एक अशी तू एकाकी, शब्द कळ्यांची फुलराणी;
अधुन मधुन उलगडणारी, काव्य सखी माझी भारी !-
अभियांत्रिकी शिक्षण !!
तबला प्रेमी आणि वादक !!
संगीत... read more
कधी मंद वारा जणू बोलतो,
कधी हाच माझा तुझा भासतो ।
तसे भेटणे शक्य नव्हते तुला,
तरी दूरचे प्रेम कळले तुला,
असा आपल्यातिल दुवा वाटतो ।
तुझे पत्र मी कैकदा वाचले,
तुला अक्षरातुन जवळ पाहिले,
तुझा श्वास माझ्यासवे जोडतो ।
तुझ्या सोबतीची नशा आगळी,
तुझ्या स्पंदनांची नवी साखळी,
नव्याने तुझी प्रीत सांभाळतो ।-
वागणुकीतील अर्थ सारे सहज बदलतात दिवसेंदिवस,
आपुलकीची हाकही आता होते परकी दिवसेंदिवस !!
दोन अक्षरांची ती व्याख्या सहज बदलते आपणहूनी,
मग मैत्री असो वा प्रेमाची ती वाट चुकते आपणहूनी !!-
विचार होता,तु मला ओळखलस कि लिहीन कडवी तुला...
लिहिलेल्या शब्दांच्याही पलीकडल्या जगात वदलो होतो तुला...
कळले तेव्हा धक्का बसला, विचारांचा रस्ताच चुकला...
तोच, सरळ रस्ता होता खरा, पण एका अनवाण्याने पकडलेला...
क्रमशः...-
नक्कीच मनात हसली असशील जेव्हा वाचली कडवी माझी...
त्याच हास्यात परत एकदा उमलली असशील कोवळ्या गुलाबा सारखी...
नक्कीच आले असतील शब्द तोंडी पण मनात तेच राहिले असतील...
क्रमशः..
-
बरकतों में कौनसी हासिल हुई है जिन्दगी,
हर बहारों में कभी मुरझा चुकी है जिन्दगी ।-
स्तब्ध झाला खेळ सारा हीच तळमळ वाटते,
जाणिवेला खोल माझ्या आज हळहळ वाटते !
शोधण्याचा ध्यास होता माणसाला कालच्या,
त्यास साक्षी कोण होता, व्यर्थ चळवळ वाटते !
बंदुकीचा चाप सुद्धा खेचणारा संपला,
गंजलेल्या बंदुकीला एक कळकळ वाटते !
गाठल्यावर स्वप्न त्यांना खेळ वाटू लागले,
त्याच वाटा शोधताना शुद्ध खळखळ वाटते !
मोडले मी खेळ त्यांचे लेखणीने सारखे,
कोण हरले कोण विजयी, फार खळबळ वाटते !-
कितीदा नव्याने तुझी वाट पाहू,
कितीदा चुकांचे जुने पान वाचू ।
अशी कोणती चूक माझी कळेना,
सजा जाणिवेची अता साहवेना;
कितीदा स्वतःहून शून्यात राहू ।
कितीदा चुकांचे जुने पान वाचू ।।
कितीदा मुके भाव दाटून आले,
कितीदा कुणी धीर देऊन गेले;
कितीदा रिते पान फाडून काढू ।
कितीदा चुकांचे जुने पान वाचू ।।
अकस्मात सारे पुढे स्तब्ध झाले,
दुवे ओळखीचे जणू शून्य झाले;
कितीदा तुझ्या आरश्याला विचारू ।
कितीदा चुकांचे जुने पान वाचू ।।-
जिन्दगीभर जिन किताबों का सहारा मिल गया,
बस उन्ही के फैसलों से मैं कयामत बन गया !-
" नाते "
कलेकलेने बदलत जाते हरेक नाते,
क्षणात असते क्षणात नसते सुरेख नाते।
उनाड गप्पा तशाच उरतात सांजवेळी,
जुनेच माझे तुझे कशाला उनाडवेळी,
सहजच बोलुन पहा पुन्हा सापडेल नाते।
अनेकदा ते उगाच भांडण नसेल झाले,
चुका कुणाच्या कळून त्यावर हसून झाले,
तरी अश्या भांडणात शिल्लक असेल नाते।
नको कुणाला कधीच सांगू चुका कुणाच्या,
खुशाल अवचित कळोत वाटा तुझ्या मनाच्या,
हळूहळू मग तुलाच उमजेल एक नाते।-