QUOTES ON #मंत्रमुग्ध१२

#मंत्रमुग्ध१२ quotes

Trending | Latest
12 JUN 2018 AT 10:15

मंत्रमुग्ध होते मन, ऐकून कन्हैयाची बासरी
तनमन हरवले त्या सूरांमध्ये, राधा झाली बावरी

-


17 JUN 2019 AT 0:57

जय जय विजय शंकर,ना लगा बॉल स्टंप्स पर!
जो बॉल तेरे हाथ में दिया,
फिर भी ली विकेट भयंकर,वो भी अपने दम पर!!
जो तूने"LBW"ही कर दिया,

-


12 JUN 2018 AT 11:15

बालपणातले ते दिवस
किती मंत्रमुग्ध करणारे
पुन्हा-पुन्हा आठवणारे
मनात जपून ठेवावेसे वाटणारे

-


12 JUN 2018 AT 9:57

आजवर फ़क्त संगीतानेच
मंत्रमुग्ध होणारा मी,
तुझ्या बोलण्याने देखील
मंत्रमुग्ध व्हायला लागलोय,
सतत वाऱ्या सारखा
चंचल वाहणारा मी,
तुझ्या डोळ्यात पाहुन
स्तब्ध व्हायला लागलोय
- सुयोग पोतदार

-


12 JUN 2018 AT 13:03

असंच कधीतरी एका वळणावर,
पुन्हा भेटू आपण.....
पुन्हा करूया आपल्या,
त्या गोड शब्दांची गुंफण...।
विरून जाऊ एकमेकात,
तेव्हा होईल सगळं स्तब्ध....
नातं आपलं पाहून तेव्हा,
सगळे होतील मंत्रमुग्ध....।।।

-


13 JUN 2018 AT 15:23

पाऊस रिमझिम टपटप बरसतो
हिरवाईची उधळण चोहीकडे करतो
विविध फुलांनी निसर्ग फुलतो
हासत नाचत श्रावण येतो.

श्रावण म्हणजे सणांची रेलचेल
झिम्मा फुगडी हातांचा फेर
माहेरवाशिणींचा झोका उंचच उंच होतो
हासत नाचत श्रावण येतो

एक उत्साह भरून राहिलेला
मृद्गंधाचा दरवळ चोहीकडे पसरलेला
सुर वसंताचा कुणी आळवतो
हासत नाचत श्रावण येतो.

श्रावण व्रतवैकल्ये श्रावण ऊनपाऊस
श्रावण माहेरपण माहेरवाशिणींची हौस
श्रावण हिरवाई श्रावण इंद्रधनू
श्रावण हिरव्या पाचूंचा मुकूटच जणू

-


12 JUN 2018 AT 9:13

तुझं आरस्पानी सौंदर्य बघून
शब्द ही होतात स्तब्ध,

काही सुचेना अशावेळी
होतो मी फक्त मंत्रमुग्ध...!

-


12 JUN 2018 AT 9:04

धुंद झाले क्षण माझे
चिंब भिजल्या भावना,
स्तब्ध झाले शब्द माझे
शहारा वेडावतो तना,
भान हरवले मी माझे
तू मंत्रमुग्ध केले या मना !

-


13 JUN 2018 AT 6:40

पाहूनी तिजला मी मंत्रमुग्ध
नजरेने तिच्या मी दग्ध
यमाई औंध, राजेंद्र गुरव

-


13 JUN 2018 AT 14:39

मोगरा टपोरा शुभ्र सफेद
परिमल फुलांचा मंत्रमुग्ध करणारा

सुर तरल हवेवर विहरणारा
झंकार त्याचा मंत्रमुग्ध मोहरणारा
आवाज मधुर कानांना भावणारा
साजाच्या मंत्रमुग्धतेत विरून जाणारा

ध्वनी ओंकार मंत्रमुग्ध मन
आध्यात्मिक सृजन भारिती
व्याप्ती ज्याची आकाश व्योम
तरंग नाद भरून वाहती

शृंगार रूप साजिरे पैंजणांची रूणझुण
सुकोमल वदन नयन गहिरे काकणांची किणकिण
सौंदर्य आसक्त हरवलेली नजर
थांबलेली भारलेली ....मंत्रमुग्ध

-