एक नातं...
समजण्यापलिकडचं
विषय तसा अवघड; थक्क करणारा
तरी काही समजून उमगण्यासारखं
वाटतं कधी अळूच्या च्या पानासारखं
अन् हातातून निसटणाऱ्या वाळूसारखं
ते प्रेम की मैत्री ह्यातच गुंतलेलं
नात्यांच्या गुंतगुतीत वेगळाच आस्वाद असलेलं
त्याच्या कुरळ्या काढून तिला हसू फुटलेलं
आणि दुःखात त्याने तिला कुशीत घेतलेलं
वेळेचं भान नसलेलं आणि तरीही ,
वेळेला तत्पर असलेलं ...
दात्याचं दान असलेलं
आणि सामाजिक भान असलेलं
जणू ईश्वराचं अलिखित विधान ,
विश्वासाची खाण आणि
माणुकीची जाण असलेलं
ते टिकून रहावं म्हणूनच;
हे गुणगान लिहिलेलं☺️
...हे नातं समजण्यापलिकचं। M@ng€$h
-
मैत्रीला ना रंग नसतो मैत्रीला ना गंध असतो
मैत्रीला नेहमी सोबत राहण्याचा एक वेडा छंद असतो..
मैत्री मध्ये तू आणि मी हा भाव मुळातच नसतो
हेच कारण असते की त्यात स्वार्थ अजिबात नसतो...
-
तु सोबत असताना
एकटेपणा वाटलाच नाही
बोलण्यात तुझ्या परकेपणा
मला कधी भासलाच नाही...!
माझ्या मनातील सर्वकाही
न सांगताच तुला कळले होते
तुझ्यातली ही जादू पाहून
मन ही तुझ्याकडेच वळले होते...!
पायातले पैंजण बोलावे तसे
डोळे तुझे बोलत होते
कोवळ्या या मनाला माझ्या
पालवी प्रमाणे जपत होते...!-
लिहिताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझं च नाव सांडल
अन् काही अक्षरांत का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं .-
मैत्री उंबरठ्यावर ची, दारा पार न गेली,
आकाशातील तारे, अनगणीत मोजत राहिली !
आकशातील शुक्रतारा, आयुष्यातही लाभला,
वेळेचं डाव खेळताचं, आभाळाखाली तो ही लपला !-
वागणुकीतील अर्थ सारे सहज बदलतात दिवसेंदिवस,
आपुलकीची हाकही आता होते परकी दिवसेंदिवस !!
दोन अक्षरांची ती व्याख्या सहज बदलते आपणहूनी,
मग मैत्री असो वा प्रेमाची ती वाट चुकते आपणहूनी !!-
शब्दांचा दिलासा देऊन
मन कधीच भरत नसतं,
म्हणूनच मैत्रीच खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं....-
कितीही भांडणं झाली तरी
खऱ्या मैत्रीला पुन्हा एकत्र येण्याची घाई असतेच ,
कारण विरहाची नशा दोघांनाही अनुभवायची इच्छा नसते....!-
तुझं माझं नातं मैत्रीच्या अलीकडे आणि प्रेमाच्या थोडं पलीकडे. त्या नात्याला काय नाव आहे हे माहीत नाही. पण ते नात खूप सुंदर आणि पवित्र आहे..
-