RAVINDRA SARKATE  
6 Followers · 11 Following

Joined 10 December 2021


Joined 10 December 2021
YESTERDAY AT 14:45

अण्णाभाऊ साठे होते महान समाजसुधारक...!
व्यथित करायचे त्यांना सामाजिक चित्र विदारक...!!
महान लोकशाहीर विचारवंत लेखक अन् होते कीर्तिवंत कवी...!
त्यांच्या साहित्याने देशासह जगाला दिली दिशा नवी...!!
उपेक्षित घटकांच्या प्रति मनात होती प्रचंड तळमळ...!
लोकमाणसात रुजवली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ...!!
लेखणीने घेतला त्यांच्या अस्पृश वंचितांच्या अंतरंगाचा वेध...!
कधीही मान्य केला नाही त्यांनी सामाजिक भेद...!!
समाजात दूजाभाव फोफावला होता स्वैर...!
अण्णाच्या लेखणीने संपविले समाजातील वैर...!!
दारिद्रय भेदभाव या दाहकतेत उपेक्षित माणसं भाजली...!
पोटासाठी संघर्ष या विषयाची फकिरा कादंबरी त्यांची भयंकर गाजली...!!
त्यांच्यावर होता आंबेडकरवादी विचारांचा पगडा...!
वाईट प्रवृत्ती अन् शक्तीच्या विरोधात लेखणीचा झगडा...!!
त्यांनी पाहिले आणि भोगले प्रचंड यत्न...!
लेखणीच्या संघर्षातून झाले साहित्यरत्न...!!

-


30 JUL AT 20:30

एका माणसाने नेट टाकून मासा पकडला...!
दोन्ही हाताने पकडून जोरदार तो जखडला...!!
भयंकर चिडला मासा करू लागला त्रागा...!
म्हणाला जरा तरी राव माणसासारखे वागा...!!
म्हणाला हे मूर्ख माणसा करू नको रे पाप...!
ऐक जरा तू देतो मी तुला भयंकर शाप...!!
आज या नेट च्या मदतीने मला धरशील...!
पण एक दिवस तू नेट मध्येच अडकून मरशील...!!
तडफडायला भविष्यात तू नेट असेल कारण...!
डोळ्याचे मेंदूचे असे विकार शरीर करेल धारण...!!
आणि खरंच आज माणूस नेट मध्ये अडकलाय जाम...!
वेडा झालाय पुरता सुचत नाही त्याला दुसरे काम...!!
माहीत नाही माशाचे शाप आहेत की नाही हे खरं...!
पण माणूस मात्र नेट मध्ये अडकलाय आहे बरं...!!

-


28 JUL AT 6:16

नवरा म्हणाला चल योगाला जाऊ काढतो मी गाडी...!
बायको क्षणात बोलली म्हणजे मी तुम्हाला दिसते का हो जाडी...!!
तो म्हणाला अगं तसं नाही बाई योगा असतो छान...!
ती म्हणाली म्हणजे मला नाही का आरोग्याचे भान...!!
तो म्हणाला बघ ना किती फिट दिसतात शेजारी...!
ती रागातच म्हणजे मी दिसते का तुम्हाला आजारी...!!
तो उठायचं असेल तर उठ बंद कर ग ताणायचं...!
ती लगेच म्हणजे मी आळशी असं आहे का म्हणायचं...!!
तो रडवलेला मी गंभीर आहे करत नाही नक्कल...!
ती जोशात म्हणजे मलाच नाही का हो अक्कल...!!
तो म्हणाला मूर्खपणा आहे करणं तुझा नाद...!
ती त्वेषाने म्हणजे मीच घालते का नेहमी वाद...!!
तो विनवणी करत हळू बोल सगळीकडे होतोय प्रचार...!
ती म्हणाली बायकोच्या आरोग्याचा का कराल विचार...!!
अळीमिळी गुपचिळी केली बिचाऱ्याने हात जोडून...!
सांगा बरं नवऱ्याने बायकोसमोर घ्यावं का डोकं फोडून...!!
सकाळचा योगा शाब्दिक चकमकीतच गेला वाहून...!
प्रेमाने गरमा गरम चहा ब्रेड आली ती नवऱ्यासाठी घेऊन...!!
अहो काळजी आहे मला तुमच्या माझ्या आरोग्याची...!
सतत प्रेम करत राहा माझ्यावर काय गरज योगाची...!!

-


27 JUL AT 11:16

वृद्धाश्रमातून एका कृतघ्न मुलाला आला फोन...!
म्हणाले भेटायला या तुमच्या आईचे दिवस राहिले दोन...!
त्या म्हणतात इच्छा आहे मुलाला डोळेभरून बघायची...!
त्याला बघितल्याशिवाय माझी चिता पण नाही पेटवायची...!!
भावूक झाला तो गेला लगेच वृद्धाश्रमात धावून...!
आनंदी झाली आई आपल्या लेकराला पाहून...!!
म्हणाली लेकरा माझा जवळ आला आहे रे अंत...!
नाही माझी तक्रार नाही मला कसलीच खंत...!!
इच्छा पुरी कर एकच माझी जी आहे माझ्या मनी...!
मी निघाले आता वाट बघत आहेत माझे धनी...!!
बांगड्या विकून माझ्या वृद्धाश्रमाला दे पंखे भेट...!
माझ्या सारख्या पिडीतांना त्याचा उपयोग होईल थेट...!!
तुझं लेकरूही तुला जेव्हा इथं पाठविल न बाळगता नरमी...!
खरंच बाळा तुला सहन होणार नाही इथली गरमी...!!
तुझी काळजी वाटते ते माझ्या हळव्या मनाला...!
उकाड्याने तडपशील त्या भयंकर क्षणाला...!!
काळजी घे बाळा म्हणत आईने डोळे मिटले...!
धाय मोकलून रडत लेकराने कपाळ पिटले...!!

-


23 JUL AT 0:04

---पत्राची दुसरी बाजू----
तुला कॅम्प च्या दरवाज्यात सोडतांना खूप हिम्मत देतोय तुझा बाप...!
ठेऊन तुझ्या पाठीवर विश्र्वासाची आपुलकीची थाप...!!
डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यातचं गिळतो...!
सावरून तुझ्या आईला गपगुमानं माघारी फिरतो...!!
अनेकांना पत्र पोहचविणारा तुझा बाप तुला पत्र पाठवताना अंतःकरणातून दाटला आहे...!
एकांतात आलीच तुझी आठवण तर आतून फाटला आहे...!!
आज घरात ते दोघेजण अभावात तुझ्या वावरतात...!
येईल लांब सुटीवर म्हणून एकमेकांना सावरतात...!!
तिची माया त्या दर रविवारी होणाऱ्या पंधरा मिनिटाच्या संवादात अधिक घट्ट होते...!
कुरवाळत तुझे केस बाळा तुला पंधरा मिनिटांसाठी मांडीवर घेते...!!
मोबाईल स्क्रीन चा लाईट प्रकाशित करून तुझा डीपी एकांतात तो न्याहाळतो...!
येताच आठवण एखाद्या प्रसंगाची स्वतःतच गोंधळतो...!!
सोप्पं नाही रे बाळ एकुलता एक मुलगा शिक्षणासाठी कमी वयात दूर ठिकाणी पाठवणं...!
जेवण,मित्र,शिक्षक,वातावरण अशी सगळी काळजी मनात साठवणं...!!
एरवी खूप बोलणारा तुझा बाप अबोल होतोय...!!
ठेवून समर्पण भावना देशसेवेसाठी हो तयार ऐवढे दोन शब्द लिहून तुझा निरोप घेतोय...!!

Miss U Khup Bala

-


22 JUL AT 23:50

----पत्राची एक बाजू-----
बेटा आज पत्र लिहित आहे तुला तुझा हा बाप...!
द्वेष अहंकार टाळून मन ठेव स्वच्छ अन् साफ...!!
बाप बेटा असलो तरी आपण आहोत मित्र...!
रंगत जावो जन्मोजन्मी आपल्या दोस्तीचे चित्र...!!
बेटा स्वयंप्रकाशित बनव तू तुझे व्यक्तिमत्व...!
सत्य तटस्थ समाजहिताची असू दे तुझी तत्व...!!
गरजेचं आहे तुला तुझं सर्वांगीण शिक्षण...!
तेच करेल तुझ्या अस्तित्व व प्रतिष्ठतेचं रक्षण...!!
प्रतिष्ठा जप तू बाळा मिळत नाही ती गेल्यावर...!
सत्कर्म कुकर्म यांचे स्मरण केल्या जाते मेल्यावर...!!
ज्येष्ठ अन् श्रेष्ठांच्या प्रति जप आदर आणि भान...!
मेहनत मिळून देईल ध्रुवताऱ्या समान अढळ स्थान...!!
चुकूनही धरू नकोस मूर्ख अन् वाईटांची संगत...!
ज्ञानी आणि विद्वान लोकांशी असावी तुझी पंगत...!!
आपल्या गुरूशी करू नको कधीही द्रोह...!
कटाक्षाने टाळावे तू लोभ मत्सर अन् मोह...!!
अनुभवातून वृद्धिंगत कर तुझी निर्णय क्षमता...!
संकटे आलीस तरी खचू नकोस लढ तू न दमता...!!
आपल्या ध्येयावरून ढळू देऊ नकोस तुझी नजर...!
असह्य दुर्बल पीडितांच्या सेवेसाठी राहा हजर...!!

-


20 JUL AT 20:57

अरे सांगू नको मला तुझे नाव अन् आडनाव...!
स्व-नावे आधी एकतरी झाड लाव...!!
मातेसमान लाड करे तुझं एक एक झाड...!
जिवाला दादा तोची असे आधार वड...!!
अरे घालू नको झाडावरी आता घाव...!
स्व-नावे आधी एकतरी झाड लाव...!!
पाऊस पाडे तो प्रदूषण टाळे...!
तरू हेच तारु तो वृक्षदेव बोले...!!
हिरवाईने नटवू सारं शहर आणि गाव...!
स्व-नावे आधी एकतरी झाड लाव...!!
औद्योगिक करणाने कोंडतो श्वास...!
जंगल तोड लावी गळ्याला फास...!!
वृक्षारोपणाची आता तरी घे धाव...!
स्व-नावे आधी एकतरी झाड लाव...!!
घेऊनी रोप हाती मायेने लावू...!
पोटाच्या गोळ्या वाणी त्याला वाढवू...!!
झाड माणसाचे नाते खरोखर राव...!
स्व-नावे आधी एकतरी झाड लाव...!!

-


19 JUL AT 20:38

प्रत्येक महिन्यात दोन अक्षरी मैत्रीणला घाबरुन असते ती फक्त...!
कारण इतकेही स्वस्त नसतं सतत चार दिवस तिच्या शरीरातून वाहणारं रक्त...!!
वेदनेचे, विटाळाचे गप्प राहून झेलत असते असंख्य घाव...!
बोलणार तरी कशी कारण प्रत्येक घरात अनुभवते ना ती पुरुषी अहंभाव...!!
पुरुषाच्या रक्ताच्या अभिषेकाने प्रसन्न होणारा देव तिच्या रक्ताच्या दिवसात बाटतो...!
अन् डोळसपणे तिच्या वेदना पाहणारे आंधळे आम्ही आम्हाला आजही हा मुद्दा पटतो...!!
बरं चला मानलं तिच्या हातचंच तेवढं त्या चार दिवसात आपल्याला चालत नाही...!
तिही अजून घाबरते त्याविषयी चकार शब्द बोलत नाही...!!
तिचं काम चालते तिचं राबनं चालतं तिचं निस्वार्थी वागणं चालतं...!
पण चालत नाही तिची आपलेपणाने काळजी घेणं...!
अन् पोट दुखताना तिला फक्त चार दिवस आराम देणं...!!
कारण बायकोला ताईला आईला बाई म्हणून स्वीकारताना
माणूस म्हणून स्वीकारायचं राहून जातं...!
अन् प्रत्येक महिन्यात तिच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्तात आमचं माणूसपणही वाहून जातं...!!
जेव्हा केव्हा येईल ही दोन अक्षरी मैत्रीण तिला वेदना देण्यासाठी...!!
ठेऊन पुरुषी अहंभाव बाजूला उभे राहू तिच्यापाठी...!!



-


17 JUL AT 7:52

कसली करतो मिजाज मित्रा कसला तुझा थाट...!
ब्रम्हांड येतो डोळ्यापुढे जेव्हा धरावी लागते खाट...!!
चार भिंतीशी होते यारी पंखा होतो दोस्त....!
जर काळजी घेतली असती आणि सुई टोचली की सुचतं...!!
बघे येतात बघून जातात फळांचा ढीग रचून जातात...!
सल्ल्यांचा पाठ तर चार वेळा स्वतः मरणाच्या दारातून आलेले वाचून जातात...!!
आपण फक्त गोळ्यांचं जेवण तीन वेळा पचवायचं...!
कुणाचं वाईट केलं होतं हे पडल्या पडल्या आठवायचं...!!
हाच काय काळ तो जेव्हा उत्तर मिळतं खरं...!
सगळं कबुल करतो देवा फक्त वाटू दे आता बरं...!!
असेल झोळीत पुण्याई तर डॉक्टर म्हणतात अभिनंदन...!
नसेल तर तोंडांत तुळसपान डोक्याखाली चंदन...!!
गमतीचा भाग सोडा पण सत्य शेवटी हेच आहे...!
की कोणानंतर कोणी एवढाच तो पेच आहे...!!
पण चिंता का त्या वेळेची ती यायची तेव्हा येईल...!
आयुष्यात सुखी मात्र जो आनंदाने हसत राहील...!!


-


15 JUL AT 21:04

पोहे म्हणाले कढई ला तू तयार रहा मी ओलाचिंब होतो...!
कढई म्हणाली हो या लवकर तोवर मी तेलाला गरम करून घेतो..!!
जाता जाता अंघोळीस पोह्यांनी कांदा मिरचीशी हितगुज केलं...!
कांदा म्हणाला केलं आम्ही वेटलॉस दोघेपण एकजीव झालो...!!
बटाटा मधेच बोलला उठून हे नाही चालायचं...!
तुम्हा दोघांच्या संगतीला मला पण बारीक व्हायचं...!!
कढई म्हणाली अरे थांबा भांडू नका एकावेळी सारे...!
आधी लालसर होऊ द्यात शेंगदाण्यासोबत मोहरी आणि जिरे...!!
कढईतील गरम तेलात उडी मारली कांदा,बटाटा,अन् मिरचीने...!
जशी विहिरीत उडी मारावी सैराट मधील परशाच्या आर्चीने...!!
हळदीचा न सांगता हळूच सर्व मिश्रणात शिरकाव झाला...
मिठाचा एक चमचा मिश्रणाला चव देण्यास आला...!!
ओलेचिंब पोहे दादा कढईत उतरण्यास धाऊन आले...!
सर्वांशी होऊन एकरूप जणू लग्नाच्या हळदीने न्हाऊन निघाले...!!
कोथिंबीर, बडिशेप आणि कणभर साखरेला येता राग...!
चवीसाठी त्यांनी देखील पोह्यांत नोंदविला सहभाग...!!
अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्याची पोहा डिश तयार झाली...!
बारीक शेव आणि लिंबाने खवय्यांची जिभ तृप्त केली...!!
कुठे नाव याचे भजी पोहा, कुठे चना पोहा,तर कुठे पोहा इंदोरी...!
अख्या महाराष्ट्राची लाडकी डिश हा दिसतो नाश्त्यात घरोघरी...!!
पाहुण्यांचे स्वागत असो वा असो पाहण्याचा कार्यक्रम...!!
स्वादिष्ट पोह्यासोबत चहा असतो ठरलेला गरमागरम...!!

-


Fetching RAVINDRA SARKATE Quotes