सूर्याच्या बागेत बागळतयं,
चंद्राचा माथेवर टिळा,
बोटांत गुंतलय चांदणं,
गालांवर स्मित वेगळा !
प्रयत्नांची पराकाष्ठा झालियं,
हर्ष उल्हास क्षितिजाला,
परंतु दुखावलिय ती,
होऊन बळी अपयशाला !
करतंय विचार नव्या संधीचा,
एक लोटावणं अपयशाला,
इथेच ती जिंकतीये,
नकारात्मकता लावून धुळीला !-
तिच्या प्रेमात पार रडतो,
अश्रूंनी डोळे सुजवितो,
आयुष्य तिच्यासाठीच जगतो,
तरीही तिच्या नजरे आड तो !
जीवन संगिनी मिळाली म्हणतो,
जिच्या सहवासात नवा तो जाणतो,
गैर हजेरित जिच्या कासाविस होतो,
तरीही तिच्या नजरे आड तो !
होती घट्ट मैत्रीची डोर त्यांची,
त्यात प्रेमाची गाठ तो पडतो,
सुंदरतेच्या पलीकडे प्रेम जो करतो,
म्हणूनच तिच्या नजरे आड तो !
प्रेमात पडून चुकलाय तो,
जीवघेणी विष घेतोय तो,
जर का ती परत नाही आली ........-
गोष्ट त्याची,
प्रभाव पडावा माझ्यावर !
झुंज त्याची,
लढायला मला शिकवावं रणांगणावर !
जिद्द त्याची,
चिकाटी माझी वाढावी कामावर !
दुःख त्याचं,
अश्रू माझे घरंगळावे गालावर !
प्रेम त्याचं,
विश्वास माझा वाढावा प्रेमावर !
मनाच्या कठोरतेला पाघळून लावणारं ते काल्पनिक पात्र !!!-
मैत्री उंबरठ्यावर ची, दारा पार न गेली,
आकाशातील तारे, अनगणीत मोजत राहिली !
आकशातील शुक्रतारा, आयुष्यातही लाभला,
वेळेचं डाव खेळताचं, आभाळाखाली तो ही लपला !-
Chahe kitani bhi jagdo jahed karlo,
Kuch na kuch to chhutega !
Jaha ho vahi ka maja lo,
Kabhi na kabhi to koi sitara tutega !-
समुद्राच्या लाटांना बघून विचार एक यायचा,
अनगणीत लाटासोबत कसा हा एकजुटीने राहायचा !
माणसांच्या अफाट समुद्रात, जणू काही स्त्रीया आम्ही लाटाच,
कुणाच्या सोबतीने अख्खा आकाश बघायचो,
तर कुणी आपली हवस पूर्ण करून किनाऱ्यावर पटकायचा !-
रात्री आईचे दोन शब्द ऐकून, झोप मोठी गोड लागते,
बाहेरच्या दुनियेत या शब्दाचं कुठेही तोड नसते !
प्रेमाचे दोन शब्द जीवन जगण्यात मदत करते,
तर कधी, यांच्यायच अनुपस्थिती ने दोघांच्या दुरव्यात भर पडते !-
मैत्री कशी नकळत झाली,
प्रत्येक गोष्टीत साम्यता आढळली !
तेवढंच नकळत परकं केलास,
मैत्रीत कोणती उणीव राहिली ?-
कुणासाठी दडपण,
कुणाला मिळालेली आणखी एक संधी,
कुणाला हवं असतं भलं मोठं आयुष्य,
कुणाला दोन श्वास आणखी !-