पावसाने रात्रीला कवेत घ्यावे
तसे आपण आपले शांत व्हावे
तो बरसत राहणार,एकांती
आपण ऐकावे ध्वनी मनाचे
करावा संवाद, छेडावे तरंग
चित्र,कोलाज, रंगछटा, रेषा
सारे डोळ्यात ठेवून उसासा घ्यावा,
तो असण्याचा भास
दिव्यांची मंद झालेली वात
भिंतीवरील चित्रांशी बोलावे
आरसा दाखवावा माणूसपणाचा
बांधलेली शिदोरी सोडून देण्यासाठी....-
अर्थकवी
Economic lover
Statistics man
Democracy
Pen & paper
एक खोटे लपविण्यासाठी
कित्येकदा खोटे बोलतो माणूस
असे - तसे आपल्याच जिभेला
नाहक चटके देतो माणूस....-
दुःख इस बात का नहीं
के, वो अनपढ था I
दुःख इस बात का हैं
के,वो पढकर भी अनपढ था I-
तू त्याच्या सत्येत सहभागी होऊ नकोस
त्याची विकेट गेली की,तुझी गेली समज..-
काम होईपर्यंत फक्त तू त्याचा आहे
एकदा कामे झाले की,तो फक्त तिचा आहे..-
तु ओला पावसाळा
डोंगर दऱ्या,नदी नाले
तुझी सोयरे,
तु इंद्रधनुष्य नभीचा
गारवा,वसंत तुझा
फुलपाखरे, सुगंध
तुझीच किमया...
तु सह्याद्री,माथेरान
धुक्यांची चादर
लता,वल्लरी,पुष्पे
अंकुर,कोंब तुझाच..
तू काळी माती,चिकन पेंड
रिमझीम- रिमझीम धारा
दवबिंदू, तृण,
तू श्वास माझा,तुझा
धरणीचा....!!!-
मुझे पता हैं
तेरी कलम बहोत तेज चलती हैं..I
पर अफसोस इस बात का हैं
के,वो सही जगह नहीं चलती है..I-
तु छापलेल्या पैशाचा
हिशोब तूच ठेव
मला पैसा जगायला पाहिजे
झोपायला नाही..-
" एक "
सुंदर घर बनवायचे होते
या निसर्गाच्या दुनियेत,पण
इथल्या काही लोकांनी
जमिनीच्या किंमती सोन्यापेक्षा
महाग केल्याने कित्येकांच्या
स्वप्नावर काळोखाचे ढग
दाटून आले आहे...-
मोठ्या-मोठ्यांना दाराच्या मागे
रडतांना पाहिले आहे मी,
तू डोळे ताठ करून स्वतःच्या
अस्तित्वाला वेदना देवू नकोस मित्रा...-