दादा वर मुली मरतात ,
दादाही मुलींवर लाईन मारतो..
दादा सर्व मुलींबरोबर flirt करतो.
पण दादाला खरं प्रेम सापडत नाही..
दादा सतत मुलींच्या घोळक्यात असतो,
आणि दादा त्यांना मिरवत असतो...
दादा मुलींना त्यांच्या सुंदरतेवरून judge करतो,
दादा फक्त सुंदर मुलींनाच निवडतो..
एखाद्या मुलीबरोबर जमलं नाही
तर दादा शिवीगाळ करतो..
पण दादा स्वतःच्या बहिणीची मात्र,
खूप Respect करतो..
असं कसं चालेल दादा ???-
Follow this page..
कधी कधी वाटतं व्यक्त व्हावं ,
पण कोणीतरी जवळ असावं..
नसते साथ कोणाची जेव्हा ,
होतात गप्पा मनाशी तेव्हा..
ऐकू येतो आतला आवाज ,
जो फक्त खरंच बोलतो..
इतरांच्या विचारांना ,
स्वतःच्या विचारांशी तोलतो..
कठीण प्रसंगी,
साथ देतो आतला आवाज..
घेतलेल्या निर्णयावर,
आनंद देतो आतला आवाज..-
Well what can I say about you, u always made me speechless 😂. Once wise man said u can't win against woman it's true actually whether it is ur mother , sisters , frnd or wife. You have to give up in front of dem.. frankly speaking from my personal observation men never give up they just take a back Step just for making strong bonding in every relationship. In our frndships we do this in a different way. We both always take a backstep 😂 .Everyone has a frnd who always stays with you , argued with u , don't talk fr some days but deep inside dey both knows it's not easy to brk such a strong frndship. In my life you r one of my such frnd . who always stand besides me , argue with me and supportive as well.. on this day I wish you huge amount of happiness and success in ur life.. Stay blessed...
-
भावाबहिणींच साटंलोटं हे चालूच असतं ,
एकमेकांच्या चुकांच पांघरून एकमेकांनी झाकायचं असतं..
-
प्रिय देवयानी उर्फ Deu ,
पत्रास कारण कि आज तुझा वाढदिवस . हो हे Digital पत्र आहे . उगाच हसण्याचा कारण नाही सध्या च्या परिस्थितीत हाच एक उत्तम मार्ग मला मिळाला तुला पत्र TYPE करण्याचा आणि हेच गोड़ मानून घे . मला आठवतंय तू म्हणाली होतीस कि दादा , हल्ली पत्रव्यवहार फारच कमी झालेत सध्या पत्र लिहावं असा काही उरलं नाही . CALL आणि WHATSAPP वर बरीच कामं होतात . यावर आपलं ठरलं होतं कि पत्रव्यवहार चालू झाला पाहिजे आणि मी तेच करतोय बरं .आज योग आला . एवढंच कि लिहिण्याऐवजी Type करतोय. खरं तर आपल्या आयुष्यात अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मिळाल्या कि खूप आनंद होतो ,बऱ्याच वेळा आपल्या लक्षात हि नाही येत अशा काही गोष्टी .जसं कि मी तुला परवाच बोललो आपल्याला मोठ्या गोष्टी हाताळताना लहान गोष्टींकडे दुर्लक्ष होता कामा नये. आनंदाचे सूर सर्विकडे ऐकायला मिळतात , फक्त ते शोधणं आणि आपण ते ऐकत राहावं एवढंच . दुःख तर सर्वांच्याच वाटेला असतात रे तिथे जाण्याची वाट कोणाचीच कधीच चुकत नाही त्या वाटेवर फार काळ थांबणं हे मात्र नक्कीच टाळावं ,असो तुला कळलंच असेल मी काय म्हणतोय , खूपच सात्विक होतंय ना ? पण कर आता सहन नेहमीसारखंच .आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धाकटी . उदंड आयुष्य लाभो . दात दाखवत राह i mean हसत रहा...
तुझा दादा...-
Dear neha ,
सालाबादप्रमाणे आजच्या दिवशी ही आपली भेट चुकणार
हे माहीत होतंच आणि यावर्षीचं कारण तर संपूर्ण जगाला माहीत आहे..😂 मुळात भेट होणं आणि नाही होणं यापेक्षा आपल्यामध्ये असणारी Bonding मला खूप महत्तावची वाटते..कधीतरीच होणारी भेट ही आपल्यासाठी काही नवीन अशी नसते हे खरंतर मैत्रीत खूप महत्त्वाचं असतं. Bonding strong राहीली की दोन माणसांमधलं अंतर खूप महत्त्वाचं नसतं , महत्त्वाचं असतं ते म्हणजे नात्यांमधली आपुलकी , प्रेम आणि विश्वास...आणि तो आपल्यात आहे याचा आनंद नेहमीच मला आहे (fingercrossed).मैत्रीतल्या दुराव्याची चव ही आपण कधीच जाणली नाही हे मात्र तेवढंच खरं...असो तुला तुझ्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..यशवंत हो , किर्तीवंत हो...-
Apne spano ko man main lekar udaan bhar tu,
Safalata teri rah dekh rahin hain...-
खरा आनंद तर
दोन व्यक्तींमध्ये होणाऱ्या संवादात असतो.
जिथे दोन्ही बाजूने एकमेकांचं ऐकून घेतलं जातं आणि समजूतदारपणाच्या चहाची चुस्की घेतली जाते.
झालेल्या चुकांचं निरसन होतं असलेल्या अडचणींवर तोडगा काढला जातो. तुझ्या आनंदातच माझं सुख आणि तुझ्या दुःखाचे वाटेकरी दोघे असा भाव जिथे असतो अशा नात्यात कधीच दुऱ्याव्याची भीती नसते..-
आपलं रोजचं धावपळीचं जगणं किती मस्त होतं.
आत्ता आलेल्या संकटामुळे घरी बसावं लागतंय तेव्हा त्या व्यस्त वेळापत्रकाची सुंदर जाणीव होते..घरी बसलो तरी मन भिरभिरतय ,मनाला काही शांतता मिळत नाही ते फक्त आठवणींच्या तळ्यात डुबकी घेतंय अगदी रोज.. आठवण सकाळच्या घाईगडबीची , आठवण ऑफिस मधल्या कामाची आणि सहकार्याची त्यातही अगदी हवी हवी आठवण म्हणजे शनिवार-रविवार सुट्टीची...सर्व काही हरवून गेल्यासारखं वाटतंय , मान्य आहे हे कायमचे निघून गेलेलं नाही आहे पण तरीही मनाच्या कोपऱ्यात या सर्वांची गर्दी लुडबुड करत असते..-
जिथे भावनांचा उद्रेक होतोय आणि अश्रु वाहत आहेत..
त्यांच्या किंचाळण्याला कोणी ओ देत नव्हतं आणि जिवंत असण्याला कोणी मानत नव्हतं. तिथे श्रीमंतांच्या ताटात पंचपक्वाणं होती आणि त्यांच्या हातात राखेतून काढलेलं नाणं...आयुष्यभर खुप सहन केलं आणि म्हणे सहन करण्याला मर्यादा असतात पण मर्यादाचं उल्लंघन करावं लागतं ,पर्याय नाही.. त्याने म्हंटलं पुढचा जन्म श्रीमंताकडे व्हावा फक्त मनाची श्रीमंती पुरेशी नाही असं म्हणतात...-