QUOTES ON #महागाई

#महागाई quotes

Trending | Latest
4 APR 2022 AT 17:44

सोसवेना जीवा,
संसाराचा भार.
झाले असह्य जगणे
वाटे जीवनाची हार.

काय गुन्हा गरीबांचा,
नाही सुख पदरात.
भाव भिडे गगनाला,
दैन्यावस्था ही घरात.

दिस येती अन् जाती,
नेता किती बदलती.
बदल्यात मतांच्या ते
फक्त आश्वासने देती.

झाले महाग जगणे,
स्वस्त आज मरण.
जीतेपणी मेला देह,
वाट पाहते सरण.

वाढे रोज महागाई,
देह जाळ्यात फसणे.
नको दुर्दशा नशीबी,
ऐसे जगणे उसणे.
शीतल विशाल यादव





— % &

-


25 JAN 2022 AT 12:03

३६५ दिवस कोट २४

दीड दमडीची किंमत आजच्या युगात नाममात्र वाटते. आजचं वर्तमान महाग वाटत. स्वस्त वस्तूंना कुठे आपण भाव देतो. जोवर उणीव भासत नाही तोवर आपण वस्तूंची कदर करत नाही. आणि जेव्हा, आपण स्वतः कमावतो तेव्हा आपल्याला कष्ट नावाची व्याख्या उमजते. जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे महाग असल्यासारखी. कारण तेव्हा काही स्वप्न अजून महाग होतात.

-


6 JUL 2021 AT 13:37

अरे वेड्या अंधभक्ता ! तुला एवढं कसं कळत नाही.
देशभक्ती आणि महागाईचा काडीचाही संबंध नाही.

-


12 JUN 2021 AT 17:44

तू भासवतो आहे
तसा आहे तरी कुठे
समस्यांचे आजवरी
कोणी केले मग साठे
भिडले गगनाला भाव
झाले पोटाचे ओझे
सांग याला कामगार
जबाबदार कसे
हल्ली तू बोलत नाही
स्वदेशी मुद्यावर
ही जनता तुला
नाही का मूर्ख वाटे
आकाशही विकशील
तू गारा पावसा-सह
तुझ्या धोरण नीतीचा
हाच परिपाक भासे....

-


16 AUG 2022 AT 19:18

राब राबतो तरी पैसा काही पुरत नाही,,,
भरतय पोट कसं तरी शिल्लक काही उरत नाही,,,
काय म्हणे तेलानं तर दीड शतक पार केलंय,,
गॅस ही आता तर हजाराच्या पंक्तीत गेलय,,,
बाजाराच्या पिशवीच पाचशात पोट भरत नाही,,
भरतय पोट कसं तरी शिल्लक काही उरत नाही,,,
डिझेल, पेट्रोल चा आकडा आता सव्वाशेच्या वर गेलाय,,,
बायको वागवणं सोप्पं ,गाडी वागवणं जड झालंय,,
शंभरच तर आता एका चेकरीला पुरत नाही,,
भरतय पोट कसं तरी शिल्लक काही उरत नाही,,,
कॉलेजच्या पोरांनीही लॉंग ड्राईव्हच स्वप्न पायनं बंद केलं,,
काय त म्हणे पेट्रोल डिझेल लयचं महाग झालं,,
रोजगाराच्या संधीनं कमी बेरोजगारी जास्त वाढत आहे,,
माय मणी डोरलं गहाण ठेऊन लेकाचे दिवस काढत आहे,,
डिग्री, डी.एड.,बी.एड सारं शिकून झालं काम धंदा मिळत नाही,,
भरतय पोट कसं तरी शिल्लक काही उरत नाही,,,
अवघड झालं लेका आता गरीबाचं जिनं,,
नाही भेटत कधी कधी त्यायले दोन टाईम च खाणं,,
श्रीमंतांच्या या दुनियेत उपासमारी सरत नाही,,
भरतय पोट कसं तरी शिल्लक काही उरत नाही,,,
अशीच जर का हरएक गोष्टीत राजा महागाई होत गेली,,
तर सांग न राजा कश्या पेटतील गोरगरिबांच्या घरी चुली,,,
आग ती विझल्याशिवाय पोटाची भुक ती काही मरत नाही,,
भरतय पोट कसं तरी शिल्लक काही उरत नाही,,,
सरकार कोणाचं भी येऊ दे तुया रड गाण्याचा त्यायले फरक पडत नाही,,,
तुया एकटायच्या मतावाचून त्यायचं काही अडत नाही,,

-


1 MAY 2022 AT 6:33

पेट्रोल डिझेल प्रदूषण
महागाई बेरोजगारी
हे मुद्दे महत्त्वाचे राहिले बाजूला.
मशीदीवरील भोंगे दिसले,
फक्त अजान टोचली
आमच्या मुंबईच्या राजूला.

-


20 DEC 2018 AT 6:30

उतरेना कर्ज डोक्यावरचं,वाढता वाढे महागाई,,
बळीराजा गेला घाबरुन,केली मरणाची घाई,,

-


25 AUG 2022 AT 20:55

महागाईचा दर पेपर मध्ये किंवा न्यूज चॅनेल मध्ये दाखवत आहेत ७-८% परंतु जर तुम्ही नीट हिशेब ठेवत असाल तर लक्षात येईल गेल्या वर्षी जो किराणा माल १०००० ला येत होता तो आता ११५०० ला येतोय. म्हणजेच १५% महागाई आहे...

यासाठीच गुंतवणूक आणि बचत यातील फरक समजून घ्या आणि म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करा.....!

-


7 JUL 2021 AT 12:11

यांस अभिमानाची गोष्ट समजणे ही चुक आहे.
तर महागाई म्हणजे सरकारी लुबाडणूक आहे.

-