माय मराठीचा टिळा
प्रत्येकाच्या भाळी शोभे माय मराठीचा टिळा
ओवी,भारूडास तिने लावलाय खूप लळा
तिच्या अंगाखांद्यावर नाचतात झाडं वेली
पशू,पक्षी,पानं,फूलं बोलतात तिची बोली
तिच्या मृदुल वाणीने होते स्वागत धरेचे
ऐकू येते राऊळात जेव्हा सूर आरतीचे
काना मात्रा वेलांटीचा तिने चढविला साज
अभिजात दर्जा याने दिला डोईवर ताज
वाक्प्रचार म्हणी यांनी तिचे सौंदर्य खुलते
वृत्त,अलंकार याची तिला भुरळ पडते
स्वर व्यंजना संगती अक्षरांचे शब्द होती
शब्द जातीविना तिला येत नाही पुढे गती
किर्ती पोवाड्यात जेव्हा होते राजा शिवबाची
रोम रोमात भिनते गोडी माय मराठीची
लावणीचा बाज तिचा भारूडे ही तिची शान
उभ्या विश्वाला वाटतो मराठीचा अभिमान
आज हवे होते वि. वा. झाला असता आनंद
पर भाषा आजवरी झाली असती ना बंद
-
नव्या वर्षाचे नवे संकल्प
नव्या वर्षात मांडेन मी
प्रत्येकासाठी नवा डाव
अत्याचाराविरूध्द देईन
धारदार शब्दांचाच घाव
वाईट प्रवृत्तींना नसेल
येथे कधीही थारा
समाजातील अनिष्ट रूढींना
असेल शब्दांचाच मारा
व्यभिचार,भ्रष्टाचार
व्यसन मुक्ती विरोधात
बेटी बचाव बेटी पढाव
सांगेन मी माझ्याच शब्दात
वृक्षलागवड आणि संवर्धन
करेल पर्यावरणाचे जतन
प्लास्टिक वापर,स्रीभ्रूण हत्या
सारेच याचे करू या पतन
बालमनावर संस्कारांनी
माणुसकीचे बीज पेरेन
गुणवत्तेशी जोडून नाते
प्रगतीचे पंंख तयात भरेन
@सौ.जया नेरे
-
कहूँ कैसे की ये खता है हमारी
उन्ही से सब कुछ बोलना तो सिखा है
यही समझो की माँ सिता है हमारी
-
दिवाळी
कोणा घरी दिव्यांनी सजते खरी दिवाळी
कोणा घरी जिवाशी लढते खरी दिवाळी
जाळून ती स्वतःला घरभर प्रकाश देते
तेव्हा कुठे जगाला कळते खरी दिवाळी
कळला कुठे कुणाला आवाज स्री मनाचा
दुर्भाग्य हेच म्हणुनी रडते खरी दिवाळी
धनवान कोण येथे कोणा घरी गरीबी
पोटात अन्न नसता जळते खरी दिवाळी
दुःखी मनास जेव्हा समजून घेत असतो
ते प्रेम भाव त्यांचे स्मरते खरी दिवाळी
थोरास मानणारी ही संस्कृती कळावी
प्रत्येक घरात म्हणुनी असते खरी दिवाळी
दारिद्र्य दूर होवो राहो सुखात सारे
सर्वास सांगण्या हे घडते खरी दिवाळी
सौ. जया नेरे
-
जाळून ती स्वतःला घरभर प्रकाश देते
तेव्हा कुठे जगाला कळते खरी दिवाळी
कळला कुठे कुणाला आवाज स्री मनाचा
दुर्भाग्य हेच म्हणुनी रडते खरी दिवाळी
धनवान कोण येथे कोणा घरी गरीबी
पोटात अन्न नसता जळते खरी दिवाळी-
हातात लेखनी अन् जग जिंकण्या निघाला
एकेक शब्द त्यांचा उद्धारण्या निघाला-
कविता जपते निसर्ग सारा
ऊन सावली पहाट वारा
ओवी,भारुड,अंगाई अन्
भजन,किर्तनी तिचा पसारा-