राही
ठसका आईला लागताच त्रास मला होई
होते जरी अंधारात तरी त्याचे कधी भय वाटलेच नाही
जोडले होते मायेच्या नाळेला म्हणून कधी रडलेच नाही
आईचा मायेचा फिरणारा पोटावरचा हात
नेहमीच मला सुखावत राही
कधी मायेचा विसावा तर कधी प्रेमाची झुळूक फिरवून जाई
अंधार होता सोबतीला तरी त्याचे कधी भय वाटलेच नाही
कारण नेहमीच सोबत होती माझी गोड बोलणारी आई
-
सोबती तु असावे
न सांगता तुला कळावे
न बोलता तुला वळावे
वेळ कोणती ही असुदे अयुष्यात
सोबती तु असावे
डोळ्यातले भाव माझ्या
तु नजरेनेच ओळखावे
पाणावलेले डोळे माझे
तु प्रेमाने पुसावे
सोबती तु असावे
भांडन कितिही असुदे आपल्यात
प्रेमाच्या मीठीने ते संपुदे
रुसवे-फुगवे किती ही असुदे
सोबती फक्त तु असावे....
-
आयुष्यात सोबत पुढे जाताना दोघांपैकी कोणीतरी एकाने आपण चूक आहोत असे मान्य करून दुसर्याला बरोबर "right" असल्याचा समाधान होऊ द्यावं ... कारण हात हातात घेऊन जर जायचा असेल तर.... दोघेही "right" असतील तर फार दूर नाही चालत येत ... एकाला तरी स्वतःचं "right" सोडून "left" ने चालावं लागतं....
Let them be always right.....
Not because you are wrong.... they are in right just because you are holding them with your right hand on your right...-
चांदण्यात त्या मीच आहे
फक्त जरा नीटसं शाेध तू
साेबत माझी तुला हवी आहे
तर नजर चुकवू नकाे कधी तू-