प्रेमाच्या नावावर
काळा बाजार चाललाय
भावनांच्या बदल्यात
देहाचा व्यापार चाललाय-
anu lekh
(© अनु_लेख)
144 Followers · 89 Following
मराठी मुलगी💛
Joined 14 June 2018
16 APR 2020 AT 21:23
10 APR 2020 AT 19:25
ओले चांदणे ,स्पर्श हळवे
देशील ना ?
गांधर्व राग ,तुझा अनुराग
मिळेल ना ?
छळे गार वारे ,स्मृतींचे शहारे
कळणार ना ?
दिसे चंद्र फिके ,सर्व धुके धुके
तुझ्याविना !-
8 APR 2020 AT 9:33
नियातिवर माझा विश्वास आहे
पण
काही गोष्टी आपल्या दृढ इच्छाशक्तीने
बदलता येतात.-
25 MAR 2020 AT 19:21
बंधन न घालता सोडून न जाणारे ते
प्रेम !
अन् सोडून जाऊ नये म्हणून घातलेलं बंधन
म्हणजे संबंध किंवा लग्न !-
25 MAR 2020 AT 17:27
जेव्हा तुम्हाला आयुष्यात
स्थिर व्हायचं असतं
तेव्हा चुकूनही अस्थिर व्यक्तीशी
स्वतः ची सांगड घालून घेऊ नका .
-
25 MAR 2020 AT 17:20
आयुष्यात काही क्षण असे येतात
जेव्हा समजावून सांगणारा नाही
तर समजून घेणारा हवा असतो .-
25 MAR 2020 AT 16:06
कुणाचं डोकं कुठं चालेल
आणि मनाचा तोल कुठं हालेल
हे कुणालाच सांगता येत नाही !-