नमस्कार न करताही..
आशिर्वाद देणारी व्यक्ती म्हणजे
"आई "-
ऊन लाही
या अंगाची ।
देते छाया
पदराची ।
भुक तिला
त्या कष्टाची ।
पोर हसु
बघण्याची ।
किमया त्या
आसवाची ।
भुक मीटे
लेकराची ।
निरपेक्ष
जीवनाची ।
ती शिदोरी
आयुष्याची ।
-
मुझको, जगाये जा रही है
दूर है जो यार,
उसकी याद दिला रही है
जिस्म मेरा यहाँ, पर दिल तो
तेरे पास,जुबां ए दिल की आवाज
मुझको सुना रही है,
लौट कर आएगा वो,
गया जो मुसाफिर, उम्मीदों का दिया,
दिल में जला रही है,
बुना था, जो ख्वाब हम दोनों ने मिलकर
उस ख्वाब का कम्बल , फिर से उढ़ा रही है !
-
माय मराठी
माझ्या मराठी मातीत
शब्द पिक अंकुरते
रानोमाळी ती फुलते
रास शब्दांची भरते...
कधी बोलते वृत्तात
कधी अंलकारी होते
ओव्या भारुडे मांडते
किर्ती अभंगात गाते...
घेते निसर्ग कुशीत
पान,फुलांशी बोलते
शब्द सरीत भिजते
प्रेम सागरी डुंबते...
वाणी तुकोबांची होते
वेद ज्ञानाचे वदते
भाव मनीचे खोलते
अंतराचे दुःख नेते...
गोडी मराठी मायेची
माणूसकी ही जपते
वाट प्रेमाची दाविते
मान मराठीस देते.....
-
माय माझी मराठी
मला मिळाले मांगल्य
मनामनात मराठी
मग मानते महासाफल्य
महिमा माझ्या मराठीचा
मन मिरवते मोठेपणा
मिळतो मान माझ्या मराठीचा
मंतरला मनात मायपणा
मी मिसळली मनामनात
मीठभाकर मायेची
मांगल्याची मंगल मूर्ती
माय मोठी ममतेची
महाराष्ट्र माझी मायभूमी
म्हणे मराठीत मोठा मेवा
माझ्या मराठी मायेचा
मितभाषी म्हणूनच मिरवा
-
,वो आज मुझे, नजाने क्यों?
इससे पहले तो, इस कदर
देखा नहीं था नजाने क्यों
बदले हुए, अंदाज़,
लगता है कोई राज
छुपाया, है मुझसे आज,
लगता, है नजाने kyo?
मैं तुम्हारी ज़िन्दगी, मुझसे
जुडी हर ख़ुशी, फिर छोड़ अपना आशिया
दूर जाके दिल को बहलाने लगे क्यों?
भर ना सके,अपने दिए जख्म को मेरे, किसी और के
जख्मों, पे मरहम लगाने लगे kyo?
फुरसत में रह के भी, जो ना कहीं हमसे, आज
व्यस्तता, में भी सबसे वो, फरमाने लगे क्यों?
मिलाते हो नज़रे, हमराही राह गुजर,
फिर मुझसे, अपनी ऑंखें चुराने लगे हो क्यों?
खामोश, क्यों हो इतने, के बोलते नहीं
राज दिल के अपने तुम खोलते नहीं,
चुप्पी तेरी जुबां पे लटकी हुई है kyo?
-
मराठी असे अमुची मायबोली,
आज अचानक साऱ्यांनाच तिची आठवण झाली...
शुभेच्छा, संदेश पाठवून ही झाले...
वेलांटी, स्वल्प, पूर्णविराम कसेतरी आठवून दिले...
का आपल्यावर इतुके वाईट दिवस आले...
प्रगती जरूर करा स्वतःची,
पण लाज नका ना बाळगू , मराठी भाषेची
अभिमानाने मिरवण्याइतकी,
अवीट गोडी आहे तिची...
का करत आहात एका दिवसाचे दिखावे फक्त,
आहे थोडेसे कटू , थोडेसे सत्य....
-
गोडवा अमृता परी त्यात
फुंकर प्रेमाची , हुकांर युद्धाचा
अभिमान असे आम्हास तुझाच
उपकार तुझे थोर
दिले आम्हास ज्ञाना , शिवबा , तुका माऊली
भाग्य लाभले आम्हास
म्हणुनी मुखातून निघे मराठी
चंदनापरी गंध तुझा
दरवळतो सातासमुद्रापार
झेप घेण्या मिळे बळ
असे जेव्हा तुझे बोल पाठी
मराठी असे आमची मायबोली
गोडवा अमृता परी त्यात-
माय मराठी मायबोली
किती मी गुणगान करू
साऱ्यांचीच असे ती बोली
म्हणूनच तिची कास धरू
महाराष्ट्र माझा रांगडा
तयाला मुजरा मराठीचा
मायबोली मराठीचा पगडा
मान करू त्या मराठीचा
ओव्या ,कीर्तने,अभंग
काय नसे मराठीत
नाते त्यांचे आहे अभंग
रुजलीत मूल्ये या भाषेत
कितीही गा गोडवे
त्या पाश्चात्य भाषेचे
नाही ओ दिमाख
माझ्या मराठी परी कोणाचे
मायबोली माझी मराठी
हीच खरी आत्मीयता
नको सोडू तिचा हात
हीच असे तुमची नम्रता
-
माय मराठी भाषा अमुची | जोडते नाळ हृदया हृदयाची |
जिथे वस्ती साऱ्यांची | ती मायबोली आमची |
ज्ञानीयाची ज्ञानेश्वरी | जगते सर्वांच्या अंतरी|
लीन परमेश्वरी| माझी माय मराठी|
घेऊन भक्तीचे मृदंग| ईश्वरात होतो दंग|
चराचरात पांडुरंग| इथे वसे|
संपविले पारतंत्र्याचे साम्राज्य | आमचे महाराष्ट्र राज्य|
जिथे शिवबांचे स्वराज्य | मराठीचे असे|
ना कुणी असे दिन | ना कुणी भक्तिविन |
सारेच नयन| पाहते मराठी इथे |
दलितांना सन्मान | समाजातील स्थान |
पसरविले सर्वत्र ज्ञान | माय मराठीचे |
आम्ही बोलतो मराठी | आम्ही जगतो मराठी |
आम्ही मरतो मराठी | आम्हीच माय मराठी |-