पावसाची Poem!!
-
कधी कधी शब्द...
कधी कधी शब्द… नं सांगता बरंच काही सांगून जातात,
रडवायला काय, फक्त आठवणीदेखील पुरेश्या असतात..
कधी वाटतं, शब्दांनी सांगायचं थांबवावं,
आणि एकदा तरी.. कोणीतरी.. काहीही न सांगता सगळं समजून घ्यावं..
-
At midnight, her phone buzzed with a photo — it was of her sleeping, taken just seconds ago.
She lived alone, and all the doors were locked from the inside.
The closet door behind her creaked open slowly...-
फक्त गुलाबच का?
प्रेमाच्या भाषेला गुलाबच लागतो.. का?
मोगरा, जाई, चमेली, चाफा.. मागेच राहतो.. का?
सोनचाफ्याच्या पाकळ्या सोनेरी झळाळत्या,
त्याचं सौंदर्य प्रेमात कमी पडतं का?
रातराणीचा सुगंध मोहवून टाकणारा,
तिच्या गंधाने हृदय खुलत नाही का?
चाफ्याच्या फुलांना तो सोन्याचा साज,
तरीही गुलाबालाच का मिळतो इतका नाजूक ताज?
गुलाब नाजूक, गुलाब सुंदर,
पण त्याच्याच बरोबर काटे दंश करणार!
मोगऱ्याच्या मऊशार पाकळ्या स्पर्शताक्षणी,
प्रेमाची नाजूक किनार उमटत नाही का?
प्रेमासाठी रंगही महत्त्व असातो,
पण फक्त लाल गुलाबच k भावतो?
पांढऱ्या जाईचा गंध निर्मळ प्रेम सांगतो,
पिवळ्या चाफ्याच्या छटेने स्नेह उमलतो!
फुलांच्या दुनियेत गुलाब एकच राजा नाही,
प्रेमाचा गंध प्रत्येक पाकळीमधून वाहतो
म्हणून पुढच्या वेळी गुलाब देताना,
त्याच्या सोबतीला दुसरी फुलं देखील मी देतो..-
मराठी आमची शान.. आम्हाला मराठीचा अभिमान..
मराठी माझी मायबोली, अमृतासम गोड,
शब्दामधले प्रेम तिचे, हृदयाला तिचीच ओढ..
शिवबाच्या गर्जनेतून.. गगना.. गगनात ती दुमदुमली,
संतांच्या वाणीतून आमची माय मराठी.. जगभर जाहली..
शब्द तिचे शौर्याचे, शब्द तिचे प्रेमाचे,
कधी अभंग-ओवी, कधी सांगते गीत जीवनाचे..
गदिमांचे शब्द, कुसुमाग्रजांच्या काव्यासह.. आहेत तुकारामांच्या गाथा..
वपु.. पुल हसवतात.. पण घाबरवतात.. धारप.. शिरावळकरांच्या भयकथा..
परक्यांनी कितीही हसू आम्हावर, आम्ही अभिमानाने उभे,
मराठी आमच्या रक्तात, मराठीत नसे आम्ही दुभे।
ज्ञान, कलेची खाण ही, रणभूमीची ही जान,
साऱ्या भाषांमध्ये भारी, मराठी आमची शान!
होता.. आहे.. आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहणार..
मला.. माझ्या मराठीचा अभिमान..!!-
जाणता राजा माझा, सिंहासारखा शूर,
रणांगणी जिंकणारा, मोडला ज्याने पातशाहीचा तूर!
हिंदवी स्वराज्याची, रचली त्याने नीती,
न्यायाच्या सिंहासनावर, बसला तो पार्थी!
दुर्गम गडकोट घेत, दुश्मनाला जेरीस आणी,
सिंहगर्जना करून, दिला मोगलांना धनी!
राज्य नव्हे हे फक्त, माणसांची होती शान,
शत्रूही झुकती जिथे, करितो जयघोष महान!
गडकोट रक्षक होता, जनतेचा आधार,
रयतेचा राजा तो, शिवबाचा गजर!
हर हर महादेवाची, गर्जना होती ती,
मराठ्यांचा विजय, सोबत माता भवानीची शक्ती!
सिंहासारखा पराक्रमी, पवित्र त्याचा ठसा,
माझ्या मना वसे, जाणता राजा माझा!
जय भवानी! जय शिवाजी!!-